मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या पाच गोष्टी कोणालाही सांगू नयेत

हेमंत लाटकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील. 2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील. 3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील. 5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल.

वाचने 15373 वाचनखूण प्रतिक्रिया 61

अद्द्या Sun, 09/06/2015 - 21:03
1 आपल्या आर्थिक नुकसानीची चर्चा कोणाबरोबर करू नये. कारण कोणीही आपल्याला मदत करणार नाहीच पण आपल्याला कुठे मदत करावी लागेल म्हणून दुर पळतील. >>> हाहा 2. आपले दुख: आपल्या पुरतेच ठेवावे. जर आपल्या दुखा:ची चर्चा इतरांशी केली तर लोक आपल्याला मदत करायची सोडून आपली टर उडवतील. >> हाहाहा 3. आपल्या घरातील भांडणे, वाईट गोष्टीची चर्चा बाहेर करू नये. कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. >> हाहाहाहा 4. कोणी आपल्याला फसवले तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. हा मुर्ख आहे अशी लोक आपली सगळीकडे जाहीरात करतील. >> हाहाहाहाहा 5. आपला कोणी अपमान केला तर ही गोष्ट सार्वजनिक करू नये. त्यामुळे आपलीच प्रतिष्ठा कमी होईल. >> हाहाहाहाहाहाहा

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अद्द्या Sun, 09/06/2015 - 23:25
ओ त्यांनी हसायचं नाही असं कुठे म्हन्लय. . आजकाल ट्लॉलींगपण करायला नाही देत मुलांना :-/

In reply to by अद्द्या

नाखु Mon, 09/07/2015 - 08:20
पुढच्या निबंदाचा विश्य "हसतील त्याचे दात दिसतील" "हसणार्याने मिषरीने दात घासावेत, मगच गब्बर होतो" नाखुस खालमाने इ सातवी क बाकडे भिताडाक्डून दुसरे अद्द्याच्या पाठी आणि चिमण्याशेजारचे बाकडे (खिडकीजवळची जागा बॅट्या आणि धन्याने ढापलीय)

In reply to by अद्द्या

प्यारे१ Sun, 09/06/2015 - 23:55
आपके नबाबी शौकोंके बारे में हमें कतई खबर नहीं थी| अब आप ही गर बता रहे हो तो लाहौल विलाकुवत किसी के सामने नाचीझ की जुबाँ खुले| इत्मीनान रक्खे| ;) - प्यारेमियाँ लखनवी हलकं घे रे.

चित्रगुप्त Sun, 09/06/2015 - 21:29
अश्या गोष्टी ज्यांना मोकळेपणाने सांगता येतील असे मित्र नसणे हे सर्वात मोठे करंटेपण.

चौथा कोनाडा Sun, 09/06/2015 - 22:29
सहमत. आणखी एक राहिलीच : 6) फेबु व कायप्पा सारख्या सोने वरुन कंटाळा येइ पर्यंत फिरणारया उपदेश मात्रा मिपावर टाकु नयेत. कृहघे.

रमेश आठवले Sun, 09/06/2015 - 22:52
रहिमन नीज मनकी व्यथा मनही राखो गोय सुनी इठलेगे लोग सब बाटी न लेहे कोय रहिम या संताचा हा दोहा इठलेगे- हसतील गोय -जपून बाटी -वाटून लेहे - घेणार कोय -कोणीही

In reply to by श्रीगुरुजी

मारवा Mon, 09/07/2015 - 23:50
इतका छान लेख लिहिता येण्याएवढी प्रतिभा अंगी नाही. तस्मात विडंबनच बरे. श्री गुरुजी हा तुमचा विनय आहे, केवळ प्रतिभाशाली माणुस च विनयाने असे म्हणतो. आणि लाटकर साहेब तुम्ही त्यांच्या विडंबनाच्या तेजाने च इतके पोळला तर लेख कसा पेलवेल तुम्हाला ?

In reply to by चित्रगुप्त

बायकोबी म्हणजे कोबी सारखी बाय का बाय सारखा कोबी? पण तुम्ही एकंदर नवराबायको विषयी बोलत आहात हे गृहीत धरुन खालील यादी....... नवरोबाने कोबीशी कधी बोलू नये. तिखट मिठ कमी जास्ती झाले असेल तरी मान खाली घालुन गुमान गिळावे. आणि नवरोबांनी बायशी तर कधीही / चुकुन सुध्दा बोलू नये ती म्हणेल त्यावर गपगुमान मुंडी हलवावी आणि एकमताने सुखी संसार करावा. बाय ने नवरोबाला काय वाटेल ते, वाटेल तसे आणि वाटेल तिथे बोलावे आणि आपल्या नजरेच्या धाकात ठेवावे. माहेरचे लोक कसे चांगले (विशेषत: आई) आणि सासरचे लोक कसे द्वाड (विशेषत: सासू) हे सतत ऐकवत रहावे. शेजार्यांनी / मित्रमंडळिंनी घरात काय काय वस्तू घेतल्या ज्या आपल्याकडे नाहीत याची यादी सतत त्याच्या तोंडावर फेकावी. मैत्रिणींचे नवरे कसे त्यांच्या मुठीत आहेत, तू कसा द्वाड, नठाळ, वेडसर, भोळा आहेस, दुनियादारी तुला कशी समजत नाही. मी म्हणून कशी तुला सांभाळुन घेत राहते आहे, दुसरी कोणी असती तर कधीच सोडून गेली असती. इत्यादी गोष्टी नवरोबाला सकाळ दुपार संध्याकाळ अशा किमान तीन वेळा तरी ऐकवाव्याच . नवरोबाला काहीही बोलण्याची कधी संधीच देऊ नये. बाय ने आपल्या माहेरी तसेच आजूबाजूला घडणार्या अप्रिय / गैरसोइच्या गोष्टी नवरोबाला कधी सांगु नयेत. तसेच सासरची मंडळी चूकून चांगले / निट / प्रेमळपणे वागले तर ते देखील नवरोबाला चुकुन सुध्दा सांगु नये. आणि (स्वत:च्याच) एकमताने सुखी संसार करावा. (गेली १५ वर्षे सुखाने संसार करणारा अनुभवी) (खालामुंडी) पैजारबुवा,

In reply to by हेमंत लाटकर

मनीषा Mon, 09/07/2015 - 11:02
तुम्ही चक्क, अज्ञानी मिपाकरांना फसवाफसवीचे ज्ञान देताय की ... चांगलय म्हणा ... आपण आपल्याला सोयीस्कर तसे वागावे, आणि दुसर्‍याला नैतिकतेचे उपदेश करावे. छान ! देव तुम्हाला मदत करो.

In reply to by मनीषा

हेमंत लाटकर Mon, 09/07/2015 - 12:18
आपण आपल्याला सोयीस्कर तसे वागावे, आणि दुसर्‍याला नैतिकतेचे उपदेश करावे. हा उपदेश नाहीये. चित्रगुप्तांच्या प्रतिसादाला उत्तर आहे.

छान विचार रे हेमंता.त्या इण्द्राणीचे प्रकरण चालू झाल्यापासून सगळीकडेच "काय करावे काय करू नये' ह्यावर सगळीकडेच लेख येत आहेत असे ह्यांचे निरिक्षण.

In reply to by एस

प्यारे१ Mon, 09/07/2015 - 18:05
जातींची उतरंड संपवू असं म्हणून होत नाही तोवर नवीन वर्ण आणि वर्ग व्यवस्था आणू पाहणार्‍या स्वॅप्स यांचा जाहीर निषेध. कोणीही जन्मतः जर्दा आपलं दर्जा घेऊन येत नाही. कर्माधिष्ठीत दर्जा विकसित करावा लागतो. वाक्यावाक्यानंतर आपला निषेध तीव्रतर होत जाणार आहे याची जाणीव ठेवा. पुन्हा एकदा निषेध. -जेपीकडून निषेध बोर्ड उसने आणलेला.

In reply to by प्यारे१

मारवा Mon, 09/07/2015 - 23:59
कोणीही आपला जर्दा जन्मतः घेउन येत नाही, जर्दा तमाखु पान किवाम कमवावा लागतो. हिम्मते मर्दा तो मदद दे जर्दा आज समाजाला उत्तम प्रतीच्या जर्दा ची गरज आहे, तो वेळेत मिळाला नाही तर खुर्दा अटळ आहे,

In reply to by हेमंत लाटकर

अभ्या.. Mon, 09/07/2015 - 18:07
अरे ठरवून ठरवुन ठरवणार कोण... लाटकरांशिवाय हायच कोण... लाटकर साहेब आगे बढो. दर्जा तुम्हारे साथ है.

palambar Wed, 09/09/2015 - 01:36
जर लेख आवड्ला नाहि तर प्रतिक्रिया देउ नये , लेखक समजुन घेईल , पण एवढे टोचुन का लिहावे? मला कळ्ले नाहि.