कोकणातील भटकंती.... माहिती पाहिजे....
मित्रांनो,
पुढील महिन्याच्या १,२,३ आणि ४ तारखेस कोकणात फिरायला जायचा विचार आहे....
आम्ही दोघे आणि पिल्लू + साडूसाहेब, मेहुणी आणि त्यांच पिल्लू.
१ तारखेला सकाळीच औरंगाबादवरुन निघून ४ तारखेला संध्याकाळी परत असा साधारण कार्यक्रम आहे..
मुक्काम नागाव (अलीबाग जवळ), कशिद या परिसरात करण्याचा विचार आहे.
तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे???
फणसाड अभय अरण्य आणि मुरुड जंजिरा शक्यतो टाळन्याचा प्रयत्न राहिल....
१) अभयारण्यात दोन छोटे पिल्लू घेउन जाता येणार नाही.
२) मूरुड च्या किल्ल्यावर तिथले स्थानीय लोक नीट (सम्पूर्ण) माहिती देत नाहीत म्हनुन जाणार नाही.
आता या दोन्ही शिवाय जवळपास काय ठिकाने आहेत?
सर्वात महत्वाचे येथे खादाडी साठी काही विशेष ठिकान प्रसिद्ध आहे का?
या परीसरात काय काय आवर्जुन खावे? / बघावे?
काही धोका? (अर्थात समुद्र किनारी)
सोबत सोबत ४ चाकी असल्याने अलीबाग च्या पुढे १०० किमी पर्यंत जाण्याची तयारी आहे.
या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.
गूगल बाबावर काही विशेष सापडले नाही.
जानकार लोकांनी प्रकाश टाकावा.
धन्यवाद.
वाचन
15113
प्रतिक्रिया
36