Skip to main content

विखुरलेलं चांदणं

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 24/09/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली कमीच झालंय तस तुझी आठवण येणं, ओसरत आहे हळू हळू हळव्या समुद्राच उधाण हल्ली कमीच झालंय तस रात्र रात्र तळमळणं, मला बघून अंधारानेही कमी केलंय उसासे सोडणं. हल्ली कमीच झालंय आता मला मोग-याने खुणावणं, त्यालाही झालंय सवयीचं झुरत झुरत गळून जाणं. हल्ली कमीच झालंय स्वप्नांनी डोळ्यात गर्दी करणं, मलाच कसं नाही जमलं असं वेळीच शहाणं होणं. हल्ली कमीच केलंय मी माझ्याच मनाच ऐकणं, तुझ्याकडे तरी आलंय का रे माझं टिपूर चांदणं? (नाव सुचलंच नाही कवितेला.)
काव्यरस

काहीतरी करण्याची जिद्द

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 24/09/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
जिद्द, आत्मविश्वास या गोष्टी शोधायच्या असतील तर थोरांची आत्मचरित्रच वाचावी लागतात, त्यांचे शब्द ऐकावे लागतात असं नाही. अगदी साध्या सोप्या माणसांशी केलेल्या संवादातूनही अशा मूल्यांची ओळख होते. असाच एक माणूस मला भेटला. हा माणूस म्हणजे आमच्या कँटीन स्टाफ मधला एक जण. अगदी ४-५ महिनेच झाले असतील त्याला कँटीन मधे लागून. इथे एका केटरर चं कंत्राट आहे, ज्याच्याकडे हा कामावर आहे. तसेही कँटीनमधले चेहरे नियमितपणे बदलत असतात त्यामुळे सुरुवातीला 'आणखी एक नवीन चेहरा' म्हणून त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही कुणी आणि मीही.

श्रीगणेश लेखमाला ७ : अनुभवांची शिदोरी

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 24/09/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
'अ गुड फील्डवर्कर विल मॅरी इंटू द कम्यूनिटी ही/शी इज वर्किंग विथ, दॅट्स द ऑन्ली वे टु मेक देम ट्रस्ट यू' फील्डवर्कवरच्या व्याख्यानात अंदमानी भाषांवर परिश्रमपूर्वक काम केलेल्या बाईंनी मिश्कीलपणे म्हटलं आणि आमच्या हॉलमध्ये खसखस पिकली. पण फील्डवर्करमध्ये आपल्या कॉलेबरेटर समाजाबद्दल किती आत्मीयता असली पाहिजे, हा मॅडमनी त्यांच्या एकूणच व्याख्यानात सांगितलेला मुद्दा, तो मात्र मनात पक्का ठसला. फील्डवर्क म्हणजे काय, याची काही व्याख्या करण्याइतका माझा अजिबातच अनुभव नाही. प्रत्येक क्षेत्राची काम करण्याची पद्धत वेगळी, त्यामुळे ही व्याख्या क्षेत्रानुसार बदलत असावी.

लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि,

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 23/09/2015 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आदरणीय लोकमान्य, खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत.

नेता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 23/09/2015 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या एका हातात खंजीर आहे दुसर्या हातात नागाचा विषारी दंश आहे एका क्षणी शिव्या देतो दुसर्या क्षणी मधाळ बोलतो. धृतराष्ट्री पुतळा तो नेहमीच समोर ठेवतो. तो मित्र आहे कि शत्रू काहीच कळत नाही. एक मात्र खरं तो सीजर नक्कीच नाही ब्रुटस असू शकतो कदाचित् किंवा नेताहि असू शकतो.

तुकारामा-

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामा, तुझ्यावाचून जगाचे काय अडले होते? -तरी इंद्रायणी काठी प्राण तुझे भिडले होते? नसतास तरी सुखेनैव आम्ही गजर केला असता तुझ्यावाचून विठूराया बेवारस मेला नसता कशासाठी आकांताचा एवढा धरला होता सोस? पंढरीचा वाडा काही अगदीच पडला नव्हता ओस टाळ वाजत होते, पखवाज नित्य दंगा करीत होता.. कशासाठी वाळवंटात तूच उर भरत होता? माहित नाही? ज्ञानोबाला आळंदीत गाडले होते! नामा फिरून आला देश, तरी पायरीत चिणले होते! चोखोबाच्या अंगावरती वेस पडली, हाडे उरली... एका जनार्दनी काया गोदावरीत होती बुडली... कुणी परागंदा झाले अंगावरती विजा झेलून खरे वाटले?.....

राधा कृष्ण....... जर...

लेखक शशीभूषण_देशपाण्डे यांनी बुधवार, 23/09/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
"राधा" घननीळा, का अवेळीच तू या राधेला परत भेटला? विराण आता झाले गोकुळ जुना पुराणा कदंब वठला अता न उरली स्वप्नामधली तरल अनामिक धूसर नाती कुठे पाहसी कृष्णा मधुबन भयाण या अवसेच्या राती कालिंदीचे उदासले जळ अता लोपली त्याची खळखळ नि:शब्दाचे पिसाट वारे ठेवून फिरते उरात खळबळ अता न उरल्या काठावरच्या कुरणातिल चरणाऱ्या गायी टपोर त्यांच्या डोळ्या मधली दूर हरवली वत्सल आई तुझ्या करातील सुस्वर मुरली आठवते केवळ प्राचीनता चैतन्याचा सूर हरवूनी फक्त विराणी गाते आता सांग, कशी मग मी तरी येऊ आठवुनी मागिल संमोहन अता कुठे उरला राधेचा तो पूर्वीचा घननिळ मोहन?
काव्यरस

सनबर्न फेस्टीवल , गोवा , २७- ३० डिसेंबर २०१५

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 23/09/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे . आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत .... पण तरीही वचने किं दरिद्रता म्हणुन आपले विचारत आहे
यंदा गोव्याला सनबर्न- २०१५ फेस्टीवलला जायचे का ?
सनबर्न हा ख्रिसमस नंतर होणारा एक एलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल आहे जो की २००७ साला पासुन होत आहे .

लुटारू..???

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 23/09/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
ताई आणि भाऊजी उद्या येणार म्हणून फोन आला होता. मग काय आईला काय करू नी काय नको असं झालेलं. एक तर जावई पहिल्यांदाच घरी येत होते. त्यात त्यांना रजा नसल्यामुळे सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार होते. तसेही बाइक वरून एक तासाचा रस्ता होता. त्यामुळे घरातून निघताना ताई फोन करणार होती. म्हणजे आम्ही तयारीत राहणार होतो. स्वागत, पाहुणचार शेजार पाजारी भेट, दुपारचं जेवण त्यानंतर घटकाभर विश्रांती, संध्याकाळी गावदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन, अन सहा- साडेसहाला प्रस्थान असा भरगच्च कार्यक्रम आई ने तयार करून ठेवला होता. ठेवणीतले बेडशीट - कव्हर बाहेर आले होते. इकडे तिकडे पडलेली रद्दी, कचरा साफ करून झाला होता.