कोंकणवारी - दातेगड (सुंदरगड), ओझर्डे फाल्स, गुहागर, जयगड व गणपतीपुळे
नमस्कार मित्रहो (भटक्यांनो),
गेले कित्तेक दिवस मिपा वर लेख लिहावा म्हणून संधि शोधत होतो. आता लेख लिहायचा म्हंटल की असा लिहावा ज्या ठिकाणा बद्दल आधीच फार काही लिहील गेलं नसावं असा एक विचार मनात आला कारण या आधी हरिश्चंद्रगड सारखे कित्येक ट्रेक्स मिपा वरच वाचले मग त्याबद्दल च पुनः माझ्या सारख्या नव्या बिडु ने लिहिण म्हणजे 'स्क्रीन पेक्षा sms मोठा' अशी गत नको! ;-)
असो, फार वेळ न घालवता मूळ मुद्द्याकडे वळतो. मी मुळचा सांगली चा. अंगारकी संकष्टीला सांगलीहुन गणपतिपुळयाला जाणार्यांची संख्या तशी भरपूर. तो च बेत एके दिवशी कट्ट्यावर बसल्या बसल्या ठरला. तसहि २०१६ मधे अंगारकी नाही, म्हंटल जाऊ.
मिसळपाव