Skip to main content

उंबरखिंड

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 19/10/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! "नेमेची येतो " म्हणत म्हणत पावसाने या वर्षी टांग दिली आणि पावसाळी ट्रेक करण्याचे आमचे स्वप्न हवेतच विरले .आता पावसाळी नाही तर निदान हिवाळी ट्रेक करूया असे म्हणून मागच्या विकांताला ट्रेक करायचे ठरले.चंदन-वंदन की उंबरखिंड यावर चर्चा चालू होती. पण कल्याण डोंबिवलीहुन काही जण येणार होते आणि ट्रेक वन डे करायचा होता त्यामुळे उंबरखिंड ने बाजी मारली . मी हा ट्रेक आधी खोपोली ते लोणावळा असा उलट दिशेने केला होता. पण त्याला खूप वर्षे झाली होती आणि वाट धुसर आठवत होती. शिवाय आम्ही मध्ये कुठेतरी एक रात्र मुक्काम केला होता व दुसऱ्या दिवशी नागफणी बघुन लोणावळ्याला आलो होतो.

राजकारण

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी सोमवार, 19/10/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
"सोसायटीचे सेक्रेटरी" "होय" "कॉर्पोरेशन निवडणुकीचा फ़ॉर्म भरलाय?" "होय"! "मी भीमराव बाजूची झोपडपट्टी माझ्या ताब्यात असती " "बरं मग?" "मागच्या टायमाला बायको कॉर्पोरेटर हुति !" "माहीत आहे !" "या टायमाला मी फ़ॉर्म भरलाय !" "पुढं ?" "या ब्यागेत पांच पेटी हायंत !" "चालायला लागा !" " जादा पायजेत?" " लोकांनी उभं केलंय मला !मी उमेदवारी परत नाही घेणार!" "हे बगा हे पांच ठिवा." "५००मतं फीक्‍स आहेत, सोसायटीतली ,तुम्ही चालायला लागा " "तुमच्या शेजारच्या सोसायटीतल्या पाटलानं बी फॉर्म भरलाय न्हवं?" "अं ?

कास पठार आणि वजराई धबधबा...

लेखक शब्दबम्बाळ यांनी रविवार, 18/10/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेळेच्या अभावी सगळेच सविस्तर लिहिणे शक्य झाले नाही त्यामुळे थोडक्यात वर्णन केले आहे. मागच्या महिन्यात कासला जाउन आलो. तिथे काढलेले काही फोटो इथे प्रकाशित करत आहे...

द वॉक - एक अप्रतिम अनुभव

लेखक कोमल यांनी रविवार, 18/10/2015 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
जर मी तुम्हाला विचारलं कि तुमची आवड काय आहे? तर मला कैक उत्तरे मिळतील. स्वतःच्या आवडीचं काम कोण कोण करत आहे असं विचारलं तर बऱ्यापैकी कमी हात वर येतील. पण जर मी असा प्रश्न केला की, स्वतःच्या आवडीलाच ध्येय बनवून, एक स्वप्न बघून त्याच्यासाठी वेडं होणं कितीजणांना जमतं, तर फारच कमी उदाहरणं मिळतील. अशाच एका वेडयाची गोष्ट आहे "द वॉक". न्यूयॉर्क. ध्येयवेड्या लोकांचं शहर. आणि पॅरिस स्वप्नाळू आर्टिस्ट लोकांचं ठिकाण. आपल्या ध्येयवेड्या आर्टिस्ट चा प्रवास चालू झाला पॅरिस पासून न्यूयॉर्ककडे. गोष्ट काही फार नवीन नाही पण अगदीच जुनी पण नाही आणि अप्रचलित तर अगदीच नव्हे.

शब्दांचं आयुष्य

लेखक निखिलचं शाईपेन यांनी रविवार, 18/10/2015 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायामचड्डीचा खिसा छोटा आहे, त्यामुळे जीवनसाथी (मोबाईल) बरोबर नेता येत नाही, किल्लीचा जुडगा तेव्हडा मावतो. तर, तसा निघालो, एक गोरे आजोबा व्यायामावरून येत होते, आज (अनेक दिवसांनी का होईना) मीपण पळायलाच चाललो असल्यानं नेहमीसारखं गिल्टी वाटलं नाही. वर त्यांनी अगदी ओळख असल्यासारखा हाय वगैरे केला. खरंय पण, एकुणातच सगळे प्राणी दुसरा समोर आला कि ऍकनोलेज करतात, म्हणजे कुत्री समोर आली कि गुरगुरतात, मांजरं पण, अगदी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मुंग्या पण काहीतरी देवाणघेवाण करताना दिसतात, चिमण्यांचंही तेच, मग माणसांनी हाय म्हणायलाच हवं. हाय आजोबा, व्हाट्स अप !

<<< आवडून घेतलेलं काही... >>>

लेखक प्यारे१ यांनी रविवार, 18/10/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/33278 हलकं घेतलं जावं ही नम्र विनंती >>> सजदे में आज भी झुकते है सर बस, मौला बदल गया देखो... आम्हाला नेहमीच ऐकून घ्यावं लागतं फक्त, कधी बॉसचं कधी बायकोचं. >>> जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे.... आधी माझं स्त्री प्रजातीशी भांडण होतं नंतर मी त्यांना आवडू लागतो (हाय का आवाज फेम पातेल्यातली आमटी) >>> है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता.... आहे वैताग भरपूर आयुष्या

कोणता मोबाईल घेऊ ?

लेखक कट्टापा यांनी रविवार, 18/10/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?) Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे. तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा. मोबाईल कडून अपेक्षा (Requirement) 1.चांगले बॅटरी बॅकअप. 2.उत्तम कॅमेरा

गोवा जाण्या संबंधी मदत हवी आहे

लेखक देश यांनी रविवार, 18/10/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
Resume Editing नमस्कार, कुटुंबासोबत (बायको, २ मुले - ६ वर्ष आणि ११ वर्ष) नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात गोव्याला फिरायला जायचे आहे. गोव्याला ह्या आधी कधिहि गेलो नसल्यामुळे मदत हवी आहे .पुण्याहुन बसने जाणार आहे १. २ ते ३ दिवस गोव्यात राहण्याचा विचार आहे. क्रुपया राहाण्याची ठिकाणे सुचवा २. कुठल्या जागांना भेटी द्याव्या आणि कुठल्या क्रमाने ? (समुद्र किनार तर हवाच :-) ) ३. फिरायला गाडी करावी की भाड्याने कार घ्यावि ? ४. मासे खाण्यासाठी आवर्जून भेट द्यावी अश्या जागांची नावे आणि पत्ता ५.

प्ले इट अगेन

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 18/10/2015 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . . Image (चित्रः प्रतिमा खडके) त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

लेखक बाप्पू यांनी रविवार, 18/10/2015 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर कुल्बर्गी यांच्या हत्ये नंतर कर्नाटकातील बऱ्याच साहित्यिकांनी आपल्याला मिळालेले पुरस्कार सरकारला परत केले. सुरवातीला हि गोष्ट कर्नाटक पुरतीच मर्यादित होती. पण हे लोन आता बऱ्याच राज्यांमध्ये पसरलेय. आणि याला कारण म्हणजे दादरी येथे झालेली घटना. नेमके आज च तुम्हाला भारतात असहिष्णुता वाढत असल्याचा साक्षात्कार झाला काय? हि घटना खरच दुर्दैवी होती. पण या घटनेचे भांडवल करून खूप राजकारण पेटले आहे. आणि या वाहत्या गंगेत हाथ धुवून घेण्याचे काम साहित्यिक करत आहेत. मला कोणत्याही प्रकारे दादरी येथील घटनेचे समर्थन करायचे नाहीये. फक्त एकच प्रश्न या सर्व साहित्यिकांना विचारायचा आहे.