Skip to main content

करवाचौथ आणी संकष्टी चतुर्थी

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 31/10/2015 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी, तू कशी दिसत होतीस गं , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? DDLJ मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा. आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो, आणि माझा 'संकष्टी चतुर्थी' चा. जिप्सी
काव्यरस

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजे.. !

लेखक सुहास झेले यांनी शनिवार, 31/10/2015 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
. . हे वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांचे ३२६वे पुण्यस्मरण वर्ष. इसवी सन १६८०मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली. त्या वेळी स्वराज्यावर अनेक संकटे चालून आलेली होती. साक्षात दिल्लीपती औरंगजेब आपले सर्व सैन्य, युद्धसाहित्य घेऊन स्वराज्यावर चालून आला होता.

खीरकदम

लेखक सूड यांनी शनिवार, 31/10/2015 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
. . माताय, मिपावर एवढे रथीमहारथी असताना लिहायचं म्हटलं की प्रश्न पडतो. कविता लिहावी, तर अजूनपर्यंत कधी ठरवून लिहू म्हटलं आणि लिहिली असं झालं नाही. लेख? तो सुचेना. मग म्हटलं, आता होम पीचवर उतरावं. बरं, त्यातही व्याप कमी नाहीत. मिपाचा मुदपाकखाना सुगरणी आणि बल्लवाचार्यांनी परिपूर्ण! सणासुदीची म्हटल्यावर रेशिपी थोडी हटकेही पाह्यजे ना राव!!

माझ्या मराठी मातीत

लेखक सायकलस्वार यांनी शनिवार, 31/10/2015 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
- या कवितेची प्रेरणा विशाल कुलकर्णी यांच्या 'माझ्या सोलापुरी मातीत' या कवितेवरून मिळाली, त्याबद्दल त्यांचे, आणि त्यांनी ज्यांच्या कवितेवरून प्रेरणा घेतली(!) त्या बोरकरांचेही आभार ;) ******* माझ्या मराठी मातीत पडे छाया आभाळाची दरी-खोर्‍यांतून जाती संथ पावले काळाची माझ्या मराठी मातीत येते गाज सागराची गंध वाहे मोहराचा हवा खारी आगराची माझ्या मराठी मातीत वाहे शांतरस साचा समाधिस्थ आहे तीत कुणी पोर संन्याशाचा माझ्या मराठी मातीत रंग दूर्वांनाही लाल रक्त सांडलेले इथे पावनखिंडीत काल माझ्या मराठी मातीला नाद टाळ-मृदंगाचा देई विश्वाला अवघ्या वर पसायदानाचा

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 30/10/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय: मतदान नमस्कार मंडळी, या स्पर्धेला दिलेल्या उत्साही प्रतिसादाबाबत मनःपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या मतदानासाठी हा धागा आहे. नेहमीप्रमाणेच वाचकांनी आपली मते १, २, ३ अशी नोंदवावीत ही विनंती. तसे क्रमांक का द्यावेसे वाटले याबदलही जरूर लिहा. कोणाचेही छायाचित्र मतदानासाठी घ्यायचे राहिले असेल तर ते त्वरित लक्षात आणून द्यावे. आपली मते आजपासून १० दिवस, म्हणजे ९ तारखेपर्यंत नोंदवावीत ही विनंती.

कडकणी

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/10/2015 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
(कडकणी -मैद्याची एकदम पातळ थोडीशी गोडसर पुरी,कोल्हापूर साइडला नवरात्रात करतात) ----------कडकणी---------- लहाणपणी दसर्‍याला सोनं द्यायला आमची मित्रांची टोळी एकमेकांच्या घरी जायचो, तेव्हां हमखास कडकणी जिकडं तिकडं मिळायची. लहाणपण सरलं ,कोल्हापूरहि सुटलं आणि कडकणी आयुष्यातून पसार झाली. किती वर्षानि ,पुन्हा कोल्हापूरात दसर्‍याला येणं झालंय ,वडलार्जित प्रॉपर्टी संबधी कांही काम निघाल्यामुळं, थोरल्या बंधुनी बोलावून घेतल्यामुळं यावलं लागलं होतं.

पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 30/10/2015 19:45 या दिवशी प्रकाशित केले.

पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!

सायंकालची वेळ. दरवाजा उघडून बाईंनी बाबारावांना आत घेतले. हुप्प चेहरा पाहून काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नातवंडाला घेऊन त्याचा डॅड परतला. एका हातात चॉकलेट अन दुसऱ्या हाताने मोबाईलवरील कार्टून पाहात त्याने शूज उतरवले. ‘चार्वाकवादावरचा लेख पेपरात आल्याने सकाळी उसाही दिसणारे बाबाराव आत्ता रुसलेले का?’ असा मुलाने हात करून आईला प्रश्न केला. ‘काय की’ म्हणून त्यांनी तोंड फिरवले. ‘काय रे, ते शूज रॅकवर कोण ठेवणार? तुझा बाप?’ बाबारावांचा नातवावर राग निघाला. ‘काय झाले?’ म्हणत सुनबाईने रागरंग ताडला.

मन दुणे मन

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/10/2015 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
. . मन चिमणं पाखरु, उंच आभाळासी जाई. मन पिंजऱ्यातील पक्षी, बंध तोडूही न पाही. मन ग्रीष्मासम तप्त, शिशिर गारवा मनात. वर्षाधारा संतत बरसत, ऋतु बदलती क्षणात. खोल मनाचिया डोही, तळ कसा तो गाठावा. चिरंतनाचे गूढ मनी, शोध कधी न लागावा. दूरवर पल्याड मनाचिये गाव, ठाव तयाचा लागता न लागे. शोध घेऊनी शिणला जीव, कुठवर धावावे त्याचिया मागे. मन उभे ऐलतीरी, मन पैलतीरासी जाई. मना ओढ किनाऱ्याची नाव भरकटत राही.

माझे आवडते गाणे

लेखक सत्याचे प्रयोग यांनी शुक्रवार, 30/10/2015 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बऱ्याच वेळा आनंदी , दु:खी असताना काही गाणी गुणगुणत असतो. बरीच गाणी नुसती ऐकूनच मन प्रसन्न होते. मनात घर केलेली गाणी वारंवार गुणगुणायला आवडतात. असेच माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणे आहे “ तेजाब “ सिनेमा मधील “ सो गया ये जहा ‘’ साध्या सोप्या पण आशयघन शब्दांनी गीते फुलविणारे गीतकार जावेद अख्तर , तर हजारो गीतांना आपल्या मंत्रमुग्ध संगीताने भूरळ पाडणारे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल , तर काही मोजकीच पण लक्षात राहणारी गीते गाजवणारे गायक नितीन मुकेश , सोबत गायक शब्बीर कुमार व अलका याग्निक आणि हो यातील कोरसची साथ ही महत्वपूर्ण आहे.

लाजाळू नि गुलाब

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 30/10/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाजाळूच्या झाडापुढे गुलाबाच फूल नको स्पर्शाविना मिटण्याची त्याला नवी भूल नको! गुलाबाच फूल भारी लाजाळूला खेटलेल लाजाळूच झाड वेड येता जाता मिटलेल! कुणी द्या रे रंग-वास लाजाळूला मिरवाया तोरा नवा दाखवून ताटव्याला फुलवाया! - संदीप चांदणे