Skip to main content

हा छंद इतिहासाचा - श्री. मानसिंग कुमठेकर

लेखक बॅटमॅन यांनी रविवार, 01/11/2015 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
. . सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दैनिक तरुण भारतमध्ये काम करणार्‍या श्री. मानसिंग कुमठेकर यांना इतिहास संशोधनाचा आणि ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचा छंद आहे. आपली नोकरी आणि इतर कामे सांभाळूनही गेली वीसेक वर्षे त्यांनी अक्षरशः हजारो ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या, प्राचीन पुस्तके, इ. अनेक ऐतिहासिक साधनांचा प्रचंड मोठा संग्रह गोळा केलेला आहे. या अफाट संग्रहात अनेक अप्रकाशित रत्ने आहेत.

ठंडा करके खाएंगे!

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 01/11/2015 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
. . एकेकाळच्या मुंबईच्या एसीपी नानासाहेबांची तरुण नातसून नेहा. नवव्या महिन्यातले पाय जडावलेली. दिवेलागणीच्या वेळी तिने तिची फोर्ड इको-स्पोर्ट गाडी रस्त्याच्या कडेच्या पार्किंग स्पॉटमध्ये सावकाश थांबवली. आधीच मागे असलेलं सीट आणखी मागे सरकवलं आणि पोटाला सांभाळत ती खाली उतरली. मागचं दार उघडून तिने दोनेक वर्षांच्या मुलीला मागच्या सीटवरून उतरवलं.

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 01/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो.

तुझ्याशिवाय...

लेखक निलम बुचडे यांनी रविवार, 01/11/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
**तुझ्याशिवाय ** तुझ्याशिवाय , मन वेडे होऊनी झुलते, उगीच का भरकटते! स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची, वाट पाहत बसते!! सागरतीरी एकाकी, का उदास होऊनी बसते! खळखळणार्या लाटांच्या, नादामध्ये विरते!! स्वप्न असो वा सत्य, मन तुजपाशीच रमते! त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी, तुझी कामना करते!! - निलम बुचडे.

कोवळ्या वयातलं व्यसन

लेखक जातवेद यांनी रविवार, 01/11/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती? माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे.

शेअरडे बाप-लेक

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 01/11/2015 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
. . रंगरावने शेअर्सच्या उलाढालीत फार मोठी खोट खाल्ली होती. नशिबाने त्याची सासुरवाडी फारच गब्बर व भक्कम असल्यामुळे त्याला काही तसं फारसं कमी पडत नव्हतं. पण जेव्हा त्याचा एकुलता एक पोरगा गजा शेअर्सचा व्यवसाय निवडणार म्हणू लागला, तेव्हा रंगरावाची बायको चांगलीच हडबडली. तिच्या दृष्टीने हे भिकेचे डोहाळेच होते जणू. तिने एक सायकियाट्रिस्टच गाठले. त्यांना सगळी पार्श्वभूमी समजावून दिली.

नोटा

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी रविवार, 01/11/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
" नोटा " त्यातला त्यात शिकलेला ,आणि सरळ म्हणजे,भीमरावच म्हणून नोटाची थप्पी, वाटण्यासाठी सदूभाऊनं त्याच्याकडं सोपवली. रात्रीतनं नोटा वाटायच्या होत्या ,आणि भीमरावनं ते काम ईमान इतबारे केलं. एक पैसा पण कनवटीला लावला नाही. थोडासा गस्त वाल्याला हात पण हात ओला,करावा लागला होता,चोरीचा मामला होता ना! सकाळी सातालाच तो गल्लीत हजर झाला., रात्रीच्या नोटांचा अंमल सकाळी पण शिल्लक असला तर?त्यासाठी हल्ल्या हल्ल्या,करणं भाग होतं. मावशी , च्या बी काय? शिलिंडर हाय का तुमच्याकडं?

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 01/11/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती.

तिची कविता

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 31/10/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
ती एक आई जीवन घडवणारी! ती एक पत्नीसाथ देणारी !! ती एक ज्योती उज्जवल भविष्याप्रत नेणारी! ती एक दिप्ती अखंड तेवत राहणारी !! ती एक कळी उमलण्यासाठी आसुसणारी! ती एक चांदणी चमचमण्यासाठी धडपडणारी !! ती एक शक्ती सामर्थ्य प्रदान करणारी ! ती एक व्यक्ती जगण्याचा अधिकार मागणारी!! - निलम बुचडे.
काव्यरस