Skip to main content

रे कबीरा …

लेखक निखिलचं शाईपेन यांनी शनिवार, 07/11/2015 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
bird1 हमदर्द, आरजू, उल्फत, इकरार आणि आगोश आणि …. कित्येक असतील, गाण्यांत सहजपणे येणारे उर्दू/ उर्दूईश शब्द लगेच उलगडून सांगायला पूर्वी गुगल नव्हतं खेरीज मोठ्यांना विचारायची सोय नव्हती, त्या वयापासून मी अशा बर्याच हिंदी गाण्यांचा भक्त आहे. आताही त्यातली बरीचशी गाणी मी अर्थाच्या मागे न लागताच ऐकतो.

मी इतर प्रवासी आणी रस्ता माहित नसलेला ड्राईव्हर

लेखक प्रणवजोशी यांनी शनिवार, 07/11/2015 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
(माझा पहिला लेख) जर आपले वाचक मुंबईत रहात असतील तर एक नवी म्हण त्यांना माहित असेल "रोज म.रे. (मध्य रेल्वे) त्याला कौण रडे.तर हा अनुभव साधारण जुन-जुलै मधिल आहे. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ७-११ अंबरनाथ ठाण्याहुन पकडली.पण ती कल्याणला रद्द केली गेली.कारण उल्हासनगरला रेल्वे रुळ खचला होता. मग बुडात्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे मी केडिएमटीची मिनी बस पकडली. तिने कल्याण दर्शन करुन पत्री पुलावरुन नेतिवली वरुन अंबरनाथला निघालो.

मात

लेखक चाफा यांनी शुक्रवार, 06/11/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
" दिन्या पटकन सांग रे जेम्स बाँडचा लेखक कोण ? " शब्दकोडं सोडवता सोडवता कमलेशनं मागं वळून न पाहता विचारलं. " मलाही नांव आठवत नाहीये रे ! पण एकच मिनिट, जय गूगल बाबा, घे इयान फ्लेमिंग " दिनेशनं मांडीवरच्या लॅपटॉपला डिवचलं. " दिन्या लेका , कधीतरी डोकं चालव रे, उठसूठ गूगल काय ? " कमलेश वैतागून म्हणाला, या शब्दकोड्याचं वेड असलेल्या माणसांचं असंच असतं, स्व:तला उत्तर येत नसेल तर एकवेळ दुसर्‍याला विचारतील, पण गूगल करू , कुठे पुस्तकात पाहू म्हटलं की चिडतात ते. " कशाला डोकं चालवायचं ?

फिरुनी पुन्हा..........

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 06/11/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .......... माझी ही नवीन कथा तुमच्या समोर सादर करतोय....... कथा थोडी मोठी आहे. खरतर कथेची लांबी पहाता ही दोन तीन भागात पोस्ट करायला हवी होती. पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात विभागणे एक लेखक म्हणुन व्यक्तिगतरित्या मला योग्य वाटत नाही..... गेल्या कथेवरच्या चित्रे साहेबांच्या सुचनेनुसार ह्या कथेच्या सुरुवातीलाच नमुद करतोय की कथा थोडी मोठी आहे. सवडीने वाचा. आवडली तर नक्की सांगा.... *********************************************************************************************** फ़िरुनी पुन्हा....... टेबलावरचा फोन कितीतरी वेळ खणखणत होता.

भुईक

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 06/11/2015 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला. "आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं. "यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला. "ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला. "येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं. "आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापु

घरोघरी पुरस्कार वापसी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
“आज तर तुझ्या सवेंदनहीनतेचा कळसच झालायं!” आदिती तणतणत समोरच्या हॉलमधे आली. अक्षय फेसबुक आणि ट्वीटर वर आजकाल रोजच मिळणारे असहिष्णुतेचे पोस्टस चघळत होता. खरतरं असल्या पोस्टस विषयी त्याचीच सहिष्णुता आता संपुष्टात आली होती. त्यामुळे फेसबुकाने केव्हाच्या जाहीर केलेल्या सात भावचित्रांची तो आतुरतेने वाट पहात होता. “जानू, काय झालं?” त्याने शंभर लाईक्सने ओथंबलेल्या आवाजात विचारले. “मी किचनमध्ये मरमर मरतेय, आणि तू मजेत फेसबुक-फेसबुक खेळत बसलाय!” “अग मी माझी मेल चेक करत होतो. बॉसचा एक अर्जंट इमेल यायचाय नां!” “मला उगाच काऊचिऊच्या गोष्टी सांगू नकोस. तू आजकाल फारच असहिष्णूतेने वागतोयसं!

थोडी गम्मत

लेखक मीउमेश यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
महागुरू सचिन पिळगावकर यांच्या बद्दल चा सगळ्या मिपाकर मंडळीचा उत्साह पाहता, त्यांची कट्यार मध्ये खासाहेबंची भूमिका करणे बर्याच मंडळीना रुचलेले दिसत नाहीत. आपण या आधी खूप सारे चित्रपट आणि नाटके पहिली असतील , अस बर्याच वेळी ;झाला असेल कि या भूमिकेत "क्ष" व्यक्ती असायला हवी होती. किंवा एखाद्या भूमेकेला एखाद्या नटाला काम जमलं नाही (न्याय देता आला नाही), असं बर्याच वेळी वाटत. फार गम्मत आहे ना, मला पर्सनली नाना पाटेकराना सखाराम बाईंडर किव्हा नथुराम च्या भूमिकेत बघायला आवडेल. थोडी गम्मत

तो अनुभव...

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 06/11/2015 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी अनेक वर्ष शिफ्ट ड्युटी केली. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ३.३० तर दुसरी ३.३० ते रात्री १२.०० पर्यंत. तिसरी शिफ्ट कधी करावी लागली नाही. लग्न व्हायच्या आधीच्या काळात रात्री १२.०० नंतर गप्पा मारायला, चहा प्यायला इ. कारणासाठी बुधवारच्या सेकंड शिफ्ट नंतर आम्ही बॅचलर्स जमा व्हायचो. मग कुणाच्या रुम मधे पत्ते रंगायचे तर कधी फक्क्ड चहाच्या सोबतीने गप्पा रंगायच्या. सायकलीवर कामाला जाणारे सगळे खंडोबाचा माळ अकुरडी येथे बुधवारी रात्री १२ च्या पुढे जमा व्हायचे.