Skip to main content

इतस्तत:

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 25/11/2015 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीच्या डोंगरकडांवरुन वाहणारे वारे गारठा घेऊन पश्चिमेकडील पाटवाटा समृद्ध करत गेले. बुंदेलखंडाच्या तीव्र ऊतारावरुन अवजड शिळा गडगडत खाली आली. काम फत्ते झाले. चढणी भाजणीचा रस्ता तुडवत वर्दी द्यायला भिवा गडावर पोहोचला. तुघलक खान दाढी कुरवाळत सिंहासनावर आरुढ होता. "क्या पैगाम लाये हो?" "वो पत्थर हमने हटाया जनाब" "बहोत खुब, सुभा नल्ला" अक्रम पठाणाकडे नजरत-ए-हुकुम गेला. दाढीदारी सैन्य डोंगर उतारावर एकवटले. जिथुन शिळा काढली होती तिथे एक भलामोठा खंदक पडला होता. पहारी तुटून पडल्या. त्या खंदकात जोमाने खोदकाम सुरु झाले. धामनीच्या सुभेदाराकडे खबर उडत उडत गेली.

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 25/11/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ३ : ट्रेकची सुरुवात, घांगरीयापर्यंत

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 25/11/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १भाग २ गोविंदघाटातून पदयात्रा सुरु करण्याचा दिवस उगवला. स्नेहाने सगळ्यांना उठवण्याची जबाबदारी पार पडली. i1 रात्री तिथे पोचल्यापासून आम्हाला पाण्याचा खळखळ आवाज ऐकू येत होता. तिथे नदी होती हे तर माहीतच होतं. पण ती नदी आमच्या अगदी समोर होती हा साक्षात्कार आम्हाला पहाटे जरा उजाडल्यावर झाला.

गिलोटिन

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 25/11/2015 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
अल्लड भासांना तू काजळमोही फुंकर घातलीस अन भासांचे फुललेले वासनानिखारे झाले, जाळायला लागले सर्वांग अन् दाह सर्वदूर पसरले अज्ञातात, मग शरीर मशाल होवून जळायला लागले. पतंगाने दिव्याभोवती घिरट्या घालून जोहार करावे तसे शरीर संभोगजोगवा मागत रानोमाळ मुक्तीसाठी भटकत असताना शांती मनो-याच्या घंटा आकाशव्यापी टाहो फोडत परतीच्या हाका घुमवू लागल्या दुर्दैव इतकेच संमोहनपटलाच्या गर्तेतले शरीर बधीर झालेले प्रतिसादास प्रतिकूल.

"चक्रव्यूह"

लेखक भानिम यांनी बुधवार, 25/11/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
रुतलेला मी खोल चक्रव्यूहात "मी" पणाच्याच खेचणारं आकर्षण चक्रव्यूहाच्या केंद्रात केलेली प्रत्येक कृती उचललेलं प्रत्येक पाऊल परिघात चक्रव्यूहाच्याच सभोवती रिंगण नात्यांचं हा, ही, हे, तो, ती, ते, तेही जोडलेले एकमेकांशी Covalent बॉन्डने "मी" पणाच्याच आहेत ही नाती निरर्थक की तेच सत्य? घडू पाहतो स्फोट पण घडत नाही कारण कवच घट्ट "मी" पणाचंच एक कळ तीव्र छातीत, डाव्या हातात समोर आहेस का तूच? आहेस तू absolute?
काव्यरस

आमिर आणि शाहरुख

लेखक चिनार यांनी बुधवार, 25/11/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा.

सिंहलव्दीपाची सहल : ०२ : औकानाची बुध्दमूर्ती

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 25/11/2015 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...

पावडर कथेला विलंब

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 24/11/2015 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही नेटवरती घडले.

कोथिंबिर वडी

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 24/11/2015 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
बाजारात कोथिंबिरीचे ढीग जागोजागी दिसू लागले की कोथिंबिर वड्यांचा बेत हमखास होतो. जपानमध्ये ती दृष्टीसही पडायची नाही. तर जर्मनीत कधीमधी मिळायची, पण हल्ली आमच्या गावात भारतीय, तुर्की, श्रीलंकन दुकानातून चांगली कोथिंबिर मिळते. त्यामुळे हवी तेव्हा कोथिंबिरवडी करता येते. ह्या दिवाळीला खूप वर्षांनी भाऊ भेटणार होता आणि त्याच्या गावात फार कोथिंबिर मिळत नसल्याने त्याच्यासाठी ह्या वड्या केल्या. तर ह्याकरता लागणारे साहित्य- १ जुडी कोथिंबिर, १ टे.

दोन वेडे - उपसंहार

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 24/11/2015 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला! त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला! डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता! शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत! भारत अमेरिका युद्ध! जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते! "सर आपल्यासाठी पत्र आले आहे" बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले! "लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते! त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!