नमस्कार,
गेले काही दिवस मला सातत्याने 'पावडर' कथेच्या दुसर्या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी कथा पुढे सरकवण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी ही कथा सुरु केली तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील लेखनापासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले नेटीझन्स अशा प्रकारच्या माहितीसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो.
वर्षभरात बरेच काही नेटवरती घडले. कुठेतरी नेट साक्षरता, सुरक्षीतता ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या लेखनाला हात घातला. मात्र अशा लेखनाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या लेखनाला चाप बसली आहे. खाली काही बातम्यांची कात्रणे देतो आहे. मी कथेचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही.
डार्कनेट विषयी पुढे लिहीण्या आधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, इंग्रजी तसेच अन्य बर्याच भाषांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या धोक्याची ओळख आणि प्रगल्भता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या लिखाणामागे होते आणि राहतील.
कथेचा आत्मा सोडून किंवा बदलून लिखाण करण्यात मला स्वारस्य नाही आणि वाचकांची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे लिखाण करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच.
धन्यवाद.


वाचने
10280
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
डार्कनेट वाईटच आहे. जर ते
डार्कनेट वाईटच आहे. जर ते चुकीच्या हातात पडले तर
In reply to डार्कनेट वाईटच आहे. जर ते by मांत्रिक
हम्म
डार्कनेट मुख्यतः ऑनियन अॅप
In reply to हम्म by पैसा
ह्म्म..
आमाला अजुन नेट च कळत नै,तर
निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन.
तुला योग्य वाटेल तेंव्हा
+१
In reply to तुला योग्य वाटेल तेंव्हा by रेवती
है श्या
In reply to तुला योग्य वाटेल तेंव्हा by रेवती
पण अधेमधे दुसरं काहीतरी लिही की!हे जास्त महत्वाचे.हो ना
In reply to है श्या by चिंतामणी
अनुमोदन
हल्लीचे वार्ताहर आळशी झाले
हल्लीचे वार्ताहर?
In reply to हल्लीचे वार्ताहर आळशी झाले by pacificready
व्हिएतनाम ची लिंक आहे का
In reply to हल्लीचे वार्ताहर आळशी झाले by pacificready
परा
लिही रे....
च्यायला
बिनशर्त अनुमोदन
अखिल मिपा "क्रमशः सांगून मध्येच लटकविलेल्या कथा मालीकांचा , अर्धवट ठेवलेल्या लेखांचा" वाचक-आस्वादक संघाकडून जोरदार मागणी
परा साहेब - टोरंट हा ह्या
काय हे! श्या... :(
सोरी हां साहेब!! निराशाच
In reply to काय हे! श्या... :( by असंका
चला माझी शंका खोटी ठरली.
आता परत लिखाण चालू केलाच आहे
अस
पराला
In reply to अस by मिसळलेला काव्यप्रेमी
पराला
In reply to अस by मिसळलेला काव्यप्रेमी
असो.
+१ अन्य कुणीतरी हे कारण दिलं असतं
In reply to असो. by आतिवास
हाहा
In reply to असो. by आतिवास
ठ्ठो =)) =)) =)) क्या मारा
In reply to असो. by आतिवास
हा पण यान्गल विचारात
In reply to असो. by आतिवास
अन्य कुणी
In reply to असो. by आतिवास
लोल!
In reply to असो. by आतिवास
वेल...
In reply to असो. by आतिवास
नो प्रॉब्लेम
"काल्पनिक" असा शिक्का मारलेले
क्रमशः वर मी काही बोलणं
पटलं..
परा साहेब त्या 'भन्नाट' ला पूर्ण करा ना!!!
आणि हो
गोष्ट लिहायला हरकत अजिबात
तुमच्या निर्णयाला अनुमोदन