Skip to main content

सुटलेल्या पोटाची कहाणी -४

लेखक Anand More यांनी मंगळवार, 08/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ __________________________________________________________________________________ जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.

वंशशोध

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 08/12/2015 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
त्या करुण हाकासुध्दा त्याला रोखु शकल्या नाहीत तो खोल, खोल अगदी खोल गर्तेत शिरत होता, प्राक्तनाच्या फुटक्या काचभांड्याचे चरे पायात शिरत असताना देखील ! माणसाच्या मुळाच्या उगमापर्यंत जाउन आलेला तो सनातन सत्य वाहत दुर्बोधाच्या जाणिवा नाकारत अज्ञात काळगुहेत शिरत प्रलयंकारी भविष्यकाळास आव्हान देत होता ! परंपरांच्या ओझ्यांचे जोखड मानेवर काही वळ ठेवून होते जे नाकारतोय त्याची जाणीव धिक्कारलेल्या नजरांचे आसुड सार्यारचे मिश्रण ओराखड्यांचे अनाकलनीय चित्र रेखाटत होते ! वंश बुडाल्याचे दुख कधीच नव्हते जिथे शेपुट गळाली अन् माणुस दिसला त्या जागेच्या शोधात कधीतरी परागंदा व्हावेच लागणार होते ! कालवृक्षाच्

सावली

लेखक संतोष तादंळे यांनी मंगळवार, 08/12/2015 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
पोटा पेक्षा मोठा कसलाच नाही गुन्हा चिपाटा सारखी छाति त्यात कसला पान्हा। भेगाळलेल्या भुईच्या खुणा अंगभर् वाहते अल्बम मधली हसरी ,लाजरी माय कुठ राहते? लव्हाळा सारखा तरणा बाप पराठी सारखा खंजर होतो निधड्या छातीत आग घेऊन डोळ्यांत डोह दाटूंन राहतो। नदी काठचे अटले झरे शिवार मरणासन्न झाले पाहणी साठी राजे आले हिरवे कुरन चरुंण गेले तुमच्या खोलीत गारवा आहे बाग ही तुमचा हिरवा आहे आमचिच कशी धूळ पेर झाली? इथ्,कुणाची माय व्याली? भरल्या दिशी चिंध्या खोसुन शेतात जातात या पोरी आदानीच्या लेकानो पिकुन बघा मन भर ज्वारी कणसा सारखी मान मोडून धरणीला पाय रोऊन बसतो पॅकेजच्या घोषणा होतात आमच्या छातीत काटा
काव्यरस

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

लेखक भानिम यांनी मंगळवार, 08/12/2015 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या लेखांच्या लिंक्स - भाग १ - http://www.misalpav.com/node/33804 भाग २ - http://www.misalpav.com/node/33845 भाग ३ - http://www.misalpav.com/node/33873 भाग ४ - http://www.misalpav.com/node/33927

प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती - भाग ५

राजेंद्र चोल (पहिला) याने दक्षिण भारत आणि उत्तर-पूर्व भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली हे आपण मागील भागात वाचले.

तुझ्या माझ्या वाटेवर.....

लेखक सुमित_सौन्देकर यांनी मंगळवार, 08/12/2015 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या माझ्या वाटेवर, पुन्हा एकदा भेटू कधी इथे कधी तिथे, खेळ भातुकलीचा थाटू नको संगे चिंता सार्या, सर्व मागे ठेवून येऊ तुझे माझे विश्व सारे, त्याच्यातच राहू नाही घरी जाण्याची आता कोणतीच घाई तुझा माझा हात हाती, सारं सारं मागे राही तुझ्या माझ्या सहवासात, सखे अमृताची गोडी रुसल्यावर सये, मला तुझी लाडीगोडी मला तुझ्या भेटीची ग, आस आस लई भारी माझी नाही वेडे, तुझीच हि किमया सारी आता कुठे राहत नाही, वेळेचाही भान तू दूर जाता, फक्त विचारांचे थैमान नको भांडू आता, थोडा थोडा गोड बोलू आसवांचं पुरे आता, नयनांचे खेळ खेळू आठवांच्या सागरात चाल, पुन्हा एकदा भिजू संगे संगे सये, लक्ख चांदण्यात
काव्यरस

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 08/12/2015 00:14 या दिवशी प्रकाशित केले.

मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व


            "मुरली खैरनार गेलेत" असा प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांकडून आलेला sms वाचताच माझ्याच मुखातून शब्द बाहेर पडले "हे राम!"

रॉयल कॅफेसाठी मदत हवी.

लेखक विलासराव यांनी सोमवार, 07/12/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला रॉयल कॅफेसाठी वॉटर फ़िल्टर \कूलर, एअर फ्रायर\माइक्रो ओवन, वेफर्स अथवा सलाद बनवन्यासाठी काय वापरावे ही माहिती हवी आहे. काय योग्य राहील. फ्रायरचे आणि ओवनचे फायदे तोटे. वॉटर फिल्टरचे पाणी खरोखर काही शारीरिक नुकसान न करणारे असते का? अशी चर्चा अपेक्षीत आहे. झालाच तर सहज सोप्या पण टेस्टी आणि नाविन्यपूर्ण स्नैक्स च्या रेसिपीज सुचवल्यात तर सोने पे सुहागा. #मिपाच्या नियमात बसत नसेल तर धागा अप्रकाशीत केला तरी चालेल.

दूर तू दूर मी

लेखक माहीराज यांनी सोमवार, 07/12/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।। जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
काव्यरस

वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ???

लेखक ए ए वाघमारे यांनी सोमवार, 07/12/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा चिरेबंदी- गॉन विथ द विंड ??? मध्यंतरी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नव्या संचातील पुनरूज्जीवित 'वाडा चिरेबंदी' बघण्याचा योग आला. हे नाटक मी याआधी वाचलेले होते. परंतु नाटक वाचणे वेगळे आणि प्रत्यक्ष सादरीकरण वेगळे. मागच्या वेळेस चंद्रकांत कुलकर्णींच्यांच दिग्दर्शनात या नाटकाचे प्रयोग झाले तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो. त्यामुळे आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या आमच्या पिढीला भारतीय रंगभूमीच्या वाटचालीत मैलाचा दगड असलेले हे नाटक प्रत्यक्ष मंचावर पाहायला मिळेल अशी आशा नव्हती.

अपरिचित!

लेखक निनाव यांनी सोमवार, 07/12/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व माझे ओळख कुणाची, नाव माझे दिले कुणी ? कुठला पत्ता सांगू मी गंतव्य माझे मलाच अनिश्चित ! कुणास ठाऊक कारण माझे कुणास ठाऊक स्वप्न सारे पहिले कुणी माझ्या साठी अपेक्षा पूर्ती कुणास कुणाची, असंख्य वेढे घेतले कुणी वडास त्या अपरिचित मी !
काव्यरस