Skip to main content

चिकनी चमेली

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 19/12/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
खुप पुर्वी मीमराठी.नेटच्या एका लेखनस्पर्धेसाठी ही कथा लिहीली होती.मी मराठी नेट तर्फे घेतल्या गेलेल्या "मी मराठी नेट लेखन स्पर्धा २०१२" मध्ये माझ्या या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. प्रख्यात स्तंभलेखक आणि पत्रकार श्री. श्रीकांत बोजेवार उर्फ़ तंबी दुराई हे परीक्षक होते. कशी कोण जाणे मिपावर टाकायची राहुनच गेली होती.. ************************************ "ए हिरो वो देख, आ गयी तेरी 'चिकनी चमेली'?" राज्याने रोहनच्या पोटात कोपराने ढोसत खुसखुसत सांगितले तसे रोहनने त्या दिशेने पाहीले. चमेली नेहमीप्रमाणेच चमकत होती.

घोस्टहंटर-४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 19/12/2015 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता. एक माणूस शांतपणे सिगार पीत होता! बाहेर कार येऊन थांबली. कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला! "मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!" "सॉरी ग्रेग." "तू मी दिलेले कागद वाचलेस?" "हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे." "म्हणून मी तुला इथे यायला लावलं." मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला. "पण मला याचा मार्ग सापडला आहे!" ग्रेग उडालाच! "मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!" "मी जोक करत नाहीये.तुला ती अन्ड्रिआ कुठे भेटेल हे बघायच होतं ना!" "हो आणि?" "ती तुला भेटेल, मात्र एकच ठिकाणी!" कुठे?

रतनगड कातळभिंत चढाई - २०१५

लेखक सतीश कुडतरकर यांनी शनिवार, 19/12/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
रतनगड कातळभिंत चढाई - २०१५ कात्राबाई, कळसुबाई, घनचक्कर वगैरे डोंगररांगांनी आपल्या कुशीत सांभाळलेलं अपत्य म्हणजे दुर्गरत्न 'रतनगड'. एका टोकावरून 'आजा' ही त्याजवर आपली कृपादृष्टी ठेऊन उभा आहे. रतनगड ते हरिश्चंद्रगड जाणाऱ्या यात्रेकरुंमुळे अधिकचे वलय या गडाला लाभले आहे. अशा या वलयांकीत गडाला सध्या मानवी अवकृपेने ग्रासले आहे. राबता वाढल्याने गडावर जागोजागी मलविसर्जन केले जाते, अगदी कालपरवापर्यंत आम्हीही त्यातलेच होतो. लोकांनी पाण्याचे टाके सुद्धा सोडलेले नाही. मुंबई-पुण्याची काही जाणती मंडळी सोडल्यास ट्रेकर्सनी गावातली हागणदारी गडावर आणली आहे.

व्यवसाय आणि छंद यांचा आनंददायी समतोल

लेखक कल्पक यांनी शनिवार, 19/12/2015 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हाला कोणतीही आर्थिक जबाबदारी नसेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्हाला केवळ आवड म्हणून आयुष्यात काय करायला आवडेल?" असा प्रश्न मी अनेक मित्रांना विचारतो आणि जी उत्तरं मिळतात ती आणि उत्तरं देणाऱ्या लोकांचा सध्याचा व्यवसाय/नोकरी यात बरेचदा ताफावत आढळते. अर्थात आर्थिक/कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपलब्ध होऊ शकलेल्या संधी या चौकटीत प्रत्येक जण काहीना काही धडपड करत असतो, प्रगतीच्य दिशेनी वाटचाल करत असतो. सातत्यानी नवीन गोष्टी शिकत राहणं आणि प्रगतीसाठी सकारात्मक धडपड चालू ठेवणं अशा वृत्तीतूनच अनेक माणसं मोठी झालेली आपण पाहतो. लहानपणी वाचन, लेखन, संगीत आणि चित्रकलेची आवड होती.

व्यथा एका कठपुतळी राजाची

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/12/2015 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कठपुतळीचा खेळ सर्वांनाच आवडतो. मलाहि आवडतो. विशेषकरून राक्षसाच्या तावडीतून सुंदर राजकुमारीची सुटका करणारा राजकुमार. हा खेळ बघताना सर्व खरेच वाटायचे. स्वप्नात हरवून जायचो. असे वाटायचे, राजकुमारीची सुटका करण्यासाठी मीच त्या राक्षसाची युद्ध करतो आहे. पण कधी-कधी जोरात वारा आला कि परदा हवेत उडायचा आणि कठपुतलीनाचविणार्याचे हात दिसायचे. क्षणात स्वप्नभंग व्हायचे, हे काही खर नाही, याची जाणीव व्हायची. एकदा भरपूर जनता जमली कि कठपुतलीचा खेळ दाखविणारे सरकारी धोरणाचा हि प्रचार करायचे. कथा नेहमीचीच, राजा आपल्या प्रधानाच्या सोबत जनतेचे कष्ट दूर करण्यासाठी घोड्यावरून राज्याचा दौरा करायला निघतो.

रामान लंका केन्नाच जाळली.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 19/12/2015 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडे आपल्याला सोनारांची मोठी मोठी दुकानं,शोरूम्स, दिसतात.परंतु पूर्वी तसं काही नव्हतं. सोनाराच्या पेढ्या असायच्या.अजूनही कदाचीत खेडेगावात मी म्हणतो तशा पेढ्या असतीलही. मी पूर्वी एकदा गोव्यात गेलो होतो,सोनाराच्या पेढ्यासंबंधाची मला आठवण आली. तात्या पेडणेकरांची अशीच एक पेढी होती.घराच्या पुढच्या भागात पेढी आणि मागच्या भागात रहाण्या खाण्याची सोय असायची.पुढच्या भागातल्या ह्या पेढीत बैठकीच्या समोर एक भट्टीवजा शेगडी असायची.