झोंबी - आनंद यादव
असचं कधीतरी, कोणीतरी वाचनासाठी सुचवलेलं. वाचायला हातात घेतल आणि मग वाचून पूर्ण होईपर्यंत ध्यासवेडीच होऊन गेले.
आनंद यादव या व्यक्तीचे बालपण अतिशय प्रखर परिस्थितीतून गेलेय. हा बालपणी सोसावा लागलेला संघर्ष वाचताना डोळ्य़ातून अश्रूधारा वाहू लागतात.
घरची बेताची परिस्थिती, त्यातच जोडीला ९ भावंडे. शाळेला जाण्याचा विचार करणेही जेथे गुन्हा ठरले होते, त्या घरातून एक ध्येयवेडा मुलगा शिक्षण पूर्ण करुन, डॉक्टर आनंद यादव होतो.
आन्द्याचे शिक्षण इयत्ता चौथी पूर्ण होताच बंद केले गेले. नंतर त्याला शेतकीच्या कामामधे वडिलांच्या हाताखाली झिजावे लागले.
मिसळपाव