Skip to main content

पश्मीना

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी शनिवार, 09/01/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नदीवाकल्या पाउसचिंब झाडाला वा-याने ढुशी द्यावी अन सारे तुषार पाण्यावर झंकारून तरंग उमटावे तसं काहीसं आठवणींच असतं, कुणीतरी समोरून जातं मग सारी आठवणींची वर्तुळं आयुष्य व्यापून टाकतात. सतत स्वप्नात दिसणारं कुणीतरी समोर दिसतं अवचित तसं ते तिथच असतं मग जाणवतं अरे हे तर तेच ! मग पानगळाल्या हिवाळ्यातल्या झाडावर साठलेल्या दवांसारखं उन्हात चमचमून सारं प्रकाशोत्सवासारखं होतं.

मुळयाची पचडी आणि भाजी

लेखक अनन्न्या यांनी शनिवार, 09/01/2016 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
या सिझनला लाल माठ, मुळा, नवलकोल अशा पालेभाज्या कोकणात मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. आमच्याही बागेत सासर्‍यांनी मुळाभाजी पेरलीय छान कोवळी भाजी आता तयार होऊ लागलीय. mula मुळ्याची पचडी साहित्यः मुळ्याच्या जुड्या दोन, अर्धे लिंबू, दोन्/तीन ओल्या मिरच्यांचे तुकडे, मीठ, साखर, शेंगदाण्याचे कूट पाव वाटी, फोडणीचे साहित्य. कृती: मुळ्याचा कोवळा पाला स्वच्छ धूऊन घ्यावा. यासाठी मुळ्याचा कंद अजिबात नसलेला किंवा अगदी बारीक कंद असलेला पाला वापरावा.

आपल्या iphone & ipad साठी

लेखक NiluMP यांनी शनिवार, 09/01/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
Android and Lumia साठी एक पान खर्ची घातलेच आहे. Apple Product ची माहिती संग्रहीत व्हावी या उद्देशान हा लेख लिहीत आहे. ipad mini 4 विकत घेण्याचा विचार चालू आहे. त्यासंर्धबात काही प्रश्न आहेत ते पुढीलप्रमाणे: मी OTG cable वापरु शकतो का? Android चे free app आहेत ते iphone or ipad साठी मिळतील का? Jail Break केल्यानंतर warranty शिवाय इतर काही नुकसान? आपलेही काही प्रश्न व आपल्याकडील माहिती शेयर करावी ही नम्र विनंती.

'मी' च !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 09/01/2016 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य विंदा करंदीकर यांची क्षमा मागून त्यांच्या ' मी ' या कवितेचे विडंबन .. मी'च ! कधी येत अस्वस्थता अंतरीची कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो बार गाठावयाला कधी मद्य प्याला स्वहस्तेच चापी कधी याचितो रम कधी स्वप्नी व्हिस्की कधी धावतो जीन टाकून थोडी कधी प्राशितो जॅक डॅनियल भारी कधी गावठी हातभट्टीच मागे कधी दिनवाणा 'निरा'मय होई कधी क्षुब्ध, आतुर , आत्मविलासी कधी गर्जतो वोडकेच्या बळाने; कधी कापतो बोलता पालकांशी ! कधी चाखणा रिक्त थाळ्यांत शोधी; कधी पाहतो शुभ्र लवणात सारे; कधी मोजीतो टेबलाला स्वहस्ते अनुकूल होती मित्र-दोस्त सारे सरेना अंधकार डोळ्यासमोरी मिळेना अंत्यपुच्छ धुम्रपट्टीकेचे;
काव्यरस

आम्ही व्ही एस एल वाले

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 09/01/2016 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही व्ही एस एल वाले मी गेली २ वर्षे मिपा चा वाचक आहे.पण लिहितो पहिल्यांदाच आहे. काही चुकलं तर सांभाळून घ्या. शीर्षकातून काही बोध झाला नसल्यास उलगडून सांगतो.व्ही एस एल म्हणजे Visual spatial Learner (याला मराठीत काय म्हणतात?) शिकण्याच्या ३ शैली आहेत. कोणतीही व्यक्ती एखादी गोष्ट शिकताना खालील ३ पैकी एका शैलीद्वारे शिकत असते. व्हिज्युअल स्पेशिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन द्रुश्य माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं. ऒडिटरी सिक्वेंन्शिअल: यांना कोणत्याही संकल्पनेचं,माहितीचं आकलन ऎकण्याच्या माध्यमाद्वारे सर्वात चांगलं होतं.

दिनुची प्रेमकथा भाग १

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 08/01/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
दिनुची प्रेम कहाणी ( एक सत्य कथा ) भाग १ आज दिनु थोडा ऊदास दिसत होता . रवी ने त्याला नाराजीच कारण विचारल पण दिनु आज काहीच बोलत नव्हता मुकाट्याने टेकडीची वाट चढत होता त्याच्या पाठीमागे रवी ,, शेवटी रवीने त्याचा हात पकडला व त्याला खोदुन विचारले तेव्हा कुठे दिनु ने तोंडातुन उच्चार काढला अगदी बारीक आवाजात तो बोलला ' अरे रवी काल तिला बघायला स्थळ आल होतं रे ! ओ हो अच्छा तर हे कारण आहे माझ्या मित्राच्या नाराजीच ,, अरे रवी तुला मजाक वाटतोय का ? अरे मी तिच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती तर जीवच देईल कारण कालच ती मला म्हणाली होती .

गप्पा संस्कृती

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 08/01/2016 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं अगं…समोर बघ…लागलं ना गुडघ्याला…!" गप्पांमध्ये रमली ना कि कशाचं म्हणून भान नसतं मिनू ला….अगदी डोळ्यांची बटणं होतात, हाताची बोटं दुखून येतात, खांदे, मान भरून येते…पण जरा म्हणून शुद्ध नाही या मुलीला. काकूंची हल्ली ही नेहमीची कानावर पडणारी तक्रार…चालता चालता हातातल्या mobile वर गुंतलेल्या नजर आणि मनामुळे समोरचं भलं मोठ्ठं टेबलही मिनुला त्या ४.५ इंच mobile स्क्रीन च्या प्रकाशात दिसलं नव्हतं.

मी

लेखक माहीराज यांनी शुक्रवार, 08/01/2016 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी नशिले फुलपाखरु, जे वार्यावर भिरभिरते... मी शितल जल मृगजळीचे वाळुत ही खळखळते... ढगाळलेल्या आभाळागत आसमात गडगडते... कळ्या कळ्यातुन फुलांबरोबर अशीच मी बडबडते... मी अबोली पाऊलवाट रानावनांतुन भिरभिरते. मी नवेली एक पहाट फुलाफुलांतुन उलघडते.. कधी धुंद धुंद या पावसात मी चिंबचिंब भिजुनी जाते... कधी मंद मंद ही चांदरात मी स्वप्नगंध देऊन जाते... तार्यांसवे लखलखते मी मोत्यांसवे चमचमते मी कधी अडखळते मी, धडपडते मी तरी पुन्हा पुन्हा सावरते मी सांभाळ जरा स्वत:ला      ही प्रित माझ्या मनाची... जाणुन घे रे मजला      मी रीत नवी जगण्याची...
काव्यरस

कोण ?

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 08/01/2016 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळी कडे मिट्ट काळोख होता. दिनु आपल्याच नादात शेताला पाणी भरत होता .रात्रीचे ११ :४७ झाले होते .गावाकडे लाईट ऐन वेळी येते हे तर सर्वांना माहीतच आहे . दिनु ने खिशातुन माचिस काढली आणि जमलेल्या काड्या काटक्या आणि गवत पेटवले . , जानेवारीचा महिना होता त्यात रातची थंडी पण भयंकरच होती. वाफ्यातुन पाणी संथ गतीने वाहत होते. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. दिनु तसा धीट मुलगा होता . पण कधी कधी त्याची पण.... ची. तो आजही पाणी भरायला येत नव्हता पण बापाने दोन कानाखाली वाजवल्या म्हणुन आला होता.