Skip to main content

थोडंस मनातलं...

लेखक लाडू. यांनी सोमवार, 25/01/2016 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय ‘तू’ ला, आज म्हटलं चल एक पत्र लिहू तुला. कस वाटतंय पाहू. तशी मी फार obessed आहे प्रेमपत्र वैगरे बद्दल. पूर्वीच्या कथा, कादंबऱ्या, कोणाचे अनुभव, किंवा चित्रपटामधूनसुद्धा असे उल्लेख आले कि शहारून येत. कोणी कोणासाठी गुलाबी कागद वैगरे घेऊन, इतकं छान छान विशेषणे वापरून लिहित असेल तर ते आयुष्यभरासाठी कोणीही जपून ठेवेलच ना. (ते मग कोणाला सापडलं कि वाजलेच बारा.. अस काहीतरी सांगून माझा रोमांटिक मूड प्लीज खराब करू नकोस. मी प्रेमपत्र लिहायच्या सॉल्लीड मूड मध्ये आहे) तू मला हे असलं कधीही काहीही दिलेलं नाहीस याचा प्रचंड राग तर आहेच. पण आता मी लिहितेय ना, तर शांतपणे वाचायचं.

मोल्टन चॉकलेट केक

लेखक असंका यांनी सोमवार, 25/01/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
. मी आणि माझ्या मुलीनं मिळून यू ट्युब वर बघून बघून हे केलं. अनेक प्रयोग करून जमलेलं असल्याने, साहित्य जरा अंदाजानेच घेतलंय. त्यामुळे "हे सोपं आहे" हे समजून देण्यापलिकडे किंवा मार्गदर्शक म्हणून या पाककृतीचा उपयोग जरा लिमिटेड आहे. आवश्यक उपकरणं: कंवेक्शन मायक्रोवेव्ह ओवन उपकरणं जी असतील तर उत्तम पण नसतील तर दुसरं काही वापरता येइल: १. काचेचे मिक्सिंग बोल- दोन. अ. एक बोल मिक्सिंग साठी.

आमचं एकत्र मालवणी भोजन.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 25/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.” बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती. ” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा” असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.” गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता. “तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.” मी गुरूनाथल म्हणालो. “तु

सोने की चिड़ियां

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 25/01/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ५

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 25/01/2016 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग पुढे.. पुढे... अजून पुढे.... पण कुठवर जायाचे? चांगला रस्ता लागल्यावर जनता झोपली. पहाटेचे पाच वाजत होते. रस्ते चांगले असले तरी धूळधाण उडत होती. ट्रक्सचा गराडा होताच. आता फार बाका प्रसंग येऊन ठाकला. मला चक्क झोप येत होती.

गुरु (मराठी)

लेखक समीर_happy go lucky यांनी सोमवार, 25/01/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
गुरु (मराठी) मराठीतले करिष्माई दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘दुनियादारी’ आणि ‘तू ही रे’या मागील वर्षीच्या सिनेमांच्या यशानंतर आता ‘गुरू’ हा नवा सिनेमा घेऊन आलेले आहेत. मराठी सिनेमाचा एकूणच प्रेक्षकवर्ग बघता हा सगळा इत्यंभूत विचारशील प्रेक्षकवर्ग असतो त्यामुळे दक्षिण भारतीय पद्धतीच्या कथा पडद्यावर मांडल्यावर प्रेक्षक कितपत प्रतिसाद देतील हे बघण्यासारखे राहील. दुनियादारी अन तू हि रे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून गेले. कदाचित त्यामुळे या चित्रपटाची पब्लिसिटी इतर मराठी सिनेमांपेक्षा भरपूर होत असल्याचे जाणवले.

एअरलिफ्ट

लेखक Anand More यांनी रविवार, 24/01/2016 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
एअरलिफ्ट पाहिला. तो बघायचा हे तर ट्रेलर बघतानाच ठरवलं होतं. काल रात्री एका मैत्रिणीने आणि आज सकाळी एका मित्राने अल्पाक्षरी रिव्ह्यू दिला होता. "छान आहे. आवडला. तू नक्की बघ." म्हणून. त्यामुळे आज सकाळी तिकीट मिळणार की नाही या धाकधुकीत असताना संध्याकाळच्या शो ची तिकीट हिने काढून आणली आणि पिक्चर बघायला गेलो. पिक्चर बघत होतो. आणि अनेक गोष्टी एकामागून एक आठवू लागल्या. १९९० म्हणजे मी ९ वीत होतो. तेंव्हा रात्री बातम्यांमध्ये युद्धाचे काही प्रसंग दाखवायचे. शुक्रवारी रात्री लागणाऱ्या वर्ल्ड धिस वीक मध्ये अजून जास्त. पण ते सगळे रात्रीचे प्रसंग असायचे. अंधारात उडणारी स्कड मिसाईल्स.