पूर्वेच्या समुद्रात --१६
पूर्वेच्या समुद्रात -- १५
अंदमानमध्ये असताना एक गोष्ट लिहायची राहून गेली ती येथे लिहीत आहे.
पोर्ट ब्लेअर च्या आसपास गस्त घालत असताना आमच्या जहाजाच्या हेलीकॉप्टरची माणसे/ सामान वर खेचायची मोटर आणि कप्पी याची चाचणी करायची होती.म्हणून पायलट आणि इंजिनियर यांची चर्चा चालू होती. त्यासाठी त्यांना ज्याला चांगले पोहता येत होते असा कोणी तरी सडपातळ माणूस हवा होता .
मी तेथेच उभा होतो आणि म्हणालो,"चला मीच येतो." त्यावर दोघे पायलट म्हणाले, "सर, तुम्ही"?
To मितवा, (पत्रास कारण की)
आज आरती याचं “राधे… . सृजन…” वाचनात आलं. आणि मग स्वत:ला थांबवताच आलं नाही. एकतर राधा-कृष्ण आवडतात मला. त्यात इतक सुंदर लिहिलेलं.खरच त्या सगळ्या भागांमध्ये रंगून गेले अगदी. लेख तर निव्वळ अप्रतिम. सगळच्या सगळ तस्स डोळ्यासमोर आलं. वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे तुला पाठवली लिंक. मला आवडलेलं साहित्य तुला आवडतच कायम. काही गोष्टींबाबत मतभेद असले [सगळ्यात आधी धुक्यातल चांदण] तरीही राधे आवडेल तुला याची खात्रीच होती. ५ मिनिटात तुझा मेसेज अपेक्षित होता. आणि तू केलासही. पण लेखाबद्दल काहीच न बोलता तू मला अचानकच विचारलस, ‘तुला कोमल रिषभ कळतो?’ आणि मला एक क्षण खरच काही कळल नाही.
[कोमल रिषभ कळतो मला.
काटा हालेना, काटा चालेना
मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा.
लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काव्यरस
नवविधवेचे नवर्यास पत्र
तू गेलास... बरं झालं. आणि लवकर गेलास ते आणखीन बरं झालं.
नाही तरी रात्री पिऊन पडायचास.....काय उपयोग होता तुझा? लग्नानंतर तुझं पिणं कमी होईल या आशेनं आई-वडीलांनी मला घरात आणलं. पण आधी बाहेर पिणारा तू , घरीच बाटली घेऊन बसायला लागलास, का तर म्हणे चखण्याचा खर्च कमी होतो.
मुलं तुला घाबरायची पण एकदाच मी, तुझी पोलीसात तक्रार करुन, इन्स्पेक्टर बोक्यांना घरी बोलावलं. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले ‘फोकलीच्या, पोराबाळांवर आणि बायकोवर हात टाकशिल तर गोमूत्र पाजीन !’ तेंव्हापासनं तू फक्त शून्यात नजर लावून प्यायला लागलास.
लदाख सायकल ने : तंगलंग-ला ते उप्शी (भाग ११)
लद्दाखी गुराखी ते पण घेऊन जातील. मी नको म्हटले. मनात म्हटले कि, साले तुम्हीच चोर आहात आणि दुसऱ्याच सांगता. ते तर डोंगर भागातले आहेत. त्यांना चोरी करता येत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच ५१३० मीटर उंचा वरती झोपत होतो. तुमच्या पैकी तर ९०% लोक एवढ्या उंचावर गेले पण नसतील. ह्या भागात फोटो कमी आहेत. कारण हि तसेच आहे सकाळ पासून जितका चाललोय तेवड्या बर्फाच्या थंड हवेतच चाललोय. हाथ मौजे काढून,कैमेरा चालू करण्याचा प्रश्नच नाही. आज फक्त १९ किमी सायकल चालवली.
दिवस तेरावा
सकाळी ७ ला आवाज ऐकून जाग आली.एका विधवेच नव-याला पत्र
आमच्या सरांनी FB टाकलेलं हेे पत्र....
एका विधवेचे नवऱ्याला पत्र.
प्रिय -----
काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 41 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे ,बायकोबरोबर गप्पगोष्टी, थट्टामस्करी करण्याचे वय. परंतु त्या सुखाला तू मुकालासच पण या आनंदाला तुझी बायको मुलंही पारखी झाली.
काय कारण होतं या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतो आहेस याचे तुला भानच राहिले नाही.
लग्न झाल्यापासून पाहतेय, तू कायम मित्रांच्याच गराड्यात cheers करत असायचास.
राजाच्या रंगम्हाली
राजाच्या रंगम्हाली, सोन्याचा बाई पलंग
रुप्याचा खांब, तेला मोत्याची झालर
राजाच्या रंगम्हाली, पराची मऊ गादी
जरीचा चांदवा, रेशमी शिणगार
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी ती रुसली
बोलना, हसना, उदास नजर
राजाच्या रंगम्हाली, राजानं पुशिलं
डोळयाची कमळं उघडा, व्हठाची डाळिंबं
गडनी, सजनी, गडनी सजनी गं
राजाच्या रंगम्हाली, रानी वो सांगिते
सुना सोन्याईन म्हाल, कशाला बडिवार
मायेच्या पूतापायी, रानी गं रडीते
असवांची गंगा व्हाते, भिजीला पदोर
गडनी, सजनी, गडनी सजनी गंs
गडनी-- गढनी..मैत्रीण
कवी योगेश यांची ही निनांत सुंदर रचना "साधी माणसे" या १९६५ सालच्या सिनेमात लता व उषा मंगेशकर यांनी गायिल
मामलेदार मिसळ पंढरी
काही दिवसांपूवी रविवारी सकाळी प्रिय पत्नीने नेहमी प्रमाणे स्वयंपाक या विषयाला फाटा दिल्याचे अधिकृत जाहीर केले.
गेल्या काही दिवसांपासून मामलेदार मिसळ मंदिराला भेट न दिल्याने मनाला रुखरुख लागून राहिले होती,(पूर्वी बी पी ओ मध्ये काम करताना सकाळी पाच वाजता सुटून , आम्ही सकाळी साडे पाचला मामलेदार मिसळ मंदिरात हजेरी लावत असू ) या घटने मुळे योग जुळून आला.
रविवारी मामलेदार मिसळ मिळत नसे, काही दिवसांपासून रविवारी सुद्धा पूर्ण दिवस हाटेल उघडे असते.
मी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)
भाग १
भाग २
भाग ३
_________________________________________________
सकाळी अलार्म व्हायच्या आधी उठू लागलो. अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. एक नवीन कारण मिळाले होते. जिमला जाण्यासाठी. घाम गाळण्यासाठी. ट्रेडमिलवर धावण्यासाठी. जास्तीची वजने उचलण्यासाठी. सिट अप्स मारण्यासाठी. Reunion - फुलराणी. जिममधून बाहेर पडून समोरच्या कबुतरखान्याजवळ लावलेल्या अॅक्टीव्हाला किक मारताना जेंव्हा कबुतरे उडायची तेंव्हा मला मी बाहुबली असल्याचा भास होऊ लागला. आणि कानात “धीवरा” गाणे घुमू लागले.
मिसळपाव