Skip to main content

मिसल पाव आवडले

लेखक प्रा.डॉ.शिवाजी अंभोरे यांनी सोमवार, 29/02/2016 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिसल पाव बद्दल पेपर ला वाचले आणि सदस्य झालो मला अर्थशास्त्र या विषयावर लेख वाचायला आवडतील मी मिसल पाव चे लेखन वाचतो आहे मिसल पाव समजुन घेत आहे

माझी धावपळ

लेखक बेकार तरुण यांनी सोमवार, 29/02/2016 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख ईतर संस्थळावर आधी प्रकाशित केलेला आहे. तसेच लेखात काही ईतर संस्थळांचे आणी सदस्यांचे काही संदर्भ आहेत. सं.मं. ला विनंती की जर हा लेख येथे अयोग्य वाटल्यास उडवुन टाकावा. --------------------------------------------------------------------------------- ह्या शनिवारी (२० फेब्रुवारी २०१६) मी मरिना रन २०१६ ही हाफ मॅरॅथॉन पूर्ण केली. त्या अनुभवाबद्दल आणी गेल्या अडीच तीन वर्षातील एकूण धावपळीबद्दल हा छोटेखानी(?) लेख ! पहिलाच प्रयत्न आहे माझा लिहिण्याचा, तेव्हा काही चुका असतील तर माफ करा, आणी काही सूचना असतील तर जरूर सांगा. पाप्याचं पितर हे नाव मला फार लहानपणापासूनच चिकटलं होतं.

मलपृष्ठ

लेखक अनाहिता यांनी सोमवार, 29/02/2016 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .credits { font-size:medium; text-align:center; margin-top: 2em; padding-top: 5em; padding-bottom: 2em; padding-right: 1em; padding-left: 1em; border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYQ/IsPTX3JDkZE/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("htt

लिंडेन ची बरणी

लेखक निळकंठ दशरथ गोरे यांनी सोमवार, 29/02/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
लिंडेन व त्याची पत्नी वैज्ञानिक प्रयोग करण्यात पटाईत होते. त्यांना एकेदिवशी Faraday आणि osterd ह्यांच्या प्रयोगविषयी कळाले. ते तारेचे वेटोळे बनवून विद्युत उर्जेचे चुंबकीय उर्जेत आणि नंतर चुंबकीय उर्जेचे रुपांतर विद्युत उर्जेत करत होते. त्यांचे हे अनोखे प्रयोग पूर्ण युरोपात जोमाने पसरत होते. त्यांच्या प्रयोगाची सखोल माहिती वाचल्या नंतर लिंडेनच्या तुलनात्मक मनाने काम चालू केले. जर Inductor हा चुंबकीय उर्जा साठवत असेल तर ह्या जगी असे काहीतरी असेल ज्यात विद्युत उर्जा साठवली जात असावी. हाच प्रश्न त्याचे आयुष्य बनले. खूप प्रयोग करूनही हाती काहीच लागले नाही.

पुण्यात...

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 28/02/2016 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात शनिवारवाड्यासमोर जो पुल आहे ना तिथे खुप गर्दी असते, गोंगाट असतो डुप्लिकेट पीनांचे चार्जर तिथे मिळतात ते अगदीच टाकाऊ असतात मला तो भाग आवडत नाही स्वारगेटला तुडुंब भरलेल्या पीएमटी बघितल्यावर मला भोवळ येते चिंचवडला प्रशस्त महामार्गावरील हॉटेलात पावाबरोबर फरसाण्याची भाजी खाल्ल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून मिसळपाव हा पदार्थ मी व्यर्ज केलाय बाकरवड्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही दगडूशेटला जाता जाता जोशी वडेवाल्याकडे मी ढुंकुनही कधी पाहत नाही येरवड्याला एकदा बाईक पलटी झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही कोथरुडला जायचा मात्र प्रसंगच कधी आलाच नाही रॅडीसनमध्य

तू

लेखक आनंदमयी यांनी रविवार, 28/02/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तू मेघ सावळासा घनदाट गर्द ओला तू चांदवा निशेच्या केसात माळलेला तू सूर बासरीचा दूरात गुंजणारा पहिल्याच पावसाच्या तू स्वैर धुंद धारा तू साद अंतरीची देहा सुखावणारी तू शीत शांत छाया ह्या पेटत्या दुपारी तू गंध रंगलेला दारातल्या कळीचा तू नाद गुंजणाऱ्या ह्या सोनसाखळीचा रे मी समूर्त आज सजले तुझ्याचसठी हळुवार लाघवी हे हासू तुझेच ओठी हा गंध चंदनाचा पुरता तुझ्या हवाली विरहार्त आसवेही सगळी तुझीच झाली मी एकली धरेशी तू स्तब्ध ध्रूव दूर तुजवीण मी तुझ्यात विणते सशब्द सूर जग हे जरी न माने असणे तुझे सख्या रे देहात ह्या वसे जो, तो प्राणही तुझा रे © अदिती जोशी
काव्यरस

किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ?

लेखक माहितगार यांनी रविवार, 28/02/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा लेख तसा केवळ अनाहितांसाठी मर्यादीत ठेवलेला नाही. या आठवड्या भरात 'कौटुंबीक टिमवर्क आणि नवर्‍यांचे जोखीम व्यवस्थापन' असा काहीसा कडबोळे विषय चर्चेस टाकण्याचा मानस आहे :). पण तत्पुर्वी किचन मॅनेजमेंट ! , म्हणजे कसे आहे ज्या घरी किचनची जबाबदारी पुरुषांची असते तेथेही बहुधा किचन रचना आणि व्यवस्थापनाचा अंतीम निर्णय घरातील स्त्रीकडेच असण्याची शक्यता अधिक (घरजावयांना किचन व्यवस्थापनात किती से मिळतो माहित नाही ;) असो). आणि बरे स्त्रियांचा से का असु नये ?

वीरगळांच्या शोधात

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 28/02/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
a २००२ सालचा साधारण मार्चचा महिना. आता नक्की आठवत नाही, पण तेव्हा नासिकवरुन रतनगडला निघालो होतो. घोटीनंतर एक घाट चढून कळसूबाईच्या पायथ्याचं गाव बारी गाठलं. तिथून शेंडी. शेंडी हे भंडारदरा धरणालगतचं गाव. तिथून रतनवाडी साधारण २० किमी. २००२ साली हा भाग फारच दुर्गम होता. वाहतुकीची साधनं अत्यल्प होती, रस्ताही खूप खराब आणि बराचसा कच्चा होता. शेंडीवरुन तेव्हा जवळपास पाऊण तास लागला होता रतनवाडीला पोहोचायला. वाडीच्या सुरुवातीलाच अमृतेश्वर मंदिर.

कुण्या देशीचे पाखरू

लेखक शरद यांनी रविवार, 28/02/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुण्या देशीचे पाखरू तारुण्यात पदार्पण करतांना युवतीच्या मनांत एक नवी हुरहुर सुरू होते. शालेय मैत्रीणींच्या सोबतीतले रम्य दिवस आता थोडे मागे जात असतात. नवीन काय मिळणार आहे, आपला शोध काय ? याचाही पुरता अंदाज आलेला नसतो. नवीन मित्र जोडलेले नसतात. पण त्यांच्याबद्दल, प्रेम.... नाही प्रेम म्हणता येणार नाही, ओढ म्हणावी कां ? तसच काही तरी म्हणा पाहिजे तर. " जायेंगे कहॉ सुझता नही ! चल पडे मगर रास्ता नही ! क्या तलाश है, कुछ पता नही !! अशा विभ्रमावस्थेतली अस्फुट मनोवस्था कवी सुधीर मोघे यांनी पुढील कवितेत अतिशय तरल, हळुवार शब्दात पकडली आहे.