Skip to main content

स्लोवाकिया आणि वेलिक्झा साल्ट माइन क्राको पोलंड

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 02/03/2016 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वर्षी मे जून महिन्यात कामानिमित्त स्लोवाकिया येथे जाण्याचा योग आला. तेव्हा पोलंड मधील वेलिक्झा साल्ट माईन ला भेट दिली या स्लोवाकिया आणि पोलंड भेटीचा संक्षिप्त वृत्तांत काही छायाचीत्रासहित येथे देत आहे. सुरुवातीला स्लोवाकियाविषयी : स्लोवाकिया हा मध्य युरोपातील एक प्रगत देश. वास्तविक झेक आणि स्लोवाकिया मिळून झेकोस्लोवाकिया हे गणराज्य अस्तित्वात होते परंतु १९९३ मध्ये हे गणराज्य शांतीपूर्ण रितीने भंग पावले व झेक आणि स्लोवाक असे दोन देश झाले.

विषय

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले, पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले, हे शिकून तरी काय कळले, आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले, ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले. भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण, विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण, ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन, त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून. विज्ञानाच्या तासाला,न्यूटनचे नियम सतत रटत गेलो, प्रत्येकाच्या क्रियेला,सडेतोड प्रतिक्रिया आयुष्यभर देत गेलो, शब्दांच्या जाळ्यात स्वतःला खोल फसवत गेलो, विचारु कुणाल, दुरावस्थेला माझ्या मीच जबाबदार बनत गेलो. मग न्यूटनच म्हणाला नियम

नाही म्हणजे नाही

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
बायको: पोह्यात मीठ विसरले, चव का तुम्हाला कळत नाही, खाताय कि चरताय, तुमचं काही खरं नाही. नवरा: अॉफिसला उशिर होतोय, क्षणाचीही उसंत नाही, जीवनच माझं चवदार केलंस, पोह्यांची मला तमा नाही.
काव्यरस

::: मिपा विडंबन स्पर्धा :::

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 02/03/2016 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है... अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा... आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...
काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे. रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात.

जीवनशाळा

लेखक कवि मनाचा यांनी मंगळवार, 01/03/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं एक अधिक एक बरोबर दोनच असतं शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं. फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं यशाच्या पायऱ्या चढताच कळतं इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं. ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ) मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता. भौतिकशास्त्राच्या तासाला प्रश्नच कधी समजला नाही स्पिरीटचा दिवा, एबोनाईटचा दांडा अन् रेशमी रुमाल माझ्याशी असे का वागले तेच कधी कळलं नाही आज भौ

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो.

दंगा कथा : छोटू

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 01/03/2016 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३ किलोमीटर पाई चालण्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजयचेच. मोतिया खान जवळ एक चांभार होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते.

जेएनयूतला अराज्यवाद (?)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 01/03/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्‍ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच.

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सना पर्यायी आहार ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 01/03/2016 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक नसलेले पर्यायी आहार कोणते ? मिपावरील आणि इतरत्रच्या सुयोग्य पाककृतींचे दुवे देणे आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक टाळून समतोल आहार कसा घ्यावा ? हे या धागा लेखाचे मुख्य प्रश्न आहेत. तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक असले तर नुकसान काय असा कुणि तरी प्रश्न घेऊन येईलच तेव्हा त्याचेही उत्तर हवे आहे. तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्स, खोबरे, शेंगदाणे, तीळ, साबुदाणा, रताळे, बटाटे, इत्यादी पदार्थ भारतीयांच्या जिभेचे लाड पुरवतात त्यास जवाब नाही त्यामुळे त्यांच्या चविष्टतेच्या मुल्यावर या धाग्यावर बद्दल वाद करण्याची इच्छा नाही.

बसते बिचारी एकटी आजी -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 01/03/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
बसते बिचारी एकटी आजी देवापुढती वाती वळत असते मुखात नामस्मरण कधी तिचे ना कंटाळत.. गत आयुष्याचा पाढा असते स्वत:शीच उगाळत गालावर एखादा अश्रू नकळत येई ओघळत.. सोसले जे आयुष्यभरात जाईे डोळ्यासमोर तरळत वेग वाती वळण्याचाही जाई वाढत तसाच नकळत.. सखा जीवनातुन का गेला सोडून अर्ध्यावरुनी पळत आसवात का भिजती वाती जिणे रोजचे राहीे छळत.. .
काव्यरस