Skip to main content

जगण शिकतोय मी आता.......!

लेखक एकप्रवासी यांनी रविवार, 06/03/2016 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जगण शिकतोय मी आता जुनी कात टाकून, अंकुरापरी मातीतून पुन्हा उगवून काही नवीन तारा जोडून जगण्याची नवीन धून बनवून, जुन्याच शब्दांना जराशी वेगळी चाल देवून, जगण शिकतोय मी आता…. सुखानं सुखाशी थोड गुणून दुखांना दुखाशी घेतलं भागून, बाकी काही उरेल ना उरेल आयुष्याच गणित पाहतोय पुन्हा सोडवून, जगण शिकतोय मी आता…. स्वप्नांना जरा पुन्हा जाग करून तुटलेल्या वाटां सांकवाना जोडून, निशब्द नात्यांना हळुवारपणे पुन्हा पुन्हा हसवून, जगण शिकतोय मी आता….
काव्यरस

उपासाचा पौष्टीक केक

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 06/03/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या महाशिवरात्रीचा उपास असेल. आणि रोजचे तेच तेच खाऊन कंटाळला असाल ना? आता आलाच कोणाचा वाढदिवस उपासाच्या दिवशी तर केकशिवाय साजरा नाही करावा लागणार! साहित्यः शिंगाड्याचे पीठ २०० ग्रॅम. साजूक तूप १०० मिली. पिठी साखर १०० ग्रॅम खजूर २० बिया बेकिंग पावडर एक टीस्पून खायचा सोडा अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून वेलची पावडर नेसकॉफी चार पाकिटे १ रू.

सावध

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 06/03/2016 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात.

पहिली चाचणी

लेखक कवि मनाचा यांनी रविवार, 06/03/2016 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी, अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी, कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात, पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !! डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी, लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी, ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी, विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

मोदी सरकारच्या नवीन योजना

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मेक-अप इंडिया- या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल. वेक अप इंडिया- या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल.

ठळक बातम्या

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी रविवार, 06/03/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय- > पंतप्रधान मोदी अजूनही भारतातच. > राहुल गांधी यांनी आज कुठलाही मूर्खपणा केला नाही. > अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार मध्ये (पुन्हा) "जंग". कला- > "BA पास" नंतर "MA पास" चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. "NET/ SET Qualified" आणि "Doctorate" या त्यापुढिल भागांचीही उत्सुकता. > शाहरुख़ चा FAN लौकरच प्रदर्शित होणार. " जबरा फ़ैन" गाण्यात कंगना राणावत चा जलवा. (चुकीची दुरुस्ती- "जबरा फैन" गाण्यात शाहरुख़च आहे, जरी कंगना सारखा दिसत असला तरी.) क्रीड़ा- > भारताकडून पराभूत होण्यास बांगलादेश सज्ज.

'साप'सफाई

लेखक Dinesh Satpute यांनी रविवार, 06/03/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सुट्टीचा दिवस ....माझा मुलगा , पप्पा पप्पा आवाज देत दरवाजाची बेल वाजवत होता...काय झाले असेल म्हणून मी सुद्धा धावत येत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मुलाने सुरवात केली... खाली चला लवकर ..सोसायटीतील सर्व लोक खाली जमा झालेत...लहान मुलांनी खेळताना साप पाहिला असं बोलतायेत..मी सुद्धा उत्सुकतेपोटी लगेच खाली गेलो..खाली जमा झालेली गर्दी पाहून आपल्या सोसायटीत एवढी लोकं राहतात यावर विश्वास बसेना. तीन चार कावरी-बावरी छोटी मुले आणि त्यांना प्रश्न विचारणारी गर्दी. नेमकं काय झालंय याचा अंदाज येत नव्हता. शेजारी उभ्या एका अनोळखी व्यक्तीशी मी बोलू लागलो..नवीन दिसता सोसायटीमध्ये?

डाक्टर डाक्टर-2

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 06/03/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपला भारत देस लैच झक्कास. इथलचि लोकं (मजी मह्या गावातलीच) सगळ्यात भारी. त्याहीचे इच्चार, वागणूक- बिगनुक, कामं-धंदे एकदम जबरदस्त. अपुन त्याहीचे एक नंबर फॅन. बिचारी दावखान्या मोहरुण जाताना आदबीनि वाकुन 'राम-राम' घालत्यात. वाटात कुढं भेटली की लग्गीच् "काय डाक्टर साहेब? बरं हाय ना?" असं इच्चारतात. आपल्याला त् भौ त्यहिच्या कडून तपासायची फि घ्यायची बी इच्छा हूत नै. पर मनलं आपल्याला बी पोट हाय, मनुन आलं पेशंट की आपुण तेला पैलं सलायण लावतु अन सलायणचं अन त्यात सोलड्याल्या इंजकशनाचं तेवढं दोन अडीचसं रुपय घेतु बाकी भायेरच्या डाक्टरवानी तपासा बिपासाचा एक रूपा लावत नै. अन ती बिचारी देतात बी.

परीकथा भाग ६ - (फेसबूक स्टेटस पावणेदोन ते दोन वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 05/03/2016 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
२१ डिसेंबर २०१५ खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे.. पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे.. हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे.. पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे.. आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको :) . . २३ डिसेंबर २०१५ प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे. अन्न हे फक्त खाण्यासाठी असते आणि ते खाण्यासाठी देवाने एक तोंडच काय ते दिले आहे, या खुळचट कल्पनांवर आमचा जराही विश्वास नाही. आईसक्रीम आम्हाला नाकानेही खाता येते.

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शनिवार, 05/03/2016 18:44 या दिवशी प्रकाशित केले.

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

जय जय रघुवीर समर्थ ! प्रस्तावना : ( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६) सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!