भालचंद्र नेमाडे यांच्याशी एक अविस्मरणीय भेट.
दहावीला असताना कोसला पहिल्यांदा वाचली, आणी त्या कथेच्या नायकाचा आणि त्याचा विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. नौकरी मिळाल्यानंतर एक एक करून त्यांच्या सर्व पुस्तकांचे पारायण केले आणि मी भालचंद्र नेमाडेंची फ्यान झाले. माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक, म्हणजे एकदा नेमाडेंना भेटणे आणि त्यांच्या पुस्तकांविशयी माझ्या मनातले सर्व प्रश्न त्यांना विचारणे हे होते.
ओळखले का?
"ए शुक शुक"
"ए अरे थांब"
अचानक मागून आवाज येतो पण स्वतःला "ए" ह्या नावाने कोणी हाक मारेल असे जरासे विस्मरणात गेले असल्याने हो...हो..थांबा जरा सविस्तर सांगतो तर आपण सगळे नोकरी-व्यवसायानिमित्त एका विशिष्ठ पदावर काम करत असतो आणि ते पद म्हणजेच आपली ओळख होते.
म्हणजे कोणी दुकान,हार्डवेअर स्टोअर,हॉटेल या व्यवसायात असेल तर "शेठ' या विशेषणाने तर कोणी बँक मॅनेजर,बिजीनेसमन,डॉक्टर,वकिल ,सरकारी अधिकारी या पदावर असेल तर "सर" "साहेब" अशा विशेषणानेओळखले जातो.
आणि विशेष म्हणजे समाजात सुद्धा आता एक वेगळीच छाप असल्याने "आबा" "आप्पा" "दादा" "भाऊ" अशी काहीशी ओळख निर्माण झालेली असते.
तर "ए" अशा एकेरी नावाने आ
गरिबाला विचार
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन
मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन
कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो
आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो
निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं
गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ?
दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो
तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो
देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो
काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो
हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ?
नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ?
- अभिषेक पांचाळ
काव्यरस
भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी
भारताचा दैवाधिन पारंपरिक शेतकरी
- डॉ. सुधीर रा. देवरे
भारताचा शेतकरी कधी आधुनिक होईल? भारताच्या शेतकर्याची स्थिती इतकी दयनिय होण्याची कारणे काय? दुष्काळात शेतकर्यांकडे आत्महत्येशिवाय पर्याय का नसतो? पाऊस नसला तर शेतकरी हातपाय गाळून का बसतो? गारा पडल्या, अवकाळी पाऊस झाला तर शेतकरी इतका हवालदिल का होतो? आपला शेतकरी इतका परावलंबी का आहे? इतका दैवाधिन का आहे? इतका पारंपरिक का आहे? इतका कर्जबाजारी का आहे? त्याला कर्जावू परिस्थितीवर मात का करता येत नाही? असे असंख्य प्रश्न शेतकर्यांच्या बाबतीत विचार करताना उद्भवू लागतात.
खरं तर भारतातील सर्व शेतकर्यांपुढील समस्या सारख्याच नाहीत.
महाभारताच्या राजकारणातली २ प्यादी
नुकताच साहना यांचा अर्जुन आणि कर्ण हा धागा वाचला. या धाग्यात वर्णलेली कथा मूळ मानल्या गेलेल्या महाभारतात सापडत नाही. पण त्यानिमित्ताने महाभारतातल्या या २ पात्रांच्या आडुन झालेले राजकारण तुमच्यासमोर आणण्याची एक संधी नक्कीच मिळाली.
साधारण महाभारताच्या कथेतल्या या २ नायकांच्या सूडाच्या प्रवासातील मुख्य टप्पे सगळ्यांनाच ज्ञात आहेत. कर्ण आणी अर्जुन एकाच आईची दोन मुले दैवगतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढले.
काळ असा.......
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद!
त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!]
माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला,
‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’
मी करड्या रंगात ब्रश बुडवला,
गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले,
‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!
श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल
अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, घरची राखण करणारा वगैरे वगैरे…’ तर असा हा कुत्रा माझाही खूप आवडता होता.
खरे तर माझ्या बाबांचा तो खूप प्रिय प्राणी! त्यांना आमच्या घरात ‘कुत्रा आमचा पाळीव प्राणी’ असे म्हणायला एक आणायचा पण होता. परंतु माझी आई ठाम होती की दोन पायांच्या मानव प्राण्याशिवाय घरात कोणालाही प्रवेश नाही. अपवाद पाल आणि झुरळ असावेत. कधीतरी चिमणी पण यायची. पण ते स्वमर्जीने येत व जात. आईला त्याचा त्रास नव्हता.
मिसळपाव