Skip to main content

गरिबाला विचार

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शुक्रवार, 01/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला वाटतं , संघर्ष म्हणजे माझंच जीवन मान-अपमानाने जळतं , ते फक्त माझंच मन कष्टाची भाकर काय ती फक्त मीच कमावतो आणि कमावलेला पैसाही मीच फक्त गमावतो निदान दोन वेळचं जेवण तुला मिळतं गरिबाला विचार , भुकेविन पोट कसं जळतं ? दुःखाचा डोंगर सतत माझ्याच पाठीवर असतो तरी सुद्धा दोन क्षण मी कसा हसतो देव नेहमी संकटे माझ्याच पदरात टाकतो काही न देता , नुसतं माझ्याकडूनच मागतो हे असं वाटत असेल , तर गरिबाला विचार सुखाचं घर कसं मोडतं ? नुसते डोळेच नाही , तर त्यासोबत मन कसं रडतं ? - अभिषेक पांचाळ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1225
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया