Skip to main content

कुडे-गांधारपाले-पन्हाळेकाजी-हर्णे भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/04/2016 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire बरेच दिवस कोकणातील तीन लेण्या पाहण्याचे मनात घाटत होते. शेवटी कुड्याची लेणी, गांधारपाले लेणी व पन्हाळे काज़ी या लेण्यांना भेट देण्याचे ठरवले. लेण्यांना भेट देण्यापूर्वी त्या कुठल्या दिशेला तोंड करुन आहेत व त्याच्यावर किती वाजता कसा उजेड पडतो याची अभ्यास करणे छायाचित्रे काढण्याच्या दृष्टीकोनातून अत्यंत आवश्यक. गुगल मॅप्समधे यासाठी अप्रतीम सोय आहे.

सायकलीशी जडले नाते २६: २०१५ च्या लदाख़ सायकल प्रवासाची तयारी

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/04/2016 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

शतशब्दकथा : सर्टिफिकेट

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/04/2016 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली. नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा. थरथरत्या हाताने त्याने स्मिताचं शेवटचं सर्टिफिकेट फाईल केलं.

चारचौघांत

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 08/04/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
चारचौघांत डोळे मिटून स्वस्थ बनायला मनाई आहे चार लोकांत गेलं की सारखं बघावं लागतं डोळे उघडून नजर भिरभिरली नाही इकडं तिकडं एखाद्याच्या कपड्यावरून , फर्निचर वरून , दाढीवरून नवीन घेतलेल्या मोबाईल वरून तर आपण अस्तित्वातच नसतो नजर तर चालवावी लागतेच आणि तोंड सुद्धा बोलत राहावं लागतं सारखं चारचौघांत मौनाचं काम नाही आपले विचार , कच्चे पक्के , आपली मतं , राजकीय , अराजकीय , सांस्कृतिक , असांस्कृतिक बोलून दाखवावेच लागतात आपलं असणं त्याशिवाय ध्यानात येत नाही कोणाच्या मागचं सरकार , पुढचं सरकार , नवीन टूथपेस्ट अमुक फ़िल्म , तमुक टेक्नोलोजी अमक्याची फेसबुक कॉमेंट , तमक्याची गर्लफ्रेंड पास्ता कसा बनवतात , शेअ

मोसाद - भाग १०

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 08/04/2016 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ९ मोसाद - भाग १० एप्रिल १९७५. बैरुट, लेबेनॉन. जगातल्या सर्वात सुंदर स्त्रीचं तिथल्या एका पार्टीमध्ये आगमन झालं होतं. पहिली लेबनीज मिस युनिव्हर्स जॉर्जिना रिझ्क. १९७१ मध्ये अमेरिकेमध्ये मायामी येथे झालेल्या स्पर्धेत तिने हा किताब जिंकला होता. आता चार वर्षांनी लेबेनॉनमध्ये ती अत्यंत यशस्वी मॉडेल बनली होती.

महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, समस्त मिपाकरांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!! तर या नवीन वर्षात नवीन उपक्रम घेऊन येत आहोत १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। अशा आपल्या महाराष्ट्र देशाच्या काल आज आणि उद्याचा आढावा, महाराष्ट्राचे देशाला योगदान हे या निमित्ताने मिपावर यावे या हेतूने साहित्य संपादक मंडळ घोषित करत आहे महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला. या उपक्रमात खालील विषयावर लेख लिहून मिपाकर भाग घेऊ शकतात. १. महाराष्ट्र काल, आज आणि उद्या (उदा.

अगतिकता

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्याशार गूढगर्भ डोळ्यांत तुझ्या अपेक्षेची मासोळी हलली ते ओझे पेलण्याची ताकद माझ्या इवल्या खांद्यांत आहे का? शंका मनास काजळू लागली तुझे ओठ बोलले काहीतरी विचारांच्या भेंडोळ्यांत गुंतले मन त्यास त्याची जाणीवच ना झाली निर्विकार चेहरा पाहून माझा अश्रू लपवित ते मागे वळलीस मणामणाच्या बेडया दुःखाच्या पायी ओढीत हल्के तू चालू लागलीस थांबवावे तुला वाटले किती पण माझे शरीरच दगड झाले
काव्यरस

झेंडूची फुले

लेखक सुधीरन यांनी शुक्रवार, 08/04/2016 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
"दाखिव सखया मजला तू काय ठेविलास लपवुनी? आणिलास गेंद गुलाबाचे बागेतुनी कुठल्या (चोरुनी?) गजरा किंवा आणिलास तू (दहा रुपये खर्चूनी?) आणिलास नभिचे तारे वा तव हस्ताने याच तोडूनी?" "काय करायचे त्या गुलाबांचे सजावटी? काय करावे की गजरा अन तो माळुनी? काय करतेस ते नभीचे तारेच आणि? प्रिये तुजसाठीच 'झेंडूची फुले' आणिली वाचू आस्वादू चल तो काव्य रस चाखू न विसरु ते खाण्या आतिल खोबरे परंतु!"
काव्यरस