Skip to main content

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गच्ची

लेखक वडापाव यांनी शनिवार, 09/04/2016 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
घरी वायफाय सुरू झाल्यापासून गच्चीत जाणं कमी झालंय. दुपारी तासन् तास गच्चीत पिलरच्या आडोशाला बसून गाणी ऐकावी, पुस्तकं संपवावीत, आणि सगळ्याचा कंटाळा आला की लहान मुलासारखं कल्पनाविश्वात रममाण व्हावं असा नित्याचा क्रम असायचा. तहान-भूक लागली, लघवी-परसाकडण्याची घाई आली, तरी तिथून पाय निघत नसे. घरून फोन यायचा, 'जेवलायेस का? ये खाली.' दहा मिनिटांत येतो सांगून आणखी अर्धा तास काढायचो. उन्हं मवाळ झाली की वर टाकीवर जाऊन बसावं. समोर नॅशनल पार्काच्या डोंगररांगांवरच्या ऊनामुळे बदलणा-या हिरव्या छटांची तुलना करत बसावी. कावळ्यांची शाळा भरते असं म्हणवत नाही.

धारासुरचे गुप्तेश्वर मंदिर, जिल्हा परभणी

लेखक Parag Purandare यांनी शनिवार, 09/04/2016 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात परभणीशहरापासून अंदाजे ३५/४० कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठावर हे धारासुर हे छोटेसे गांव आहे. याच गावात गुप्तेश्वर हे शंकराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर नदीच्या काठावर असल्याने जवळपास ८ फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. मंदिर पुर्वाभिमुख असुन मुखमंडप, मंडप, दोन अर्धमंडप, अंतराळ व गर्भग्रुह असा मंदिराचा प्लॅन आहे. मंदिराला पिठावरून प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या भिंती काळ्या पाषाणात बांधलेल्या असुन मंदिराचे शिखर महाराष्ट्रात नेहमी आढळणा-या भूमिज या शैलीचे आहे.

देशोदेशीची वाद्ये: पोलँड

लेखक विजय पुरोहित यांनी शनिवार, 09/04/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
पोलॅंड किंवा पोलॅंडचे गणराज्य हा मध्य युरोपातील आकारमानाने एक मोठा देश. युरोपात आकाराने 9वा तर लोकसंख्येने आठवा देश. साधारण इ.स. 966 पासून या देशाचे स्वतंत्र अस्तित्व नकाशावर दिसू लागले.

मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज सुचवा

लेखक अत्रे यांनी शनिवार, 09/04/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला मराठीतल्या चांगल्या डॉक्यूमेंटरीज माहीत आहेत का? कोणत्याही विषयावरच्या चालतील. धन्यवाद!

आय. आय. टी. प्रवेशासाठी नवे पात्रता निकष.

लेखक खेडूत यांनी शनिवार, 09/04/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातले अभियंते नोकरीलायक नसतात अशी ओरड उद्योगव्यवसाय क्षेत्रातून नेहमीच होते. आय आय टी मधल्या विद्यार्थ्यांच्या दर्जाबाबतही असे प्रश्न उपस्थित होत असतात. त्याची कारणे आपण पाहिली आहेत. पण त्यावर उपाय काय? हे समजत नाही आणि कुठचाही पर्याय राष्ट्रीय पातळीवर व्यावहारिक ठरणार नाही म्हणून विरोध होतो. एकूण 'जे जे होईल ते पहावे' अशी अवस्था पालकांची झाली होती. 'तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर' या मालिकेत आपण यावर चर्चा केलीच होती. सरकार बदलले की नियम बदलायचा खेळ, केंद्राने काही बरे नियम सुचवले तरी राज्याने स्वीकारले नाही तर काय उपयोग?

शब्द

लेखक अभिषेक पांचाळ यांनी शनिवार, 09/04/2016 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द , नीट वापरले तर सुख नाहीतर दुःखाचे मूळ नीट वापरले तर शहाणपण नाहीतर नुसतेच खुळ शब्द , नीट वापरले तर आनंद अन् चेहऱ्यावर येणारे हसू नाहीतर सारी दारं बंद अन् नुसतेच वाहणारे आसू शब्द , नीट वापरले तर दोन मनातील दुवा नाहीतर तोंडातून वाहणारी नुसतीच कोरडी हवा शब्द , एक असे औषध जे जोडतं मन नाहीतर तेच तोडण्याचं एकमेव साधन - अभिषेक पांचाळ
काव्यरस

शनिशिंगणापूरात समतेची गुढी

लेखक सुधीरन यांनी शनिवार, 09/04/2016 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
जुण्यापुराण्या, कालानुरूप नसलेल्या आणि संदर्भ हरवून बसलेल्या रूढी-परंपरा कधी ना कधी मोडीत निघणारच असतात. त्याप्रमाणे शिंगणापूर च्या शनी चौथ-यावर महिलांस प्रवेश नाकारणारी शेकडो वर्षे जुनी परंपरा अखेर आज गुढीपाडव्याच्या दिवशी मोडीत निघाली. सनातनी लोकांसाठी असे प्रसंग, घटना पुढच्या काळातही उपस्थित होतील. त्यांनी त्यासाठी तयार राहावे. त्यांची सद्दि संपणारच आहे. कधी आणि कशी हाच प्रश्न आहे. अर्थातच हा प्रश्न शिंगणापूरापुरता मर्यादित नव्हता, देशभरातील कित्येक मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश करू दिला जात नाही. तेथे देखील महिलांना प्रवेश दिला जायला हवा.