Skip to main content

HOW ARE YOU?

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 01/05/2016 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
हाय, कशी आहेस? नेहमीसारखी झोपाळू? तुझ्या जडावलेल्या पापण्यांतून ठिबकणारी लाल रक्तबुंदी यू नो व्हाट आय मीन जस्ट अ डोस फॉर यू.... सेकंड फ्लोअर आउटसाइड द बाथरुम हिअर आय एम वेटींग फॉर यू.... यू जस्ट कम धीस वे अलॉन्ग विथ योर स्कर्ट अँड शॅम्पेन हिअर आय टेकन अ नीडल फुल ऑफ कोकेन टू ब्रेकअप विथ यू वन्स अगेन.... हाउ आय फरगेट अॅज यू आर माय बेब यू मस्ट कम विथ हेवी ब्रिदींग अँड स्टेयर टू मी टिल इरेक्ट माय फिलींग्ज.... बट आय नो यू यू नेव्हर कम यू नेव्हर शेअर दॅट ब्लडी स्टफ विथ मी वन्स अगेन.... माय नाइटस आर बर्निंग द गन इनसाइड माय कपबर्ड वेटींग टू शूट द बबल्स आउटसाइड विंडो यू मस्ट कॅच देम नेकेड वन्स

ब्लॉग लिखाणाला चार वर्ष पूर्ण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/05/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बरोबर चार वर्षांपूर्वी दिनांक 29 एप्रिल 2012 पासून मी दर शनिवारी साप्ताहीक ब्लॉग लिहायला सुरूवात केली होती. 27 एप्रिल 2014 पर्यंत दोन वर्ष एकही शनिवार ब्लॉगशिवाय टळला नाही. म्हणजेच एकाही आठवड्याचा खंड पडू न देता आणि शनिवार सायंकाळ ही वेळही न टाळता नियमितपणे ब्लॉग लिहीत होतो. मात्र प्रत्येक आठ दिवसांनी ब्लॉग लेखनाने माझ्या अन्य लिखाणावर प्र‍तिकूल परिणाम होतो असे लक्षात आल्याने दोन वर्षापासून- एप्रिल 2014 पासून प्रत्येक महिण्याच्या 1 आणि 15 तारखेला ब्लॉग लिहीत असतो. प्रत्येक पंधरा दिवसाला एक ब्लॉग. या चार वर्षात एकही खंड जाऊ दिला नाही.

दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 01/05/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
दस दस की मॅच - कथा ( काल्पनीक ) शाळेसमोरच्या रस्त्यावर अलिकडेच एक नवीन दुकान सुरु झाले होते . या दुकानामध्ये अनेक प्रसिद्ध सिनेमा/टिव्ही कलाकार , खेळाडु यांचे छोटे मोठे फोटो विकायला ठेवलेले असत . मोकळ्या वेळेमध्ये आपल्या आवडत्या कलाकारांचे , खेळाडुंचे फोटो विकत घ्यायला मुलांची भरपुर गर्दी होत असे . शाळेतील शिक्षकमंडळी या गर्दीकडे नाराजीने बघत जात असत . शाळेतील हुशार मुले या गर्दीकडे बघुन नाक फेंदारत असत , तर हुशार मुली या गर्दीकडे बघुन न बघितल्याचा आव आणत . आज शाळेतील मधली सुट्टी संपत आली होती . मन्या आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या गेटपाशी उभा राहुन गप्पा टाकत होता .

एक संघ मैदानातला - भाग ३

लेखक शि बि आय यांनी रविवार, 01/05/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी ग्राउंडवर गेल्यावर समजले की दीप्तीचा खांदा बसवला आहे आणि ४ दिवस विश्रांती नंतर ती प्रँक्टिस करू शकेल. ऐकून बर वाटलं..... पण आमच्या मिशाळ गब्बरला ते पटलं नाही. आम्हीच तिला मोडलंय अस समजून आप्पांनी जे काही लेक्चर द्यायला सुरुवात केली. अखंड पाऊण तास बोलून झाल्यावर बहुतेक ते दमले... शेवटी आम्ही मांडवली करत स्किल प्रँक्टिस घ्या असं सांगितल्यावर ते गप्प बसले. नियमांच्या यादीत अजून एका नियमाचा समावेश झाला. व्यायाम करताना, स्किल प्रँक्टिस करताना कामाशिवाय बोलायचं नाही.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१७: रस्ता: निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 01/05/2016 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना ६७व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! छायाचित्रणकला स्पर्धेच्या १७व्या भागाला मतदानाद्वारे दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. स्पर्धेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

ब्राह्मणी मटन मसाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मणी मटण मसाला..... असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शे‌अर करत आहे ................. साहित्य... मटण १/२ किलो एक मोठा कांदा चिरलेला तेल दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र लवंगा आदी खडा मसाला. गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो तिखट मिठ मॅरिनेट साठी........ बचकभर कोथिंबीर पुदीनी आल+लसुण +मिरची .. वाटण... एक चिरलेला कांदा निम्म खोबरे.. २ वेलदोडे +२ लवंगा आल+लसुण कृति....... १..बचकभर कोथिंबीर पुदीना+ आल+लसुण+मिरची .. च वाटण तयार करा मटनाला लावुन घ्या २...कुकर मधे २ मोठे चमचे तेल घ्या तेल तापले कि ...

आजोळ

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास . गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे .

Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो

लेखक मार्मिक गोडसे यांनी रविवार, 01/05/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आज बाबा हट्टालाच पेटले होते. मला माहीत आहे तुला कशात करीअर करायचे आहे ते, परंतू स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने आपल्या प्रदेशाचा, समाजाचा व त्यांचा विकास करणार्‍या यंत्रनांचा तुझा अभ्यास होइल. आणि इथे शहरापेक्षा तुझ्या मामाच्या गावी तुला ह्या गोष्टी जवळून अभ्यासता येतील. बाबा मागे हटायला तयार नव्हते. मला स्पर्धा परिक्षांबद्दल ओ का ठो माहीती नव्हती आणि तीच्या वाटेला जायचेही नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून बाबांना म्हटले, दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझे कॉलेज सुरू होइल तिकडे लावलेल्या क्लासची फी वाया जाईल.

महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव ( महाराष्ट्र दिन लेखमाला)

लेखक माहितगार यांनी शनिवार, 30/04/2016 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा साहित्य संपादकांनी १ मे २०१६निमित्त सुचवलेले तीन पर्याय विषय 'महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान' या विषयावर आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या योगदानाचा अभिमान वाटावा, अशी इच्छा स्वाभाविक, पण यातील नेमके साध्य काय? महाराष्ट्रीय लोकांनी स्वतःच स्वत:ला प्रमाणपत्र देऊन केवळ स्वतःची भलावण एवढाच उद्देश याचे साध्य असेल का? खासकरून 'महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव' हा बहुधा ललित साहित्याचा विषय नसावा की चार विशेषणे आणि दोन अलंकार लिहिले की सारा भारत पाहा कसा महाराष्ट्राच्या राजकीय प्रभावाने दिपून जावा. पौराणिक इतिहासात राम गोदावरीपल्याड दक्षिणेत उतरल्यावर बरेच काही घडते.

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/04/2016 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....