Skip to main content

गिरिस्थानांची सम्राज्ञी ............उधगमंडलम (उटी)

लेखक शान्तिप्रिय यांनी मंगळवार, 07/06/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार मैसूर हून बंदीपूर मार्गे निघून आम्ही दुपारी ३ च्या आसपास उटी मध्ये पोहोचलो. बंदीपूर हे कर्नाटकातील व व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण आम्ही दुपारी त्या भागात प्रवास करत असलेने आम्हाला फक्त काही सुंदर हरिणांचे दर्शन झाले याशिवाय काही वानरे आणि मोर आणि रान डुक्करे दिसली . बंदीपूर नंतर तामिळनाडू राज्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा चा भाग सुरु होतो. येथेही आम्हाला काही वानरे (ग्रे लंगूर) दिसली.

खड्डा कोंबडी! (बेगर्स चिकन व्हेरिएशन)

लेखक आनंदी गोपाळ यांनी मंगळवार, 07/06/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्‍याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला. अन नंतर तयार झालेल्या कोंबडीच्या दरवळाने तिकडून जाणारा सम्राट स्वतः आकर्षित झाला, अन त्याने त्या अद्भूत चवीवर खुष होऊन कोंबडी शिजवायची ही पद्धत म्हणे शाही डिश म्हणून जाहीर केली. कोंबडी स्टफ करून, लोटस लीफ मधे गुंडाळून, मग चिखलाचा थर देऊन निखार्‍यात भाजणे ही बेसिक कृती.

न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 07/06/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
न्युयॉर्क शहर व परिसरात कोणी मिपाकर आहेत काय ? सद्या न्युयॉर्कमध्ये काही काळ माझे वास्तव्य आहे. शहर व परिसरात मिपाकर असल्यास भेटायला आवडेल. शक्य असल्यास कट्टा करू या. *********************************************

कट्ट्याचा कार्यक्रम

तारीख : १९ जून २०१६. वेळ : सकाळी ११ वाजता. भेटायची जागा : Newport पाथ स्टेशन समोरील Newport Mall च्या Entrance जवळ.

'चार नगरांतले माझे विश्व' - जयंत विष्णु नारळीकर

लेखक उल्का यांनी सोमवार, 06/06/2016 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
(मी कधी कोणत्या पुस्तकाचे समीक्षण लिहिले नाही आहे. हा पहिलाच प्रयत्न आहे. आजच हे पुस्तक वाचून संपवले. ते मला खूप भावले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटले, म्हणुन लिहायचा प्रयत्न करतेय. पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे. मी मला जितकं झेपेल तितकंच लिहू शकेन. बघा जमलंय का?) एखादे पुस्तक एकदा वाचले की पुरेसे ठरते तर एखादे पुस्तक पुन्हा एकदा अभ्यासपूर्वक वाचावेसे वाटते. जयंत विष्णु नारळीकर यांचे आत्मचरित्र 'चार नगरांतले माझे विश्व' हे एकदा वाचून पुरेसे ठरत नाही. ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हे ५३३ पानांचे जाडजूड पुस्तक लेखकाचे जीवन आपल्यापुढे उलगडून ठेवते. बरं!

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development): गरज

लेखक उल्लु यांनी सोमवार, 06/06/2016 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
गेली काही वर्षे आणि विशेषतः गेले काही महिने आपण वातावरण बदलाचे परिणाम अनुभवतोय. दरवर्षी होणारी पाणी कपात, दुष्काळामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लातूरला पाठवलेली जलदूत रेल्वे ह्या सारख्या बातम्या आपल्याला नित्याच्या झाल्या आहेत. बर्याच वेळेला ह्या विषयांवर अनेक मंचांवर झालेल्या चर्चाही आपण पहिल्या आहेत किंवा केल्याही आहेत. मिपा वरही अनेक धाग्यातून ह्या विषयांवर चर्चा झाल्या आहेत. ह्या विषयावर होणाऱ्या बहुतेक चर्चांमध्ये आपण आता मान्य करतोय कि वातावरण बदल (climate change) होतोय आणि त्याचा मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे.

कृत्रिम शीतपेये - सावधान ! ! !

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 06/06/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
cold drinks कृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो.

एक्सेल एक्सेल - भाग ६ - टक्केवारीचा फॉर्म्युला

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 06/06/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ सहावा भाग - टक्केवारीचा फॉर्म्युला या भागाची इमेज फारच छोटी डाउनलोड झालेली आहे आणि लोकमत साईटच्या आर्काइव्हमधेही ती सापडत नाही. त्यामुळे इथे टंकत आहे. आपण ऑर्गनाइज्ड डेटा ची सोपी व्याख्या बघितली.

संग सगेली

लेखक जेपी यांनी सोमवार, 06/06/2016 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नाटक प्रांतात केली जाणारा हा पदार्थ. संग म्हणजे सफरचंद.बाकी कुळकथा ठावुक नै. साहित्यः- १)भेंडी पाव किलो. एका बाजुने उभी चिरावी. २)एक मध्यम आकाराचे सफरचंद.