चीनच्या क्विंग डायनॅस्टीच्या काळात म्हणे कुण्या भिकार्याने एक कोंबडी चोरली. कोंबडीचा मालक याच्या पाठी लागला म्हणून त्याने ती नदीकाठच्या चिखलात पुरून ठेवली. संध्याकाळी कोंबडीभोवती चिखलाचा गोळा वाळलेला होता, तो याने तसाच कोंबडीसकट जाळात टाकून शेकला. अन नंतर तयार झालेल्या कोंबडीच्या दरवळाने तिकडून जाणारा सम्राट स्वतः आकर्षित झाला, अन त्याने त्या अद्भूत चवीवर खुष होऊन कोंबडी शिजवायची ही पद्धत म्हणे शाही डिश म्हणून जाहीर केली.
कोंबडी स्टफ करून, लोटस लीफ मधे गुंडाळून, मग चिखलाचा थर देऊन निखार्यात भाजणे ही बेसिक कृती. चिखलाऐवजी कणकेचा थरही वापरतात, किंवा मी वापरली तशी चायना मेड अॅल्युमिनियम फॉईल. क्विंग डायनॅस्टीच्या काळी अॅल्युमिनियम फॉइल नव्हती, म्हणून. नैतर हीच ऑथेंटिक रॉयल पद्धत डिक्लेअर झाली असती, असे आमचे मत.
अख्खी कोंबडी स्टफ केली तर भाजायला भरपूर वेळ लागतो. वर्जिनल रेस्पीत ६ तास लिवलेत. मी पिसेस करून घेतल्याने सव्वा तासात प्रकरण आवरलं.
तर मंडळी, पाकृ :
लागणारे साहित्यः
रिकामा वेळ : थोडा
मित्रमंडळी जमवून खाण्या-खिलवण्याची हौस : भरपूऽर
विस्तव बनवण्यासाठी लाकडे किंवा लाकडी कोळसा. मोकळी जागा किंवा गच्ची
२ कॉकरेल कोंबड्या, भाजीसाठी करतो तितक्या साईजचे तुकडे करून. (सुमारे सव्वा-दीड किलो)
नेहेमीचे मॅरिनेशन : आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, तिखट, लिंबू.
हिरवी चटणी : मिरची, कोथिंबीर, पुदिना, जिरं, मीठ, मिरे.
बच्चू कंपनीसाठी कमी तिखटाचं म्हणून ४-६ लेग/विंग पीसेस सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, अन थोडं टोमॅटो केचप व व्हिनेगर लावून वेगळे ठेवले.
केळीची पानं
अॅल्युमिनियम फॉईल, व हॉटेलातून पार्सल आणताना अॅल्युमिनियमचे कंटेनर्स मिळतात, तसे कंटेनर्स.
तयारी:
सकाळी बागेतला एक रिकामा कोपरा पाहून तिथे एक खड्डा खणून त्यात जुना फुटका माठ गाडून घेतला. बाजूने विटा रचून छान रिंगण करून मातीने लिंपून घेतले.
दुपारीच कोंबडी आणून स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवली.
संध्याकाळी त्या खड्ड्यावर लाकडे पेटवून पूर्ण खड्डा भरून रसरशीत निखारा तयार करून घेतला..
यातला बहुतेक सगळा निखारा काढून एका लोखंडी पाटीत ठेवला.
केळीची ३-४ पानं निखार्यावर थोडी भाजून घेतली. पानं भाजली, की मऊ पडतात व पुरचुंडी नीट बांधता येते. नाहीतर पान फाटून सगळे चिकन खाली पडेल.
मॅरिनेट केलेल्या चिकनमधे सणसणीत हिरवी चटणी मिक्स करून, ते केळीच्या पानात ठेवून, त्याची अॅल्युमिनियम फॉईलमधे पुरचंडी तयार केली. त्याला दोन अॅल्युमिनियम कंटेनर्समधे ठेवून पुन्हा एक फॉईल रॅप दिला.
मुलांसाठीच्या कमी तिखटाची वेगळी छोटी पॅकिंग अशीच केली.
पोटल्या बांधतानाचे फोटो काढायला विसरलो.
दोन्ही पोटल्या निखार्यात ठेवून वर बाकीचा निखारा भरला. वरून तीच लोखंडी पाटी झाकली.
मोबाईलात सव्वा तासाचा रिमाईंडर लावून इतर कार्यक्रम सुरू केले. अधून मधून निखार्याला व्हॅक्युमक्लिनरच्या ब्लोअरने हवा मारत होतो. बेल वाजल्यावर :
निखारे बाजूला काढून पोटल्या बाहेर काढल्या.
पोटल्या उघडल्यावर :
कोणत्याही प्रकारचे प्लेटिंग फिटिंग करायला वेळ न देता कोंबड्या गुल झाल्या. त्यामुळे ते फोटो नाहीत.
अधिक टिपा:
१. फिक्या चिकनसोबत एका नॉनस्टिक फ्राइंग पॅनमधे थोडा टोमॅटो केचप, थोडा सोया सॉस, थोडा शेजवान सॉस प्लस अर्धा चमचा गूळ थोडे शिजवून चटपटीत सॉस तयार केला, वरून टाकायला व डिपिंग म्हणून.
२. हिरव्या चटणीऐवजी रेग्युलर चिकनसाठी करतो तशी मसाला करी, पाणी टाकायच्या आधीच्या स्टेपपर्यंत करून, चिकनवर ओतून, मग चिकन रॅप करून निखार्यात टाकले तर पोळी-भाताशी खाता येईलसे तयार करता येईल.
हिरव्या चटणीत खोबरेही घालता येईल.
३. सोबत, वा नुसत्याच भाज्या / बटाटे / मासे इ. देखिल घालता येतील, पण कुकिंग टाईम बदलतील, त्याचे जजमेंट असू द्यावे.
४. ही हरियाली खड्डा कोंबडी बेसिकली स्टार्टर म्हणून केली होती. लोकांनी अक्षरश: ग्लासेस वगैरे विसरून टेबलाभोवती उभ्या-उभ्याच फन्ना उडवला.
५. मोकळी जागा नसेल, पण टेरेस वगैरे असेल, तर मातीच्या मोठ्या कुंडीत निखारा पेटवण्याचा उपद्व्याप करता येईल. अगदीच काही नाही तर ओटीजीमधेही भाजता येईल. पण मग ती राखेची अन लाकडाच्या धुराची चव त्यात झिरपणार नाही.
निखारे पेटवणे हा उद्योग सोडला, तर अॅक्चुअल रेस्पी टोटली विनाकटकट अन बिगिनर लेव्हलची आहे. शिवाय नो ऑईल!! नंतर जेवणाला मटन बिर्याणी होती, पण त्याच्या रेस्प्या इथे ऑल्रेडी असतीलच..

कोंबडी बाहेर काढल्यानंतर निखारे सुरक्षितरित्या विझवायला विसरू नका.
तेंव्हा लोकहो, नक्की करून पहा, अन आम्हाला फोटू दाखवा.
वाचने
33254
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
विशेष सूचना / धोक्याचा इशारा :
असली भरल्या पोटी सुद्धा..
In reply to विशेष सूचना / धोक्याचा इशारा : by आनंदी गोपाळ
संपादनाला बूच लागल का? लोल
In reply to विशेष सूचना / धोक्याचा इशारा : by आनंदी गोपाळ
वाह!!!
गोपाळराव, तुम्ही तर चिकन/किचन
मस्त
नाही.
In reply to मस्त by सुनील
खल्लास पाकृ. दिलिप
झकास
कधीची वाट बघतोय
दणकेबाज एकदम _/\_
खतरा....कट्टा करुया का
Qing चा उच्चार चिंग असा आहे.
तरीच काहीतरी चुकल्यासारखं
In reply to Qing चा उच्चार चिंग असा आहे. by अमेरिकन त्रिशंकू
तोंपासु.
मस्त
लै भारी!
वाह!
हाय्ला!
In reply to वाह! by गणपा
ता.क.
In reply to हाय्ला! by आनंदी गोपाळ
गोपाळराव
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
हाय कमांडची परमिशन आली,
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
हायला...सिलेक्टिव्ह कट्टा का?
In reply to हाय कमांडची परमिशन आली, by आनंदी गोपाळ
स्वारी टाकाभौ,
In reply to हायला...सिलेक्टिव्ह कट्टा का? by टवाळ कार्टा
गणपा भौ.....
मस्तच. तोंडाला पाणी सुटलं. :)
मस्त दिसतेय पाककृती.
कृती आणि फोटो पाहूनच तोंडाला
स्ल्र्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
आनंद हि आनंद ,
भारी !!
क्या बात है.
जबराट...
अहो हि तर आमच्या अलिबाग ची
शाकाहारी असल्याने
In reply to अहो हि तर आमच्या अलिबाग ची by स न वि वि
नाखु काका मशरूम खाता काय
In reply to शाकाहारी असल्याने by नाखु
मश्रुम सोबत बटाटे, रताळी, बीट
In reply to नाखु काका मशरूम खाता काय by कैलासवासी सोन्याबापु
बीट नको हो! लैच गोडमिट्ट मचूळ
In reply to मश्रुम सोबत बटाटे, रताळी, बीट by मोदक
बर्र र्हावद्या. कधी येताय
In reply to बीट नको हो! लैच गोडमिट्ट मचूळ by कैलासवासी सोन्याबापु
ही आहे मोदक अप्पांच्या व्हेज
In reply to बर्र र्हावद्या. कधी येताय by मोदक
धत्त तेरे की
In reply to नाखु काका मशरूम खाता काय by कैलासवासी सोन्याबापु
पुरण्यासाठीमाफ करा पुराव्यासाठी स्थानीक मिपाकरांना आमंत्रीत करता येईल.(तेव्हढाच मिपा स्थानीक कट्टा हा का ना का) ता.क. सोन्या बाप्पू पुणे वारी कधी आता तर दोस्त आलेत मिपावर. मित्रायनी नाखु@नाखु काका, आलो की कळवतोच
In reply to धत्त तेरे की by नाखु
मी चालेल का ग्लासमित्र म्हणून
In reply to @नाखु काका, आलो की कळवतोच by कैलासवासी सोन्याबापु
शुभस्य शिकरण!!
In reply to मी चालेल का ग्लासमित्र म्हणून by टवाळ कार्टा
कधी येताय मग
In reply to शुभस्य शिकरण!! by कैलासवासी सोन्याबापु
पाककृती आणि लेखन दोन्हीही छान
केळीच्या पानाऐवजी हळदीची पानं
च्यायला सकाळी 5 वाजता ही
एक नंबर पाकृ.. आणि एकदम सोपी
રાડા ..... હૉટેલ ટાका તુમ્હી
वावावावा काय ती पुर्वतयारी,
मस्त पाकृ.
हा हा हा.. खड्डा निखारे