Skip to main content

सरी..

लेखक कविता१९७८ यांनी शनिवार, 09/07/2016 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्यासरीवर सरी आल्या की वाटते तु बरसावे असेच रीमझिम रीमझिम करावे हिरवेगार या ओसाड मनाला दरवळु द्यावा या देहाचा सुगंध मंद मंद हलका हलका बेधुंद करत जाणारा लख्खकन चमकावे तुझ्या तेजाने मी व्हावे सौदामिनी तु व्हावेस मुसळधार अन करावेस तृप्त या मनाला जन्मोजन्मी या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी सुप्तेच्छा ही दडलेली तु शांत करावेस या कासावीस मना नवी संजीवनी देउनी मोहाचे धागे विणताना पडावा या जगाचा विसर नाती ही मनाची गुंफताना दु:खाची छाया ही व्हावी धुसर तु असेच बरसावे , बरसतच राहेवेस बळ द्यावे पुन्हा रुजावयाला या उन्मळुन पडलेल्या जीर्ण देहाला

श्रद्धावानांच्या तार्कीक उणीवा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 09/07/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्‍या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्‍याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्‍यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?

एक ओपन व्यथा ५

लेखक वटवट यांनी शनिवार, 09/07/2016 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक ओपन व्यथा १ - http://www.misalpav.com/node/36054 एक ओपन व्यथा २ - http://www.misalpav.com/node/36086 एक ओपन व्यथा ३ - http://www.misalpav.com/node/36148 एक ओपन व्यथा ४ - http://www.misalpav.com/node/36475 ------------------------------------------------- खरं तर सह्याद्रीच्या भल्यामोठ्या कड्यासमोर पर्वती खूपच ठेंगणी वाटते. तसंच काहीसं पाटलांना वाटत होतं.

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शनिवार, 09/07/2016 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
काव्यरस

सांगली धागा निमित्ताने : सांगलीची खाद्यभ्रमंती

लेखक सुज्ञ यांनी शनिवार, 09/07/2016 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाला स्वतःचा एक स्वभाव असतो . तेथील माणसे , समाजजीवन , निसर्ग , लोकांचे दैनंदिन आयुष्य , राजकारण , गावात घडलेले बदल अशा अनेक गोष्टींमुळे त्या गावाचा एक स्वभाव तयार होत जातो. अनेक शहरांच्या अनेक तर्हा. थोडीशी खवचट आणि आता 'लोक दमड्या मोजायला तयार आहेत तर थोडी लुटालूट केली तर काय हरकत आहे .. नाहीतरी आपले गत आयुष्य गरिबीतच गेले ' असा स्वभाव बनलेली कोकणातील गावे, राजकारणी आणि दारूची दुकाने यावर नितांत प्रेम करणारी विदर्भ मराठवाड्यातील गावे , जुन्या परंपरा, देवळातील श्रीविष्णू आणि सिनेमातील नट यावर ठाम विश्वास असणारी गावे अथवा पैसा कमाओ और उडाओ इतकेच माहीत असलेली गावे .

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 08/07/2016 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - तयारी भाग २ - पुणे ते रोहतक सलग दोन दिवस भरपूर गाडी चालवल्याने आंम्ही ठरवलेल्या वेळापत्रकावर मात करून पुढे जात होतो. आजचा दिवस पानिपत साठी राखीव होता. रोहतक पानिपत अंतर फक्त ८० किमी होते. रोहतकहून आरामात आवरून निघालो, एके ठिकाणी नाष्टा केला व लगेचच पानिपतला पोहोचलो. तेथे थोडी शोधाशोध करून "काळा आम्ब" (हे खास हरियाणवी लकबीतले नांव!) कडे कूच केले. पानिपत..

ती कॉलर ट्युन

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 08/07/2016 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
योगायोग... दैनंदिन जीवनात घडणारी एक गोष्ट.. काही योगायोग चांगले तर काही वाईट. काही दीर्घकाळ लक्षात रहाणारे. पण एखादा विलक्षण योगायोग केवळ सुन्न करुन जातो आणि नेहमीसाठी लक्षात रहातो. हा योगायोगही तसाच.. ना चांगला ना वाईट. पण एका अतिशय दु:खद क्षणी घडला आणि विलक्षण सुन्न करुन गेला. जवळपास पाच वर्षापुर्वीची गोष्ट. माझं लग्न होवून जेमतेम दोन महिने उलटून गेले होते. लग्नानंतरच्या पहिल्या सणाकरिता पत्नीला नेण्यासाठी सासरे आले होते. शनिवारी सायंकाळी त्या दोघांना बस स्टॉपवर सोडून आलो. तासाभरातच पत्नीने रेल्वे स्टेशनला पोहोचून गाडीत बसल्याचे कळवले.

ठहरने को बोला है

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 08/07/2016 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.

जुनुनियत....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 08/07/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे कथाकथनाचं पण कथा मांडताना माध्यमाचा वापर योग्य पद्धतीनं झाला नाही तर चित्रपट फसतो. फक्त गोरे-गोरे, सुंदर चेहर्‍याचे कलाकार घेतले, कुठेतरी बर्फाळ प्रदेशात चित्रिकरण केलं आणि तिच घासुन घासुन चोथा झालेली कथा 'it's different' म्हणुन सादर केली कि चित्रपट होतो हा गैरसमज आहे. हा समज द्रुढ करणारा अजुन एक चित्रपट म्हणजे 'जुनुनियत....' कर्नल जोहान बक्षी- सुहानी कपूर या दोघांची ही कथा. टिपिकल प्रेमकथा पठडीतली..त्यामुळे अधिक लिहिणं गरजेच नाही. कथा ठिकठाक असली तरी पटकथा अत्यंत सुमार दर्जाची.

अंड्याचा पुलाव

लेखक जागु यांनी शुक्रवार, 08/07/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते. बरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.