Skip to main content

भग्न शरीरे - 2

लेखक रातराणी यांनी बुधवार, 13/07/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस शेखर श्रवंतीला भेटायचा प्रयत्न करत होता. अगदी झोपायचे काही तास सोडले तर जवळ जवळ दर तासाला फोन करून पहात होता. पण मॅडम फोन काही उचलत नव्हत्या. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या श्रवंतीला असं अचानक काय झालं हे त्याला काही केल्या कळत नव्हतं. मनातल्या मनात त्यानं त्यांच्या आधीच्या भेटीत त्याच काही चुकलं असेल का याची पडताळणी केली, पण त्याला तर असं काहीच झाल्याचं आठवत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेली.

एंडी हार्डीची मालिका म्हणजेच मिकी रूनीची धमाल

लेखक महामाया यांनी मंगळवार, 12/07/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला. ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं- ‘एंड दि ऑस्कर गोज टू...’ तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’ छोटया पडद्यावर कर्क डगलसचा ‘स्पार्टाकस’ बघितला होता.

त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 12/07/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
त्या भज्याच्या पिठांमध्ये सांग तू आहेस का? भरल्या वांग्याच्या भाजीत ओतिशी तू चव का? मिसळीच्या रश्शांत सांग तू तरंगतोस का?? ओनियन उत्तप्यास सांग तुझ्याशिवाय चव का? भाजी रस्सा वरण सांबाराचा प्राण तू आहेस का? चिरताना तुला अश्रू चे घोर ते तू रूप का? शेव चिवड्यात वर्षणारा चवीचा तू मेघ का? कोथिंबीर मिरची खोबरे वाटणात नेमका हवा का? सामिष असो वा मत्स्य आहारातला प्राण तू आहेस का? कष्टणार्‍या बांधवांच्या भाकरीचा मित्र तू आहेस का? सुगरिणीच्या व्यंजना चा सांग तू अविभाज्य भाग का? असो सामिष वा शाक पाकात तिथे रे, सांग तू आहेस का

मुग-बटाटा कटलेट्स

लेखक गौतमी यांनी मंगळवार, 12/07/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी मुग (अर्धवट वाफवलेले) १ते दिड बटाटा वाफवुन आलं-लसुण - हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे अर्धा कप / आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली १ चमचा लाल तिखट थोडीशी हळद १ ते २ चमचे लिंबाचा रस मीठ बाईंडींगसाठी भाजलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन तेल क्रमवार पाककृती: रेसिपी एकदम सोप्पी आहे. मुग वाफवुन घेऊन थोडेसे क्रश करुन घ्यायचे. यात वाफवलेला बटाटा मॅश करुन मिक्स करा. आता यात वर दिलेले सगळे मसाले आवडीनुसार टाकुन एकत्र मिस्क करा तसेच बाईंडींग साठी भाजलेल्या पोह्यांची पुड टाकुन सगळे मिश्रण एकजीव करुन त्याचे लहाल लहान चपट्या आकाराचे कट्लेट्स तयार करुन घ्या.

आषाणे कोषाणे धबधबा - भिवपुरी

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 12/07/2016 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी जावु नाहीतर पुढल्या वर्षी नक्कीच जावु करत करत १५ वर्ष अशीच गेली. कुठल्याही पावसाळ्यात या ना त्या कारणाने पावसाळ्याची भटकंती लांबणीवर पडत होती. पण यंदा तो योग जुळुन आला आणि सहकुटुंब भिवपुरी येथील आषाणे कोषाणे धबधब्यावर जाणे झाले. आधी खरंतर पळसदरी मनात होते. पण लोकमतमध्ये पावसाळी भटकंती वर एका दिवसात करता येण्याजोगे ट्रेक विषयी एक सदर आले होते. त्यामध्ये या भिवपुरीच्या धबधब्याची माहिती आली होती. तिथे रॅपलिंग सुध्दा करता येते असे लेखात म्हंटले होते. म्हणुन तिथेच जायचे नक्की केले. मग काय कालच्या रविवारी बॅग भरुन तडक ठाणे स्टेशन गाठले. स.

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development) (भाग २) : पाणी

लेखक उल्लु यांनी मंगळवार, 12/07/2016 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर बर्यापैकी पाउस झाला आहे. ह्यावर्षी तरी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्याव लागेल असा वाटत नाही पण मागील वर्षान्सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून पाणी वापराचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत हे आपण नेहमीच मानत आलो आहोत पण ह्या तीन मुलभूत गरजांपेक्षा हि मुलभूत गरज हि पाण्याची आहे. मानवी जीवनात पाण्याचा फक्त पिण्यासाठी एवढीच भूमिका नसून शेती साठी, स्वच्छतेसाठी/ आरोग्यासाठी, वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रियांसाठी ते अगदी मनोरंजनासाठी देखील पाणी गरजेचे आहे.

इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड

लेखक अभिजीत अवलिया यांनी मंगळवार, 12/07/2016 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या भागाची लिंक इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी खरे तर ह्या जागेबद्दल सर्वात शेवटी लिहिणार होतो. पण मिपावरच्या ताज्या खबरी नुसार आपले टवाळ कार्टा साहेब लंडनला निघाले आहेत आणि त्यांनी 'UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो?' असे विचारले आहे. तेव्हा लगेच हा भाग अगोदर लिहायला घेतला. तर आम्ही पूल बंदराजवळच राहत होतो. त्यामुळे बंदरावर रोज एक तरी फेरी व्हायची. तेव्हा एकदा सहज पत्नी बंदरावर गेली असता तिथे पूल ते गर्नसे आयलंड जहाज फेरी असल्याचे कळले (Condor Ferries नाव होते फेरी चालवणार्या कंपनीचे).

एक्सेल एक्सेल - भाग १० - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 11/07/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
एक्सेल एक्सेल: भाग १ - भाग २ - भाग ३ - भाग ४ - भाग ५ - भाग ६ - भाग ७ - भाग ८ - भाग ९ - भाग १० दहावा भाग - एक्सेलचे उपविश्व - चार्ट्स मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधे