लेखकसस्नेहयांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..)
मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला.
सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.
लेखकहेमंत बेंडाळेयांनी शुक्रवार, 02/09/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक
हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे.
अहो अस काय म्हणता मागच्या ब्लॉगच्या घवघवीत यशानंतर ( काय विश्वास नाही बसत घवघवीत यश म्हणून बघा बर मोजुन ६ प्रतिक्रिया भेटल्या त्याला ( ठीक आहे, ठीक आहे २ माझ्या आहेत पण ... लोकांनी टाकल्या म्हणून टाकल्या ना मी , हो एकाने लिहिल आहे कि त्याला काही कळलं नाही म्हणून. काय नेहमीच आपला क्वालिटी क्वालिटी करतात लोकं, क्वांटीटी पण बघायची कधी कधी असो ..
लेखकपथिकयांनी शुक्रवार, 02/09/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला
वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला
रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला
अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला
माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला
लेखकमहेश शिपेकरयांनी शुक्रवार, 02/09/2016 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न
शहर कोणतेही असो
निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला
ठेकेदार कोण होते
असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात
पण जेव्हा
त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो
नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो
वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो
तेव्हा हे
आमदार खासदार ठेकेदार इतकेच काय त्या रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी व ठेकेदाराचे पेमेंट करणारे आँडिटरची नावे कधीच कुणालाच कळत नाहीत
टिप:- नागरिक ही ती शोधत नाहीत
असं का??
लेखकनिकुंजयांनी शुक्रवार, 02/09/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली.
पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???...
- डॉ. सुधीर रा. देवरे
एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल.
लेखकपाटीलभाऊयांनी गुरुवार, 01/09/2016 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार..._/\_
मिपावर लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तरी लेखात काही चूक/त्रुटी आढळल्यास क्षमा असावी. गेले कित्येक महिन्यांपासून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत होतो…1-2 वेळा सुरुवातदेखील केली होती...पण या ना त्या कारणाने राहून गेले...आता अखेर हा लेख पूर्ण केला :)
नोकरीला लागून तीनेक वर्ष झाली होती, आणि या मधल्या काळात छोटे-मोठे ट्रेक, कोकण आणि गोवा सोडून कोणतीही भटकंती झाली नव्हती. तेव्हा मित्र-मंडळीनी भटकंतीसाठी थोडे दूरचे आणि अलिप्त असे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी सर्वानुमते ठिकाण नक्की झालंच 'लाहौल आणि स्पिती'. आणि कधी तर ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा.
लेखकज्योति अळवणीयांनी गुरुवार, 01/09/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी सूर्य.. मी रवि...
मी दाह... मी अग्नि...
विश्वाचा आधार मी
जीवनाचा आकार मी
प्रकाशाचा उगम मी
श्वासातिल हुंकार मी
सर्वस्वाचा पूर्णाकार मी
तप्त जरी ... निराकार मी
व्यापलेला अवकाश मी.... अन्...
दाहाचा साक्षीदार मी
चंद्राचा शीतल प्रकाश
इंद्रधनूचा कोमलाकार
तप्ततेचा स्वाहाकार
मी एकटा... मी पूर्णाकार!