Skip to main content

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी रविवार, 09/10/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 इथे वाचा पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1 ======================================================================

!! स्त्री !!

लेखक कवि मानव यांनी रविवार, 09/10/2016 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
केली कल्पना स्त्री विना जगताची, आदराने शिष झुके. निसर्गाची मोठी किमया, ती नसती तर संसार मुके, घेउनी बीज तिज पोटाशी, नेण्या मानवतेचे वेल पुढे, स्त्री न असती या पृथ्वीवर, सकल अस्तित्वाचा प्रश्न पडे ?
काव्यरस

जाऊं द्याना बाळासाहेब : वेगळ्या वाटेवरच्या माणसाची अर्धवट गोष्ट

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 09/10/2016 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, रसिक मायबापहो चित्रपट हे कायम समाजाचं प्रतिबिंब दाखवतं असं कोणत्या तरी महान माणसाने म्हंटल आहे आणि काही प्रमाणात हे खरंही आहे. 'देऊळ', 'वळू' मधून ग्रामीण जीवनाची झलक दाखवत वेगळे विषय हाताळणार्या गिरीष कुलकर्णीनी यावेळेस थोडा वेगळा पण गावाशीच निगडित असणारा असाच विषय 'जाऊं द्याना बाळासाहेब' मधून मांडला आहे . पैशामुळे येणारी बेफिकीर प्रवृत्ती , गावमधली जाती पातीची उतरंड, फ्लेक्स संस्कृती यासर्वांवर केलेलं खुसखुशीत भाष्य म्हणजे 'जाऊं द्याना बाळासाहेब'.

सहजच

लेखक रातराणी यांनी रविवार, 09/10/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
आळसावलेल्या एका सकाळी तू म्हणाव चल फिरून येऊ कुठे कस काही न सांगता घेऊन यावस मग समुद्रकिनारी मी विचाराव, "का रे, आज एवढ्या लांब?" तू म्हणाव, "सहजच, गंमत आपली" सूर्य पाण्यात पोहू लागेपर्यंत पडून राहाव गरम वाळुत सूर्यास्ताला जाव गार पाण्यात हलकेच उलगडावी तू माझी वेणी मी म्हणाव, "काय रे? केस विस्कटतील" तू म्हणाव, "असू देत असेच सहजच " बोचर्या थंडीची पर्वा न करता ओल्या वाळुत उमटवाव्यात पाउलखुणा अंधार पांघरुन मग मोजत बसाव्या आकाशभर चमचमणाऱ्या चांदण्या मी हळूच ओठ टेकवावे तुझ्या गालांवर तू विचाराव, "अरे वा, आज काय विशेष?" मी म्हणाव, "काही नाही, सहजच"

ईईईई कॉमर्स - एक अवेअरनेस प्रोग्राम -भाग २

लेखक अक्षरमित्र यांनी शनिवार, 08/10/2016 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग येथे वाचता येईल : --------------------------- सिनिअरचा सिनिअर : बरं तुम्ही सुट्टीत मुलांना बायकोला घेऊन फिरायला जाता काय ? मी : नाही, आम्ही सुट्टीत गावी जातो. सिनिअरचा सिनिअर : बरोबर. काही वर्षांपुर्वी मी देखील हेच करायचो. कारण सुट्टीमधे कुठे फिरायला जायचे म्हणजे कमीत कमी ४०-५० हजार तर पाहिजेतच. ते आपल्याकडे नसतात म्हणून बेसीकली आपण गावी जातो. तुमच्या बायकोला विचारा बर की आपण दुबईला, मलेशियाला फिरायला जायचं का ? पाहिजे तर पुढल्या सुट्टीत गावी जाऊ. आय बेट, ती एका पायावर तयार होईल.