Skip to main content

शिक्षण: धोरण, उद्दिष्ट आणि गफलती!-भाग ३

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 05/11/2016 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/37792 http://www.misalpav.com/node/37794 भाग ३ सांस्कृतिक उदिष्ट म्हणजेच सांस्कृतिक तसेच मूल्य शिक्षण – आतापर्यंत आपण पाहिलेली उद्दिष्ट हि तशी वैयक्तिक किंवा कौटुंबिक अशी होती पण आताचे हे उद्दिष्ट समष्टी करता असून ते मुलभूत उद्दिष्टांमध्ये का समाविष्ट केले आहे?

'घोकंपट्टी'

लेखक वसुधा आदित्य यांनी शुक्रवार, 04/11/2016 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मुलगी senior kg मध्ये जाते. वाचन शिकण्याचं तिचं वय. परवा तिचं एक पुस्तक हातात धरून घडाघडा वाचत होती. मला कौतुक वाटलं. मी तिला दुसरा तसाच परिच्छेद लिहून दिला. तर ती गडबडली. नंतर लक्षात आलं कि, शाळेत तो धडा पाठ करून घेतला होता. unit test ला तोच वाचायला सांगणार होते. ज्यांना पाठ नाही झाला त्यांना कमी मार्क्स मिळणार होते. गेल्या काही दिवसांत मी आठवी ते दहावीच्या बऱ्याच मुलांना भेटले. काही जण ९०% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविणारी होती. सहज म्हणून अभ्यासाची चर्चा करताना लक्षात आलं, कि, मुलं पाठ्यपुस्तकं फारशी वाचतच नाहीत. प्रश्नोत्तरे शाळेतून दिली जातात.

!! आता !!

लेखक कवि मानव यांनी शुक्रवार, 04/11/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझी कोणाला तमा होतच नाही प्रियजन म्हणून मी "त्यांना"...केली थोडीशी घाई, मी जगलो ज्यांच्यासाठी ते दूरवर निघून गेले, आता खांद्यांवर घेउनी ओझे, घरट्यात एकटा राही !! इमारतीच्या माडीमध्ये कधी तरी दरवळतो ही गंध , तिथल्या भिंती ही साक्षी, मी कैसा होतो बेधुंद, पण जसे पावसात गज गंजावे तश्या गांजल्या सऱ्या नाती, पडक्या इमारतीला आता परत दुरुस्ती होणे नाही !! पारिजात होऊन दारी, मी घातला सडा फुलांचा, घेऊन आश्रय माझा, काही पिल्ले मोठी होत होती, जे बळ आले त्या पंखांना, खग होऊन ते ही उडाले, सारे तसेच होते नंतर ही तरी पारिजात पुन्हा मोहरले नाही !! आयुष्याच्या या वळणावरती आता हा एकटेपण छळतो, "माणूस
काव्यरस

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग ४ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 04/11/2016 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जीवनाच्या प्रवासात आपण एक मात्र निमीत्त असतो.(जीवन प्रवासातल्या आठवणी) दिवसामागून दिवस जात होते,वर्षामागून वर्ष.गुरूनाथचा आणि सुम्याच्या कुटूंबाचा सहवास वाढत होता. एक दिवशी अचानक गुरूनाथला कोकणातून त्याच्या आईवडीलांकडून निरोप आला.त्याच्या वडलांना बरं वाटत नव्हतं तू लागलीच निघून ये. गुरूनाथचे आईवडील त्याला वरचेवर सांगायचे की तू लग्न करून घे.तुझेही पुढलं आयुष्य सुखकर जाईल आणि आमच्या म्हातारपणी तुझ्यावर जास्त ताण पडणार नाही.पण तो त्यांचं एकून घेऊन वेळ मारून न्यायचा.वडील आजारी झाल्याचं समजल्याने त्याच्या मनात विचार यायला लागला की लग्नाचा विचार करायला हवा होता.

सफर ग्रीसची: भाग ५ - पालामिडी किल्ला

लेखक निशाचर यांनी शुक्रवार, 04/11/2016 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन भाग २ - प्राचीन कोरिंथ भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस ग्रीसच्या आर्गोलिस भागात इतके किल्ल्यांचे अवशेष दिसतात कि आपल्या सह्याद्रीची आणि गडकिल्ल्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. खरंतर नाफ्प्लिओच्या आसपास पर्वत असे नाहीतच, फक्त विखुरलेल्या टेकड्या, काही डोंगररांगा आणि छोटी बेटं. पण त्यांवर कुठे छोट्या गढ्या तर कुठे अवाढव्य किल्ले.

म्हतारी...

लेखक विखि यांनी गुरुवार, 03/11/2016 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यान्दाच काय्तरी लिहीतोय, म्हनाव तस लिहीता येत नाहीये, जमून घ्या तेवढ..... तस पाहील तर हे घडुन तीन एक वर्ष झाली. पण आजबी दोन तीन दिवस झाले की सगळ समोर येत. कदाचीत याला कारण आजुबाजु ला घड्नार्या घटना असतील. आपली एक छोटी मदत एखाद्याला किती महत्वाची ठरु शकते ते मला त्या दिवशी कळाले. झाल अस की, माझा दिड वर्षाचा मुलगा पुण्यात एका मोठ्या हॉस्पिटलात अॅडंमिट होता. आय.सी. यु. ला असल्या मुळ तिथ बसुन देत नसत. म्हनुन मी बाहेर २/४ बाकडे होते तिथे येउन बसायचो, तिथे बरेच पेपर आणी मासिक ठेवलेले असायचे त्यामुळ तिथ जाउन कायतरी वाचत बसायच हा माझा कार्यक्रम ठरला होता.

प्रवास ३

लेखक जॉनी यांनी गुरुवार, 03/11/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास 2 "थापा धीर बोल चू*, पेहली बार आया है क्या? पक्का लोग है?" "हा शाब, 4 तो किलीयर दिख रहे है" "कहासे?" "तेंदूए कि हि राह पर" सर्वजण कमालीचे अलर्ट झाले होते. श्वास रोखले होते सर्वांचे. अगदी बेस वर सीओ सर सुद्धा तणावाखाली होते. खरंतर इतका वेळ एकाच पोजिशन मध्ये बसून सगळ्यांची शरीरं आंबून गेली होती. पण काही इलाज नव्हता. आणि आता तर समोर शत्रू. जरा चुकीची हालचाल जीवघेणी ठरू शकते जे सगळ्यांना माहित होतं. सर्वजण जेव्हा आपला आपला रोल पार पाडतात तेव्हाच अशी मिशन्स यशस्वी होतात आणि हे लक्षात ठेवूनच टीम ची निवड केलेली असते.

जरा जपून

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 03/11/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!