Skip to main content

डी फॉर डान्सबार ( २)

लेखक वरुण मोहिते यांनी गुरुवार, 10/11/2016 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
डी फॉर डान्सबार (१) भेटली ती आमचं सगळं चालू झालं. वास्तविक 10-15 लाख उडवावे एकाच मुलीवर असा नव्हतं.पण काय माहित काय झालं ह्या वेळी . खरं सांगतो 100 ठिकाणी गेलेलो देशात आणि परदेशात .पण काही गोष्टी होतात . मी आईचा एकटा मुलगा वडील नाहीत आई बायको शिक्षण क्षेत्रात . वडील मी समजत नसतानाच गेले . नगरसेवक होते .मोठं कुटुंब एकत्र व्यवसाय काही झालं कि पाठीशी असणारं. पण मला ना आई आणि बायको ह्यांचा खूप प्रभाव मी बाहेर कितीपण दादागिरी करेन पण ह्या दोघी बोल्या चूप की गप्प बसेन असं होतं..कोणातरी बोललं आयटम असं मला नाही जमत असं मुलींना बोलायला .

कधी वाटते

लेखक सोहम कामत यांनी बुधवार, 09/11/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटते तिच्यासाठी जगावे.. तिच्या कुशीतच अलगद मरावे.. कधी वाटते तिची बडबड ऐकावी.. तिची स्वराक्षरे कानी ठसावी.. कधी वाटते तिचा सोबती व्हावे.. चांदण्या रातीत तीला चंद्रापाशी न्यावे.. कधी वाटते तिला खूप काही शिकवावे.. तिनेही प्रेमाने मला दोन शब्द ऐकवावे.. कधी वाटते माझ्या कवितेत ती असावी.. माझ्या प्रेमाची छबी तिच्या हृदयी फसावी.. कधी वाटते ती असावी माझी सोबती.. तिनेही स्वीकारावी माझी अल्लड प्रिती..

एक तू

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 09/11/2016 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
मुरलीधर बन्सीधर प्रेमसागर तू मनोहर शामघन हरिहर गोपाल तू भोळा किसन तू मनमोहन गिरिधर भाविकांचा द्वारकाधीश नृपवर माखनचोर गोपिकांचा रूक्मिणीच्या वरा तू यशोदरचा कान्हा मीरेचा राणा राधेच्या मोहना स्त्रिमनाचा वेध फ़क्त तुलाच जमेल म्हणून 'नौछावर' प्राण केले तुझ्यावर
काव्यरस

गेम (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 09/11/2016 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता. चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!" पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले.

गोष्ट एका लग्नाची ...

लेखक पियुशा यांनी बुधवार, 09/11/2016 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट एका लग्नाची ... निंबाच्या सावलीत म्हातारबा म्हंजी माझं आजोबा , गावातल १-२ भावकीतील पांढरे टकुरे मी सोत्ता न माझा एक मित्र अशे आम्ही ४-५ जण यष्टीची वाट पाहत थांबलो होतो ,आता का बर? असा प्रश्न पडलंच तुम्हाला. तर म्याच सांगतो पैलेच, तर तर .. आम्ही चाल्लो होतो पोरगी पहायला !!!! माझ्याचसाठी :) त्यात आमच्या गावातल्या यष्टीचा कारभार बेभरवशी, आली तर आली नई तर नई. माझा तर डोळाच नई लागला रातभर जेव्हा आज्यानी सांगितलं , " पम्या उद्या आपल्याला पोरगी पाह्याला जायची बरं का तुह्यासाठी" ऐकून मला आधी भ्यावच वाटलं होत. आजवरचा मह्यावाला इतिहास बघता पोरींचं न माझं काय इशेष जमत नव्हतं.

ती....

लेखक Jabberwocky यांनी बुधवार, 09/11/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
ती फुलंराणी, सुगंध वेचणारी. ती स्वच्छंदी, आनंद उधळणारी. चंद्रताऱ्यांचं वेड तिला, ती माझं आभाळ उजळवणारी. ती पणती, अंधार गिळणारी. ती अबोली अबोल, पण मनातले भाव टिपणारी. ती थंड झुळूक वाऱ्याची, नभाला पाझर फोडणारी. ती मोती शिंपल्यातला, ती अथांग सागर प्रेमाचा, ती गुलमोहर, ती रानफुलं, ती सोनाली, ती सोनफुलं..... (Dedicated to my wife)

काटा रुते कुणाला…..भाग ५

लेखक Jabberwocky यांनी बुधवार, 09/11/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला…..भाग ४ http://www.misalpav.com/node/37957 सकाळी केंव्हातरी मी जागृती अवस्थेत आलो. घड्याळाकडे पाहिलं सकाळचे 9 वाजले होते. शनिवार असल्यामुळे काही करण्यासारखं नव्हतं. मी पुन्हा तसाच डोळे झाकून पडून राहिलो. जाम थकवा जाणवत होता. शरीराला नसले तरी मनाला श्रम घडले होते हा त्याचाच परिणाम. थोड्यावेळाने आई मला उठवायला आली. तिने तिचा हात माझ्या कपाळावर ठेवला. काय करतेयस? मी म्हणालो. तुझा ताप गेला की नाही पाहत होते. आई पण मला नाहीये ताप. मी अरे आत्ता नाहीये पण गेले दोन दिवस तापाने नुसता फणफणला होतास. आई. काय?

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 09/11/2016 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
।। भटकंतीची पूर्व तयारी ।। प्रागैतिहासिक काळात शेतीचा शोध लागला आणि माणूस भटकंती सोडून स्थिर झाला, पण प्रगत काळात मानवाला पुन्हा भटकंतीचे वेध लागले. या मधल्या काळात भटकंती या विषयामध्येही बरीच स्थित्यंतरे झाली व भटकंती किंबहुना ट्रेकिंग हा शब्द परवलीचा झाला किंवा हा एक छंद म्हणून नावारूपास आला. निसर्गापासून दूर गेलेला मानव या निमित्ताने पुन्हा निसर्गाकडे वाळू लागला, यातून आनंद मिळवू लागला. आता भटकंती करणे म्हणजे डोंगर, दऱ्या, पर्वत, नदी, नाले ,गावे, शहरे, विविध ठिकाणे, प्रांत सर्व सर्व आले.

शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 09/11/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच. आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो.
काव्यरस

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे.