शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत
लेखनविषय:
काव्यरस
ब्लॉग दुवा
शिवरुद्र ढोल ताशा पथक फेसबुक पान
ढोल-ताशे हा विषय जरी मिपावर ज्वलंत मानला गेला असला तरी काव्य, संगीत या विषयांचं तसं नाही :) या भावनेतून हा धागाप्रपंच.
आपल्या शब्दांनी सुरांचा अंगरखा आणि स्वरांचा मुकुट घातलेला बघून अतिशय आनंद होतो. शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे योगेश जाधव, राहुल राऊत, संतोष शिगवण यांनी या गीतासाठी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे अनेक आभार.
सुधारित लिंक - आता फाईल ओपन व्हायला हवी
शिवरुद्र ढोल ताशा पथकाचे शीर्षक गीत
गीत : अपूर्व जयंत ओक
गायक : नंदेश विट्ठल उमप
संगीत : राहुल रमेश राऊत आणि योगेश जाधव
रुद्राचा अवतार हा शिवरुद्राचा अवतार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
गणरायाच्या कृपेने होते सारे साकार
शिवशंभूची शक्ती करते ह्रदयांवर संस्कार
ऐका ही ललकार ही तरुणाईची ललकार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
नाही जोश वरवरचा हा खेळ नसे फक्त
या धमन्यांतून वाहते शिवभक्ताचे रक्त
गर्जा जयजयकार करतो गर्जा जयजयकार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
आमची निष्ठा आमची श्रद्धा आमचे शिवरुद्र
तुमचे कौतुक तुमच्या टाळ्या तुमचे शिवरुद्र
तालाची ही भाषा बोलणारे शिवरुद्र
मानाची ओळख आम्हा देणारे शिवरुद्र
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आम्ही वारसदार
ढोलाचा डंका करारी ताशाची झंकार
याच प्रकल्पासाठी एक आणखी काव्य लिहिलं होतं जे आता सार्वजनिक करायला हरकत नाही. अधोरेखित अक्षरांवर ठेका धरावा


वाचन
7174
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
गीत कुठाय?
In reply to गीत कुठाय? by आनन्दा
ऑडीयो लिंक आहे ना
ऑडीयो लिंक उघडत नाही
In reply to ऑडीयो लिंक उघडत नाही by सत्याचे प्रयोग
उघडतेय
ऐकलं, खूप जबरदस्त!
In reply to ऐकलं, खूप जबरदस्त! by संदीप डांगे
+११ ऐकले
In reply to +११ ऐकले by नाखु
नाही
In reply to +११ ऐकले by नाखु
नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ
In reply to नंदेश उमप म्हणजे हे. जांभूळ by खटपट्या
आता बघा. लिंक बदलली आहे.
In reply to आता बघा. लिंक बदलली आहे. by वेल्लाभट
हो आता ऐकू येतेय.
जबरदस्त! गीत, गायन, संगीत
झकास !
जबरदस्त
मला कसं सापडत नाहीये. ती लिंक
In reply to मला कसं सापडत नाहीये. ती लिंक by किसन शिंदे
आता बघा. लिंक बदलली आहे.
वा!
वेल डन!
In reply to वेल डन! by चांदणे संदीप
सर्वात आधी
डांगेसाहेब, पद्मावतिताई, नाखु
शिवरुद्रचा लोगो जबरा जमलाय
गीत झकास.. एकदम भारी..!!!
In reply to गीत झकास.. एकदम भारी..!!! by मोदक
अॅग्रीड
वाह वाह ! वेल्लाभट, अभिनंदन
स्रुजा मोदक खटपट्या
आवडेश!!!