Skip to main content

कसा फुलताना दिसू?

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 18/11/2016 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

अहिराणी लगीनघाई !

लेखक आर्या१२३ यांनी शुक्रवार, 18/11/2016 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! २०१२ मधे 'मराठी दिनानिमित्त' मायबोली.कॉम वेबसाईटने 'मराठी बोलु कवतुके' या सदरांतर्गत २-३ प्रसंग देवुन त्यावरील आपापल्या बोलीभाषेतील संवाद मागवले होते. त्यातली ही माझी एन्ट्री: खान्देशी लग्नातली छोटीशी झलक! अगदी 'पिव्वर' अहिराणी नाही जमली तरी थोडाफार प्रयत्न केलाय.सर्वांना समजेल अशी आशा आहे.. प्रसंग असा आहे: आज घरात लग्नकार्य आहे. सगळी पाहुणेमंडळी एकत्रित आलेली आहेत. वधूच्या घरी सगळी मानापानाची मंडळी जमली आहेत.अगदी लगीनघाई चालली आहे. कार्यालयात जातांना सर्वांची उडालेली तारांबळ इथे शब्दबद्ध करतेय. ..... नवरीनी फुई(आत्याबाई): वं बहिनीओन! आटपा! नवरी तय्यार व्हयनी का? आणि ती रत्नी?

' न अनुभवलेले ' गोवा

लेखक हृषिकेश पांडकर यांनी शुक्रवार, 18/11/2016 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राचा खारेपणा,घाटामुळे अडून पडलेल्या पावसाचा ओलावा,परसबाग आणि स्वयंपाकघर या मध्ये जसे अंतर असते त्याप्रमाणे पुणे,मुंबई कोल्हापूर सारख्या औद्योगिक आणि तांत्रिक विश्वापासून काहीसं अंतर राखल्याने स्वच्छ आणि निर्भेळ वातावरणाचा गाभा असलेला पश्चिम घाट आणि अरबी महासागर यांच्यामध्ये विसावलेला चिंचोळा पट्टा म्हणजे मलबार.पानझडी,सदाहरित आणि पर्जन्य अशा तीनही वनांना आपलंसं करून किडे,मुंग्या सापांपासून वाघ हत्ती आणि घरी,गरुड,घुबडांना आश्रयाला ठेवणारा असा हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला मलबार भाग.आणि याच मलबार मध्ये परदेशी पाहुणे आणि भारतीय पर्यटकांची सर्वतोपरी हौस भागवणारे पोर्तुगीजांनी वसवलेले गो

चिकन तंगडी फ्राय!! (सामान्यांची पाककृती?)

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 18/11/2016 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर कधी फसलेली पाककृती पहिलीयेत? नाही ना? त्या नेहमीच सेलिब्रिटींच्या आयुष्यासारख्या किंवा पेड न्यूज सारख्या छान-छान, चकचकीत, तोंडाला पाणी सुटवणाऱ्या आणि दिसायला आकर्षक दिसणाऱ्या असतात. पण ९०% टक्के सामान्यांच्या घरात असे पदार्थ खरेच बनतात? माझ्यासारख्या बॅचलर लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण आणि हृदय हेलावणारं ग्राउंड रिपोर्टींग या पोस्टमधे आहे. माझ्या एरवी प्रभू रामचंद्री वागण्याच्या नाण्याची एक दुसरी अननोन बाजू आहे. ती थोडक्यात सांगायची झाली तर अगदी चायनीज वस्तूसारखी. "चले तो चाँदतक, नयतो शामतक".

डिमॉनेटायझेशन / Demonetisation (भाग २)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 18/11/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
---------- भाग १ | भाग २ । भाग ३ । भाग ४ |भाग ५ ----------

RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न

समजा आपण आज देशाची अर्थव्यवस्था सुरु करतो आहोत. आपण RBI चे गव्हर्नर आहोत, म्हणजे या अर्थव्यवस्थेचे हृदय आहोत. आपल्या हातात देशभरातील बँकांचे जाळे आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या आहेत आणि आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत चलनरूपी रक्तपुरवठा करायचा आहे. पण तो मिळणार कुणाला? तर या देशातील नागरिकांना. मग आपली अपेक्षा काय असेल? आपली पहिली अपेक्षा असेल की प्रत्येक नागरिकाने त्याची संपत्ती जाहीर करावी.

व.. व... व्हिडिओचा! ऊर्फ मिपा फिल्लम इन्स्टिट्युट!

लेखक पिलीयन रायडर यांनी शुक्रवार, 18/11/2016 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम! तर आता आपलं मिपा युट्युब चॅनल सुरु झालेलं आहे. आणि त्यावर दंगा करायला नवा उपक्रमही येत आहे. पण सर्वात मोठा प्रश्न अनेकांना आहे की हे व्हिडिओ बनवायचे कसे?! काही नाही हो.. इयत्ता दुशली ब चा कार्यानुभवचा वर्ग आहे! आम्ही मिपा युट्युब चॅनलवर अजुन दोन व्हिडिओज आणलेत. १. सेक्स चॅट विथ पप्पु अ‍ॅण्ड पापा ह्या लेखाचं व्हिडिओ आर्टिकल २.

टपली अन टिचकी.

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 17/11/2016 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
गिरीश कुबेर ह्या माणसाबद्दल आपल्याला लई आदर.(होता) त्याची सगळी पुस्तक अगदी घरी घेऊन वाचली. “एका तेलियाने” , “हा तेल नावाचा इतिहास आहे” , “हे युद्ध जीवांचे” “अधर्म युद्ध” ते अगदी हल्ली आलेले “टाटायन”. एकसो एक भारी पुस्तक. मराठीत तरी तेल आणि त्याच्या संघर्षाच्या इतिहासाबद्दल इतर कुणीही काहीही लिहिलेले मला माहित नाही. भाऊने आचार्य रजनिशांची जी बिन पाण्याने केली ते पाहून आपण खुश, माणूस समाजवादी. म्हणजे तसे आपण समाजवादी नाही पण एकंदरीत समाजवाद्यांचे विचार अगदी सगळे नाहीतरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला पटतात.

संन्याशी आणि उंदीर!

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 17/11/2016 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
संन्याशी आणि उंदीर! हि गोष्ट लहानपणी वाचली होती. एका गावाबाहेर एक मोठ पण जीर्ण असं गणेशाचं देवालय असते. तिथे एक संन्यासी राहत असतो. असतो तसा त्याच गावाचा पण सन्यास घेतल्यामुळे गावाबाहेर ह्या मंदिरात राहत असतो. गावात भिक्षा मागून आपली उपजीविका चालवायची आणि ध्यान धारणेत काल व्यतीत करायचा हा त्याचा दिनक्रम. त्याच मंदिरात एक उंदीरही राहत असतो. तो उंदीर सुद्धा एकटाच राहत असतो. पण तो ह्या सन्याशाने आणलेल्या भिक्षेतील धन्य कधी मधी मंदिरात वाहिलेले धन वगैरे गोळा करत असतो. आता एव्हढासा उंदीर त्याची गरज ती किती असणार!