Skip to main content

खरवसाची वडी

लेखक अनन्न्या यांनी बुधवार, 30/11/2016 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
kharvas साहित्यः पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप. kharvas कृती: पहिल्या दिवसाचा चीक नुसताच शिट्टी न लावता १५ मिनिटे कुकरला वाफवून घ्यावा. गार झाला की भांड्यातून काढून किसावा.

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक २.......

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 30/11/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
चला... नोव्हे. २०१६ दुपारचे २. ओलाने पुणे स्थानकासाठी प्रस्थान. १५२० ला पुणे जयपूर एस्क्प्रेसचे प्रस्थान. रात्रीची न येणारी झोप रेल्वेत. सकाळी जाग आल्यावर बाहेर पहातो ते रतलाम स्थानक आलेले. गाडी पुन्हा मार्ग क्रमित दौडतेय. आता बाहेर एक मजा दिसू लागलेय. मधेच सिमेन्टच्या कारखान्याचा पसारा. मधेच शेती. आपण कुठेतरी पातळ दगडांच्या सहवासात आलो आहोत याची जाणीव जशी दक्षिणेत शहाबाद ,बागलकोट भागात होऊ लागते इथे तेच. पण तिथला रंग वेगळा इथला वेगळा. इथे बदामीसर रंगाच्या फरशांची पाच पाच फूट उंचीची कुंपणे शेताभोवती. एका स्लाईसचा रंग दुसरीहून भिन्न.

अरे पाचशे हजार

लेखक मधुका यांनी बुधवार, 30/11/2016 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!
काव्यरस

वियोग-कविता

लेखक मारवा यांनी बुधवार, 30/11/2016 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
वियोग या विषयावरील काही जुन्याच कविता आज पुन्हा वाचत होतो या शेअर कराव्याश्या वाटल्या सहज म्हणुन हा धागाप्रपंच केला. बघा एखादी तार जुळते का तुमचीही. हरिवंशराय बच्चन यांच्या कवितांचा संग्रह "निशा निमन्त्रण" हा मला फ़ार भावतो. या संग्रहातील कवितांचा काळ तसा फ़ार जुना आहे साधारणत: १९३७-३८ मध्ये लिहीलेल्या या कविता आहेत. बच्चन यांच्या विख्यात " मधुशाला" आणि "मधुबाला" नंतर लिहिलेल्या कवितांचा हा स्वतंत्र संग्रह आहे. या कविता संग्रहाला तुलनेने कमी प्रसिद्धी मिळाली बहुधा. तर मजजवळ असलेल्या निशा च्या आवृत्तीला स्वत: बच्चन यांनी लिहीलेल्या प्रस्तावनेतुन या संग्रहातील कविता त्यांची पार्श्वभुमी इ.

प्रवास ६

लेखक जॉनी यांनी मंगळवार, 29/11/2016 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास ५ चिनी एजंट चा खून पडल्यानंतर बरोब्बर दुसऱ्या दिवशी आशुतोष दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. अगदी थोडक्यात, पण सर्व सूचना त्याला अश्रफ ने देऊन ठेवल्या होत्या. सेफहाऊस ला मोमीन ला भेटल्यावर त्याला आनंद झाला. मोमीन म्हणजे भारताचा दुबई उच्चलयातील कनिष्ठ अधिकारी होता. पण रॉ एजंट्स सर्कल मध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जाई. त्याने कामंच तशी केली होती. 1965 च्या युद्धातील यशाचं श्रेय जसं लोक शास्त्रीजींना द्यायचे तसं रॉ एजंट्स सर्कल मध्ये आणि पीएमओ मधील अधिकारी ते श्रेय मोमीन ला देखील द्यायचे.

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ....

लेखक अमर विश्वास यांनी मंगळवार, 29/11/2016 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे .... शनिवार आणि रविवार हे आम्हा कष्टकरी लोकांच्या दृष्टीने खास दिवस . सोमवार ते शुक्रवार भरपुर कष्ट केल्यानंतर (पुण्यातील ट्रॅफिकमधुन वाट काढत ऑफिसला पोचणे हे मुख्य कष्ट .... ऑफिसमध्ये कामाचे वेगळे .. ) हे सुट्टीचे दोन दिवस म्हणजे जणू संजीवनीच .... तर अशाच एका शनिवार सकाळची ही कहाणी ---------------------------------------------------------------------------------------- शनिवार सकाळ ... जरा आरामातच उठलो. अर्थात मी सूर्यवंशी नाही (सेटमक्सवर सूर्यवंशम पहिल्यापासून हे मी फारच अभिमानाने सांगतो).

गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 29/11/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्याला तसा मी अगदी लहानपणी गेलो होतो, साधारण १४/१५ वर्षांचा असेन तेव्हा. अगदी पुसटश्या आठवणी आहेत तेव्हाच्या. पणजीला मुक्काम करुन तेव्हा उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा एकेक दिवसाच्या गोवा पर्यटन मंडळाच्या सहली केल्या होत्या. त्यात जुन्या गोव्यातील चर्चेस, मयें तलाव, मंगेशी आणि शांतादुर्गा मंदिरे, कोळवा, कळंगुट, वागातर असे काही किनारे पाहिल्याचं फक्त आठवतंय. त्यानंतर गोवा हा कित्येक वर्षे विशलिस्टवरच राहिला होता.

महेश्वरची मंतरलेली पहाट!

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 29/11/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते. 'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच! ... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच.

कंट्रोल रूम - २

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 29/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!) ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० कंट्रोल रूम ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० "नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?" "हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय." "पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही" "प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस...