Skip to main content

नोटबंदी आणि विवेकाचा दुष्काळ!

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 03/12/2016 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी( म्हणजे T.V. आणि सोशल मिडीयावर) आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसून/ डाचून राहिली आहे. ती म्हणजे नोटाबंदी. काय अभूतपूर्व परिस्थिती, दिवाळी नंतर शिमगा लगेचच यावा आणि सर्वत्र धुळवड साजरी व्हावी असे चित्र. महामहीम पंतप्रधान मोदीशेठ ह्यांचे परम भक्त आणि परम शत्रू, सगळेच डोके गमावलेल्या मुरार बाजी प्रमाणे थैमान घालताना दिसताहेत. बरे दोघांना हि सर्वसामान्य जनतेच्या हालाची, तिच्या देशभक्तीची, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची कोण काळजी?

उतारा (कथा)

लेखक चॅट्सवूड यांनी शनिवार, 03/12/2016 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले" प्रकाश परत तेच म्हणत होता. "अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले. "सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला. सूर्यकांत गेली चार वर्षे माझा ड्राइवर होता, त्याच्या वर विश्वास होता, तो चोरी करेल असे मला वाटत नव्हते. तो आता इथे नव्हता, त्याचा फोन ही लागत नव्हता. आम्ही दोन दिवस फार्महाउस वर नव्हतो, तेव्हाच दागिने गायब झाले होते. कपाटात दागिन्यांचा डबा नाही ही गोष्ट ज्योतीच्या लक्षात आली. आमच्या लग्नात ज्योतीच्या आजीनेच तो डबा ज्योतीला दिला होता. ज्योती कधीतरीच तो डबा उघडायची.

कुंती, द्रौपदी आणि सीता... काळ आणि परिस्थिती

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 02/12/2016 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
(पिशी अबोली यांचा लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता हा लेख वाचला आणि मनात आले की रामायण आणि महाभारत काळातील रूढी, प्रचलित कथा आणि कल्पना इथे मांडाव्यात. लेडी सीमोर यांचे आयुष्य संघर्षमय आणि शारीरिक आणि मानसिक दुःखमय गेले. पण तरीही त्यांनी जिद्दीने आपली बाजू समाजापुढे मंडळी... ही खरच मोठी गोष्ट आहे. प्रस्तुत लेखात कुंती, द्रौपदी आणि सीता यांच्याबद्दल मी आजवर जे वाचले आहे ते लिहिले आहे. हा धागा लिहिण्याचा उद्देश इथे चांगली चर्चा व्हावी एवढाच आहे. जर वाचकांकडे काही वेगळी माहिती असेल तर मला समजून घ्यायला नक्की आवडेल.) दुर्वासांची सेवा केल्याने त्यांनी कुंतीला एक वरदान दिले.

लेडी सीमोर- कुंती, द्रौपदी आणि सीता

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 02/12/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
लेडी सीमोर वर्सली या १८व्या शतकातील इंग्लंडच्या नैतिकतेच्या कल्पनांची धूळदाण उडवणाऱ्या बाईबद्दल ऐकून तिला तसंच विसरून जाणं कठीण आहे. तिच्यावरचा अख्खा बीबीसी २ चा 'द स्कँडलस लेडी डब्ल्यू' हा एपिसोड पाहून तर लिहिल्याशिवाय राहवणारच नव्हतं.

वास्तव

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/12/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ... झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले 'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ... जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची विशाल...
काव्यरस

आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २)

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 01/12/2016 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आमची (ही) शनिवार सकाळ ... किनारे किनारे दारिया ... कश्ती बांदो रे ….. (भाग २) सीडीज आवरणे .. एकदम सोपे काम... शात्रीय संगीत एका बाजूला , नाट्यसंगीत वेगळे . पुलं , वपु, शंकर पाटील यांच्या साठी एक वेगळा कोपरा हिंदी गाणी खालच्या कप्प्यात.. त्यातही रफीसाहेबांसाठी वेगळा कोपरा. गझलस वेगळ्या बाजूला ... डोक्यात सगळं पक्क होत.. पटापट आवरू . दोन अडीचशे सीडीज आवरायला कितीसा वेळ लागतो ... ----------------------------------------------------------------------------------------२ धडाक्यात कामाला सुरवात केली. काही पत्ता चुकलेल्या सीडीजना योग्य पत्त्यावर पोचवले ...

पुरुषांचाही विनयभंग होतो!!!!!?

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी गुरुवार, 01/12/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भयाच्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर देश ढवळुण निघाला.स्त्री सुरक्षे विषयक कायदे कडक केले गेले.देशात स्त्रीयांना भोगायल्या लागणार्या छेडछाड ,विनयभंग ,बलात्कार इत्यादी प्रश्नावर मंथन झाले ,चालू आहे.स्त्री सुरक्षा आपली सर्वांची प्रार्थमिकता असायला हवी या बाबतीत दुमत नाहीच.पण पुरुषांच्याही काही लैंगिकतेच्या अनुषंगाने सामाजिक समस्या असु शकतात याविषयी मात्र ब्र देखिल उच्चारला गेला नाही.प्रत्येकवेळी पुरुषच शोषणकर्ता असतो असा एकांगी विचार मांडायला गेलो तर योग्य होणार नाही. बायकाही पुरुषांचे लैंगिक शोषण करतात /करु शकतात असे गृहीतक जर कुणी मांडले तर ते एकतर खोटे आहे अथ

देशभक्‍ताची व्याख्या!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/12/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात ‘1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्या’ची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले. आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही.

भूनंदनवन काश्मीर - भाग १

लेखक के.के. यांनी गुरुवार, 01/12/2016 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================== भूनंदनवन काश्मीर - भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ ==================================================== भूनंदनवन काश्मीर – पूर्वतयारी यंदाच्या ऊन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कुठे ट्रीपला जायचे याचा विचार बरेच दिवस डोक्यात घोळत होता. २००८ साली काश्मीरला जायचे अगदी ठरलेच होते, पण काही कारणास्तव ऐनवेळी ती ट्रीप रद्द करावी लागली होती.