Skip to main content

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 04/12/2016 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
(गेल्या काही दिवसांपासून कमरेचे जुणे दुखणे वाढल्यामुळे, टंकन करणे संभव होत नव्हते, पण आज सकाळी राहवले नाही, एवढे सर्व समोर घडत असताना डोक्यात सुपीक विचार येणारच). सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो.

न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘

लेखक जयन्त बा शिम्पि यांनी रविवार, 04/12/2016 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूयॉर्क शहरातील ‘ थॅंक्स गिव्हींग डे परेड ‘ अमेरिकेच्या २०१३ च्या पहिल्या भेटीत ४ जुलैच्या ' अमेरिकन स्वातंत्र्य दिनानिमित्त " MACY “ या अमेरिकन डिपार्ट्मेंटल स्टोअर्स कंपनीतर्फे सादर केला जाणारा, हडसन नदीच्या कांठावर, न्यूयॉर्क शहरातून ' FIRE WORKS ' ( आकाशात केली जाणारी शोभेच्या-दारुची आतिषबाजी ) पहाण्याचा योग आला होता. अमेरिकेच्या दुसर्‍या भेटीत, त्याच कंपनीतर्फे २४ नोव्हेंबर २०१६ रोजी न्यूयॉर्क शहरात मोठ्या दिमाखात " थॅंक्स गिव्हींग डे परेड " समक्ष पहाण्याची संधी चालून आली होती.

नंदा

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 04/12/2016 06:28 या दिवशी प्रकाशित केले.
बेबी नंदा Simple, Free Image and File Hosting at MediaFire ओळखलत का हा फोटो कुणाचा आहे ? हि आहे बेबी नंदा. बेबी नंदा हे नाव ऐकलं तर कदाचित काही जुन्या माणसांचेच डोळे स्मृतीच्या कवडशांनी चमकू लागतील. बाकीच्यांना ती नंदा म्हणूनच माहित.

राज की समाज........ कारण?(कथा भाग १)

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 03/12/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा साहेब सकाळी दहा वाजल्या पासून त्यांच्या केबिनमधे येरझा-या घालत होते. ते कोणावर तरी प्रचंड चिडले होते. पण कोणावर ते कळायला मार्ग नव्हता. आणि त्या तापल्येल्या राक्षसाच्या समोर जाण्याची कोणाचीच हिम्मत नव्हती. सगळेच कार्यकर्ते उदयची वाट बघत होते. उदय म्हणजे आण्णांचा मुलगा. त्याचा उदयच मुळी दुपारी व्हायचा. सवईप्रमाणे साधारण एकच्या सुमारास उदयने कार्यालयात पाऊल ठेवले. "आण्णासाहेब सकाळपासून भडकले आहेत." एकाने तत्परतेने उदयला माहिती दिली.

नवाझ शरीफ और प्रेस नोट

लेखक वडगावकर यांनी शनिवार, 03/12/2016 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक देश बऱ्याच वेळा बर्याच प्रेस नोट्स रिलीज करत असतो. डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन ह्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट कडे ते काम असते. त्यात एखाद्या देशाबरोबर झालेला करार,एखाद्या माननीय परदेशी व्यक्ती चे अभिनंदन वगैरे बातम्या प्रसिद्धीला दिल्या जातात. ईट्स रुटीन प्रोसिजर,त्या प्रेस नोट मध्ये अगदी संयमित,संतुलित आणी ऑफिशियल भाषा वापरलेली असते.

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक ३.......

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 03/12/2016 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूद्द जयपूर मध्गे फेरफटका मारावा व उद्या शहराच्या जरा बाहेरील ठिकाणे पहावीत असा बेत सर्वानुमते ठरला. साधारण पावणेनउ चे सुमारास बाहेर पडलो. प्रत्येक हॉटेल समोर दोन चार रिक्षावाले दिवसभराचे पूर्ण गिर्‍हाईक मिळेल या आशेने उभे असतात. आम्ही बाहेर पडतो आहोत हे पहाताच एक़जण आला . आम्हाला अल्बर्ट हॉल संग्रहलयाच्या जवळ सोडणार का असे बोलल्यावर तो तयार झाला. दहा एक मिनिटात आम्ही अल्बर्ट हॉल परिसरात येऊन पोहोचलो.

भिकारी

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी शनिवार, 03/12/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
असे एक वेडा तिथे तो भिकारी भुकेच्या आकांती जगाला पुकारी तमा न तयाला उन्हा-पावसाची दिसे भुक डोळी किती त्या दिसाची नसे आप्त कोणी तया पामराला जीवा साथ द्याया कुणी न घराला थकुनी कधीचा फिरे तो अभागी कुठे श्वान वेडे तयापाठी लागी अधु पाय त्याचा अधु लोचनेही नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही करुणा जगाची कुठे आज गेली दशा मानवाची खुलेआम झाली दिले हाकलोनी जया अन्न मागी अखेरी उपाशी बसे एक जागी आगीने भुकेच्या जणु अर्धमेला म्हणे तुच देवा पाहा लेकराला किती लोक आले किती लोक गेले तया पाहताही किती थेट गेले कुणी एक आला दिली त्यास नाणी दुवा देई त्याला अधु त्या हातानी असे वंचिताचे कि ते संचिताचे जिणे हे नश