Skip to main content

वटवृक्ष!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 18/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आज १८ एप्रिल. माझे आजोबा तीर्थस्वरूप नारायणराव वेलणकर अर्थात् नाना आजोबा जाऊन १४ वर्षं झाली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. वस्तुत: आजोबांबद्दल नातवाने बोलणं म्हणजे एखाद्या नवोदित कलाकाराने हरिप्रसाद चौरासियांसारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल बोलणं आहे! कारण आम्ही नातवांनी जे आजोबा पाहिले ते त्यांचं शेवटच्या टप्प्यातलं रूप होतं. अस्ताला जाणा-या मंदप्रभ सूर्याला बघणं होतं. त्या तुलनेत मुलगा- वडील हे नातं जास्त जवळचं आणि अनेक गोष्टी दीर्घ काळ समान प्रकारे अनुभवणारं. एकमेकांना जवळून अनुभवण्याची संधी‌ देणारं. पण कधी कधी जास्त प्रखर आणि त्यामुळे डोळ्यांवर अंधारी आणणारंसुद्धा.

एन्ट्रॉपी, पैसा आणि हिरण्यगर्भ.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 18/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्याकडुन आपल्याला नक्की काय मिळतं? प्रकाश. उष्णता ? पण म्हणजे नक्की काय ? एनर्जी. मग समजा सुर्यावरुन पृथ्वीवर जितकी एनर्जी आली त्या एनर्जीमधील किती एनर्जी पृथ्वी अवकाशात परत सोडते, रेडीयेट करते ? ५०% ? ९०%? ९९%? बरं . थर्मोडायनॅमिक्सचा पहिला नियम काय ? "एनर्जी कॅन नायदर बी क्रियेटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. " मग परत एकदा विचार करुन सांग - पृथ्वी सुर्यापासुन मिळालेली किती एनर्जी परावर्तित करते ? १००% ! ग्रेट. मग सुर्यापासुन आपल्याला नक्की काय मिळतं ? ओह डॅम्न !!!! हिंट : थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम ! व्हॉला !

मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 17/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५ स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले वेळ- सकाळी ६ची "बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय. आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय.

मिराशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 16/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मी नाही कुणाचा बाप मी नाही कुणाचा आजा रंग बदलतो मी वारंवार कुंपणावरचा सरडा जसा मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून रहातो नाही कुणाची पर्वा, आशा नाही पुसले म्हणून निराशा स्वानंदाचे टाळ घेऊन हाती जगतो मी माझीच मिराशी

Being Sentimental.

लेखक भागो यांनी सोमवार, 15/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
Being Sentimental. मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो. कसं ते पहा. मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला.

अदृष्ट

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा-कोन ढळले, सावरले, ...अथांग उरले, रेणुबंध खिळखिळले, जुळले, ...अजोड उरले, नक्षत्रे विझली, झगमगली, ...ओजस उरले, चित्रलिपी अडली, उलगडली, ...अव्यक्त उरले, अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले, अदृष्ट दिसले.

आज कल पाव जमीं पर .......

लेखक सावि यांनी शनिवार, 13/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आज कल पाव जमीं पर ....... हो हो अगदी असंच वाटतंय मागचे ३ आठवडे झाले. पण ही भावना सुद्धा थोडी अर्धवट च आहे, कारण माझा एकच पाय जमिनीवर आहे. गुडघा दुखत होता म्हणून डाव्या गुडघ्याची एक छोटीशी मिनिस्कस रिपेअर सर्जरी झाली ३ आठवड्यापूर्वी. हा पाय आणि जमिनीचा स्पर्श ३ आठवडे साठी वर्ज आणि अगदी तेंव्हा पासून मी सगळ्या गोष्टींसाठी एका पायावर तयार असतो ! एक पाय हवेत - "आज मैं उपर आसमा नीचे" गुणगुणत होता तर दुसरा पाय जमिनीवर संपूर्ण भार घेऊन दुःखी शायर बनला होता "बहोत छालो का दुख है नसीब में, शायद उसुलो पे चलने कि सजा मिली है". बरं सगळं काम जमिनीवरचा पाय करत असला तरी कौतुक हवेतल्या पायचेच ..

जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न

लेखक माहितगार यांनी शनिवार, 13/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल. अशी माहिती सर्व शेअर होल्डर्स पर्यंत अधिकृतपणे पोहोचण्या आधीच ज्यांच्या कडे ज्यांना कंपनीबद्दल गुप्त, महत्त्वाची माहिती आहे ते माहिती आधिकृतपणे जाहीर होऊन किमती वाढण्या किंवा कमी होण्या आधीच शेअरची खरेदी किंवा विक्री करून इतर सर्वसामान्य शेअर होल्डरच्या आधीच स्वतःच्या पदरात फायदा पाडून घेतात.

पाकिस्तान- १०

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 13/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
. चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.” साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या.

इकिगाई(ऐसी अक्षरे...१६)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 12/04/2024 या दिवशी प्रकाशित केले.
इकिगाई A अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आह