Skip to main content

हरत कोणी नाही!

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 14/12/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
play तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही! क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण… ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल… सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो! गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे… हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल! पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून, जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे… ते करायलाही जिगर लागते!

नोटा रद्द -बदल . काही विरोधाभासी विधाने :)

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 14/12/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. पण या निमित्ताने मात्र अनेक चर्चांमधून , नेत्यांकडून अथवा पक्षांनी मांडलेल्या भूमिकेतून, मीडिया मधून बाहेर आलेली व जाणवलेली ही मजेशीर विरोधाभासी विधाने. काही विधाने वेगवेगळ्या वेळेस केली गेली ती सलग वाचता यावीत म्हणून त्याचे भाग पाडले आहेत . ( अ , ब वगैरे ) तर . एन्जॉय .. १. ज्यांच्या पैसा पांढरा आहे तेच रांगेत उभे आहेत . काळ्या पैशेवाले मजेत घरात बसून आहेत . पैसे बदलायला बँकेत नाही आले . :)))) २. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत .

विदाऊट अ ट्रेस - ३ - अँड्र्यू आयर्विन

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 14/12/2016 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
Without A Trace 3 - Andrew Irvine भारतीय उपखंड आणि तिबेटचं पठार यांच्या मधोमध उभी ठाकलेली प्रचंड मोठी पर्वतरांग म्हणजे नगाधिराज हिमालय! भारतीय टॅक्टॉनिक प्लेट आणि युरेशियन प्लेट एकमेकांवर आदळल्यावर निर्माण झालेला हिमालय पर्वत वायव्य - ईशान्य असा पसरलेला आहे. हिमालयाची मुख्य रांग ही वायव्येला पाकिस्तानपासून भारत, तिबेट, नेपाळ ते ईशान्येला भूतानपर्यंत पसरलेली असली तरी या मुख्य रांगेव्यतिरिक्त वायव्येच्या काराकोरम, हिंदकुश आणि पामिर, पूर्वेच्या हेन्गवान, उत्तरेच्या इत्यादी, दक्षिणेच्या शिवालिक इत्यादी पर्वतरांगांचाही हिमालयाच्या घराण्यात समावेश केला जातो.

(आम्हां न कळे नज़्म)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 13/12/2016 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हां नकळे नज़्म, नकळेच शेर। गझली बहर, नकळे आम्हां।। काफिया की आधी, रदिफ म्हणावा। मतला जुळावा नकळे आम्हां।। कधी म्हणे सूट, कधी अपवाद। शायरांचे वाद नकळे आम्हां।। वज्न,रुक्न, जुज; लाम, गाफ आणि। नकळेची वाणी गझलेची।। स्वाम्या म्हणे माज मोकार करावा। रतीब घालावा गझलांचा।। - स्वामी संकेतानंद
काव्यरस

दिल्ली कथा : अल्पावधीचा कुटीर उद्योग

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 12/12/2016 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
(लोकांच्या अनुभवावर) दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है, RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच बँकांच्या लाईनीत लागले नसतील.

काय तुझे होणार... मानवा

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 12/12/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भजन रूपी विडंबन गाणे आहे. काळ माणसाला उद्देशून हे म्हणत आहे. काय तुझे होणार... मानवा....काय तुझे होणार !! खरेपणाचे मोल न उरले, खोटे अवघे मोठे झाले, सत्य टेकवी सदैव माथा, दुष्टांचा जयकार.......काय तुझे होणार... मानवा ------- १ ज्ञानी इथले चरणी लोळती, लंपट उठुनी कथा सांगती, कलीयुगात या भक्त न उरले, देवच झाले फार ....काय तुझे होणार... मानवा ---- २ नीती विकुनी माती खालली, भ्रष्ट होऊनी पुष्ट जाहली, पैसा एकच धर्म हा उरला, जडला कैसा विकार.....काय तुझे होणार...
काव्यरस

संवाद

लेखक भावना कल्लोळ यांनी सोमवार, 12/12/2016 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या इंग्लिश मिड डे या वर्तमानपत्रात एक पुर्ण पानभर मुंबईच्या विविध भागात घडलेल्या तीन घरातल्या बातम्या आल्या आहेत. त्यात २ बातम्या मध्ये शाब्दिक वादामुळे संतापाच्या भरात नवऱ्याने बायकोला जीवे मारले तर एका मध्ये कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेल्या नवऱ्याला आपल्या मुलांना भेटु न दिल्याने नवऱ्याने घेतलेला स्वतःचा जीव. आपल्यासाठी तरी हि नुसतीच बातमीच, वाचावी आणि सोडुन द्यावी. पण थोडे लक्ष दिले तर लक्षात येईल या तिनी बातमी मध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कुटुंब- नवरा आणि बायको. एका दिवसात तीन कुटुंब उध्वस्त झाली. त्या तीन कुटुंबातल्या लहानग्याचे पुढे काय? हे एक यक्ष प्रश्न असेल आता.

(बंदीपायी जीवा लागलीसे वाट)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी सोमवार, 12/12/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
बंदीपायी जीवा लागलीसे वाट। उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।। गणिताचा तास विना झंडू बाम। तैसे एटीएम डोकेदुखी।। खिसा खुळखुळा जीव कासावीस। झालो कॅशलेस आपोआप।। भोगतोय भक्त परी हर्ष करी। नोट आहे भारी गुलाबी जी।। स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट। भाजपाला वोट देत नाही।। - स्वामी संकेतानंद