मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बंदीपायी जीवा लागलीसे वाट)

स्वामी संकेतानंद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बंदीपायी जीवा लागलीसे वाट। उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।। गणिताचा तास विना झंडू बाम। तैसे एटीएम डोकेदुखी।। खिसा खुळखुळा जीव कासावीस। झालो कॅशलेस आपोआप।। भोगतोय भक्त परी हर्ष करी। नोट आहे भारी गुलाबी जी।। स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट। भाजपाला वोट देत नाही।। - स्वामी संकेतानंद

वाचने 3509 वाचनखूण प्रतिक्रिया 13

पैसा 12/12/2016 - 16:44
झालो कॅशलेस आपोआप।।
=)) सगळे एका झटक्यात एकसारखे झाले का नाय! =)) महिना झाला, अजून तेच सुरू आहे का? कुठे आहेस तू स्वाम्या? दिल्लीत का दगडांच्या देशात? मला इकडे गोव्यात काय प्रॉब्लेम नाही बघ! ते गुलाबी गांधीजी मासेवाले पण आरामात घेतात. =))

In reply to by पैसा

स्वामी संकेतानंद 12/12/2016 - 16:57
आतापर्यंत झाडुवाल्याच्या देशात होतो, उद्या दगडांच्या देशात असणार. इकडे गुलाबी नोट कोणी घेत नाहीत.

In reply to by संदीप डांगे

पिलीयन रायडर 13/12/2016 - 10:16
मला पण घ्या तुमच्या क्लबात! माझा विश्वास डळमळाय लागलाय. अर्थात मी नुसत्या चर्चा वाचुन मत बनवतेय, प्रत्यक्ष काय चाललंय हे बघु तर शकत नाही. पण आता मलाही तुम्हा लोकांचे काही काही मुद्दे पटायला लागलेत. -(कुंपणावरची) पिरा!

In reply to by पिलीयन रायडर

प्रीत-मोहर 13/12/2016 - 11:01
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला नसला तरीही माझा विश्वास थोडाफार डळमळीत झालाय. मलापण घ्या तुमच्यात

In reply to by संदीप डांगे

अत्रुप्त आत्मा 14/12/2016 - 06:18
@देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!!››› =)) आता नमोरुग्ण तुम्हाला खवळून मारायला येणार! =))

प्रसाद गोडबोले 12/12/2016 - 18:08
अप्रतिम विडंबन स्वामीजी !