Skip to main content

काय तुझे होणार... मानवा

लेखक कवि मानव यांनी सोमवार, 12/12/2016 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भजन रूपी विडंबन गाणे आहे. काळ माणसाला उद्देशून हे म्हणत आहे. काय तुझे होणार... मानवा....काय तुझे होणार !! खरेपणाचे मोल न उरले, खोटे अवघे मोठे झाले, सत्य टेकवी सदैव माथा, दुष्टांचा जयकार.......काय तुझे होणार... मानवा ------- १ ज्ञानी इथले चरणी लोळती, लंपट उठुनी कथा सांगती, कलीयुगात या भक्त न उरले, देवच झाले फार ....काय तुझे होणार... मानवा ---- २ नीती विकुनी माती खालली, भ्रष्ट होऊनी पुष्ट जाहली, पैसा एकच धर्म हा उरला, जडला कैसा विकार.....काय तुझे होणार... मानवा ---- ३ न्याय निवाडा इथे मोकळा, बळवंतांनी विकत घेतला, समाजकंटक ताट मानेंनी, करती स्वैर विहार.....काय तुझे होणार... मानवा ---- ४
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1263
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया