Skip to main content

कलात्मक कोपेश्वर

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 05/01/2017 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नावारूपाला आलेली ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे म्हणून पाहण्यास आपण कायमच उत्सुक असतो.गतवर्षाचा शेवट किव्वा नववर्षाची सुरुवात साजरी करण्याच्या हेतूने अनेक जण अशा विविध ठिकाणांना भेट देत असतातच.पण यंदा हा धोपट मार्ग सोडून थोडा वेगळा विचार डोक्यात आला.'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याच्या निमित्ताने ते शिवमंदिर पडद्यावर पाहण्याचा योग्य आला आणि तेव्हाच इथे जाऊन यायचे पक्के झाले.सिनेमाचे छायाचित्रण झाल्याने हे मंदिर देखील प्रकाशझोतात येईल असे वाटले होते पण वास्तविकता थोडी वेगळी आहे. कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटरवर खिद्रापूर नावाचे छोटेसे गाव आहे.अर्थात हे गाव माहित

राग (अर्थातच सान्गितिक)

लेखक खग्या यांनी बुधवार, 04/01/2017 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आशयाच्या अंबरांनी शब्द माझा टंच व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा .. स्वर टिपेचा बरसुदे त्या भीमसेनी मार्दवाने सूर शब्दांच्या द्वयाने जीव माझा धन्य व्हावा सोहिनीच्या आर्जवांनी जीव स्वप्नाळून जावा जोगिया वा भैरवाने सूर्य गगनी अवतरावा विभासाच्या त्या सुरांनी नूर दिवसाचा ठरावा कलिंगडाच्या भैरवाने अंतरात्मा शुद्ध व्हावा .. मारावा अन सारंगाच्या साक्षीने दिन सार्थ व्हावा श्री मधुवंती पूर्वी संगे मध्यांन्होत्तर वेळ जावा ... यमन येऊदे संध्याकाळी साथ घेऊन शंकऱ्याला हंसध्वनी वा कल्याणाने दिवस रोजचा अंत व्हावा.. रात्रीला मग नंदसंगे मल्हाराने फेर घ्यावा रागेश्री अन कलावतीने केदाराचा
काव्यरस

शेजाऱ्याचा डामाडुमा -भारताचे सख्खे शेजारी -एक होते हिंदू राष्ट्र - नेपाळी इतिहासाचा एक धावता आढावा - नेपाळ-२

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 04/01/2017 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

दगड!

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 04/01/2017 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
a चित्र श्री संदीप डांगे यांजकडून साभार ब्लॉग दुवा रागाची ती उचल काय, दगड! विचारांची मजल काय, दगड! जात पात वजा भाग गणित गणिताची उकल काय, दगड! अभेद्य त्यांच्या आयुष्याची शिल्पं पुतळे तोडून तुटंल काय, दगड! देऊळ म्हणून आत गेलो बघत गर्दीपुढे अचल काय, दगड! बळावलेला ज्वर आहे, जबर औषधानं निघंल काय, दगड! तोड-फोड टीका निषेध कहर सरतेशेवटी सफल काय, दगड! नीट बघा, कळणार नाही फर
काव्यरस

बांगडा - तवा फ्राय.

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/01/2017 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वीकांताला कोकणांत चार दिवस मुक्काम ठोकण्याचा योग आला. ५ / ६ मित्र आणि जवळच असलेल्या एका बंदरावर मिळणारे मुबलक मासे... असा निवांत बेत होता. तर आपण बघुया तवा फ्राय बांगड्यांची आंम्हाला जमलेली पाककृती. कांही डिस्क्लेमर्स १) पुढील पाककृती चिंतामणी आणि प्रशांत मालक आणि मी अशी टीमने मिळून केली आहे. २) बांगडे आणि उपलब्ध असणारे मसाले इतक्याच भांडवलावर पुढील पाककृती बनवल्या गेली आहे. ३) सगळे फोटो मोबाईलवर काढले आहेत त्यामुळे जे काही बरे वाईट आहे ते गोड मानून घ्या - तसेही सगळे फोटो प्रशांतमालकांनी काढले आहेत त्यामुळे टीका करणार असलात तर आयडी सांभाळून असा. ;) बर्र..

गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी मंगळवार, 03/01/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
गिफ्ट ऑफ व्हॅलेंटाईन “गेस व्हाट, मी तुझ्याकरता काय गिफ्ट आणलं असेल?” त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात टेकवत विचारलं. “अम्…टेडी बीअर?” “नोप. गिफ्ट तुझ्या कामात पडेल असं आहे” ”Management Ethics चं textbook?” “असं abstract गिफ्ट देतं का कुणी बावळट. Think something romatic .” “चंद्र तारे तर नाही आणले न तोडून?” ती खांदे उडवत हसली. ती अशी हसली की जाम सेक्सी दिसायची. “असं म्हटलं तरी चालेल. कारण हे गिफ्ट तुला चंद्र तारकांची सफर घडवणार आज..” “मला नाही कळत असं कोड्यात बोललेलं…सरळ सांग बरं काय आणलस.” त्याने हळूच उजव्या खिशात हात घातला आणि अलगद बाहेर काढला. त्याची मूठ बंद होती.