भेट
आज अशी ती भेटली
श्रावणी ओढ मुकी झाली
ममं ह्रदयी वैफल्य जळे
कुणा सौभाग्याची तू ना कळे
ती जुनी वाट पुन्हा थरथरे
पाहूनी दोन हळवे चेहरे
व्याकूळ दिस तसाच ढळतो
उदास रातीचा स्वर असाच सलतो
काळजाच्या शिवारात भिजते एक लहर
मुक्या पानांतूनी जागा ओला प्रहर
मंद हुंदक्यातूनी हाक आली
का अशी तू दूरस्थ गेली
जा सौख्याने आल्या पाऊली
युगायुगांची ही कथा अर्धीच राहीली.
काव्यरस
शतशब्दकथा स्पर्धा २०१७: मृगजळ
‘राणी……! '
तिने फक्त आपल्या ओल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं .
‘मला ना तुझ्या पायाचे हे ठसे बुजवायचे नाहीत!
'ये ना यार’
'हो, येते! अन ती त्याच्या पायाच्या ठश्यावर पाय देत चालू लागली . तिच्या पायांना जणू स्वर्गसुख लाभत होत , तिला त्याच्या पायाचे ठसे तोडायचे नव्हते ! अन ती शेवटी त्याच्याजवळ पोहोचली .
‘बघ, जात वेगळी असली तरी आपण असंच एकत्र राहू - अन तिच्या डोळ्यात एक हसू उमललं!
क्षणातच , त्यांच्या पायाला मोठ्या लाटेचा झटका बसला !शतशब्दकथा स्पर्धा: २०१७: पाउलखुणा
तू गेल्यावर रोज येते मी ठरलेल्या ठिकाणी.
आपल्यातली अंतरं विसरून जाते! समोर दिसतं ते सगळंच भव्य!
अथांग समुद्र, नजरेत न सामावणारं क्षितिज, अस्ताला जाऊनही अफाट रक्तिमा पसरवणारा सूर्य, बेभान सुटणारा वारा!
या सगळ्यापुढे आपण कोण य:किंश्चित प्राणी? पण तुझ्यात सगळं झुगारण्याची हिंमत नाही, कळून चुकलंय मला!
रोज पाहते तू गेल्यावर मागे उरलेल्या पाऊलखुणा.शतशब्दकथा स्पर्धा २०१७: ईश्वराचा शोधं
"आम्हाला ईश्वराचं सत्यस्वरूप शोधायचेय" एका शिष्याने नम्रतेने प्रस्तावना केली.
"ह्म्म्म."- घोसातले एक द्राक्ष गुरूदेवमुखी विलीन झाले.
"आपले मार्गदर्शन-"
काही क्षण विमर्शात लोप पावले.
"हे काय आहे?", एका ललनेचे अनावृतावस्थेतले उन्मादक चित्र पुढे ठेवून गुरूदेवांनी विचारणा केली.
"काम", पट्टशिष्याचा उत्स्फूर्त सूर आला.
"पाप", दुसर्या शिष्याने डोळे मिटले.
"मोह", तिसर्याने नेत्र विस्फारले.
"ज्ञान", पुटपुटत चौथ्याने काही मापे टिपून घेतली.
"सौंदर्य" शतशब्दकथा स्पर्धा-२०१७: ती आणि द्वारकाधीश
तो निघाला आणि 'ती' वेडीपीशी झाली. तिने आतुर नजरेने त्याच्या नेत्रात स्वतःला गुंतवले. पण तो बधला नाही; तेव्हा मात्र ती शांतपणे म्हणाली,"जातोस? जा! तुला अडवणार नाही. हे अर्थहीन... प्राणहीन....जीवन तुझ्या आठवणींवर कंठेन आणि तुझ्यातच विलीन होईन. मात्र तुला मी आठवेन..मग मात्र......" तिने त्याच्याकडे पाठ केली. यमुनेच्या काळ्या मऊशार वाळूतून तिची सुकुमार पावलं आपली ओळख उमटवत राहिली......
द्वारका वसली आणि तो विसावला.शतशब्दकथा स्पर्धा २०१७: नवी सुरुवात
कडाडकाड.!! आवाज ऐकून गाढ झोपेत असलेली रेश्मा उठून बसली...अंधारात तिला काय घडते आहे ते कळेचना. भूकंप!! सगळीकडे माती , कानठळ्या बसविणारे आवाज, सैरावैरा धावणारी माणसे यात तिचा आक्रोश हरवून गेला. घरातले सगळे ढिगार्याखाली जणू लुप्त झाले होते.
आक्रोशत ती काठमांडूच्या रस्त्यांवरुन चालत राहिली. अचानक तिला एका ढिगार्याखालून बारीक रडण्याचा आवाज ऐकू आला. क्षीणपणे कुणीतरी मदतीची याचना करीत होतं.शतशब्दकथा स्पर्धा २०१७: वर्तुळाचा एक कोन
"चवचाल आहे झालं" श्यामल काकू करवादल्या
"खरेच सासरच्यांनी बळजबरी केली की हीच गेली होती मागे राम जाणे" शांता मावशी उद्गारली
"देहाची भूक चुकत नाही श्यामल. तरुण आहे आपली कुसुम अजुन" दुर्गा आज्जी मुलीला समजावु लागल्या.
"भोळी आहे गं कुसुम" वसंतराव कळवळुन म्हणाले.
"भोळी कसली?अश्वत्थामा
था॑ब, आलोच
आतले कढ आवरून सावरून
ठसठसणार॑ मेमरी कार्ड फॉरमॅट करून
शहाणा मुखवटा चपखल बसवून
आलोच.
येतो- झाकून तू दिलेल्या भळभळत्या जखमा
येतो- क्षणभर विसरून की मी चिर॑जीव अश्वत्थामा
काव्यरस
मिसळपाव