पागोळ्या
मित्रांसंगं मला जाऊं द्या की रं
मला बी पान्यात खिळू द्या की
अंगात वारं भिन्नू द्या की रं
मला बी पावसांत भिंजू द्या की
——-
(चाल क्र. १)
गच् झाकून टोपलं भाकार पिठलं
शेताकडं चालूया लप् लप्
लुगाड टाचून धोतार खोचून
लावनी करतिया लग् बग्
इरल्याखाली गानं घुमूं द्या SS
इरल्याखाली गानं घुमू द्या की रं,
मला बी कामावर यिऊं द्या की
——-
(चालीत बदल – चाल क्र.
काव्यरस
विमान
विमान असते धावत जेव्हां, वाटे जीवनी सर्व मिळावे
उंची गाठतो, कळते तेव्हां, वाटे जीवनी गुपित कळावे
विमान असते धावत जेव्हां, हद्द होते सरहद्दींची
उंची गाठतो, कळते तेव्हां, हद्द एक गोल पृथ्वीची
विमान असते धावत जेव्हां, वैभव मागे सरकत असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, वैभव डोंगर द-यात असते
विमान असते धावत जेव्हां, आपुले जग आपुले असते
उंची गाठतो, कळते तेव्हां, आपुले जग आपुले नसते
विमान असते धावत जेव्हां, काळ मागे मागे जातो
उंची गाठतो, कळते तेव्हां, काळ मागे मागे येतो
विमान असते धावत जेव्हां, मोल असते वेगाचे
उंची गाठतो, कळते तेव्हां, मोल खरे नियंत्रणाचे
विमान असते धावत जेव्हां, वाटे हवी हवाई सु
काव्यरस
बाळकडू
आज पहाटेच कोसळला
एक जुनाट निर्मनुष्य वाडा
अन त्याला साथ देणारा
चिमणीपाखरांचा खोपा
नजर आपसूक शोध घेऊ लागली
हरवलेल्या अस्तित्वाचा
पण तुटक्या घराच्या काही काटक्याच फक्त
उडत होत्या स्मशानराखेसारख्या.
बुल्डोजरच्या कोलाहलात हरवलेले
उमलत्या चोचींतले कोवळे स्वर
ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली
चिवचिवणारी अखेरची धडपड
मनात चर्र झालं
पण…
शहाण्या माणसाकडून तिला
एवढंतरी बाळकडू मिळालं
पिलांना घेऊन चिमणी उडाल्याचं
मला मागाहून कळालं.
काव्यरस
वर्ल्डकप क्लासिक्स - २०११ - इंग्लंड विरुद्ध आयर्लंड
२ मार्च २०११
चिन्नास्वामी, बँगलोर
बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये ग्रूप बी मधली इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातली मॅच रंगणार होती. अवघ्या ३ दिवसांपूर्वी याच स्टेडीयमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टाय झालेल्या मॅचची धुंदी अद्याप बँगलोरच्या प्रेक्षकांवरुन उतरलेली नव्हती. हॉलंडविरुद्धं पहिली मॅच कण्हतकुंथत जिंकल्यावर आणि भारताविरुद्धची मॅच टाय झाल्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने ही मॅच महत्वाची होती. २०१५ च्या पुढल्या वर्ल्डकपमध्ये टेस्ट स्टॅटस न मिळालेल्या संघांची संख्या मर्यादीत करण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे आयर्लंडच काय पण इतर असोसिएट संघांमध्येही नाराजी पसरलेली होती.
स्मरणचित्रं - गाण्यांमधला देव आनंद!
देव आनंद हा आपला अत्यंत आवडता हिरो!( आपला म्हणजे माझा …हल्लीच्या पिढीमध्ये (म्हणजे सुद्धा माझ्याच पिढीमध्ये …मी काही ७० वर्षांचा म्हातारा नाहीये) देव आनंद काही फारसा कुणाला आवडत नाही …एक तर तो चेष्टेचा विषय आहे किंवा अगदी त्याच्याबद्दल काही मत असावं इतका तो हल्लीच्या पिढीतल्या लोकांना महत्वाचा वाटत नाही … तो अगदी विस्मृतीत गेला नाही एवढंच …तर ते एक असो ) …म्हणजे मला त्याचा एकदम fan म्हणा हवं तर.आता देव आनंद काही फार ग्रेट अभिनेता वगैरे नव्हता. त्याच्या संपूर्ण करिअर मध्ये त्याने फार चांगला अभिनय केला आहे असं काही कुठे आपल्याला फारसं दिसलेलं नाही.
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)
दिनान्क पाच मार्च दोन हज्जार बारा (बापूस नावाचा हापूस)
चि शरण्या (उर्फ पिन्नीस)
उद्या तुला पाच वर्ष होतील. तुला म्हणून हे असम्बद्ध पत्र लिहीतो आहे. खरतर स्वतालाच उद्देशून आहे हे. शब्द तोकडे असतील पण भावना मात्र खर्या आहेत.
पाच मार्चची तारीख माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी तारीख आहे. देवाने मला दिलेला स्पेशल डे आहे म्हण ना. आता मी लिहीलेल तुला कदाचित वाचता येणार नाही पण थोडी मोठी झाल्यावर तुला कळेल मला नक्की काय म्हणायचे आहे ते.
मला तो दिवस अगदी कालच्या सारखा आठवतो. सन्ध्याकाळी ४ पासून मी अस्वस्थ येरझार्या घालतो होतो. डॉक्टरीण बाई मध्ये मध्ये येऊन काय काय सान्गून जात होत्या.
पुडाची वडी
डिस्क्लेमरः १.खरं तर फेसबुक वर ही पा़कृ. पोस्ट करून हा .... जमाना लोटला. पण इथे आपण काही लिहूया असं स्वप्न सुद्धा पडत नव्हतं हो. जाम घाबरते मी इथल्या सुगरणींना आणि बल्लवाचार्यांना. तेव्हा त्यांना सगळ्यांना नमन करून आणि पिराताईंचं स्मरण करून इथे धिंगाणा घालायचं ठरवलंय आज. बघा राव... छळायचं नाय उगा... ;)
२. आमचा कॅमेरा कम मोबल्या लैच बेसिक हाय. तेव्हा फोटोकडे फक्त पाकृची कल्पना येण्यासाठी असलेलं माध्यम अशा दयार्द्र दृष्टीने पहावे.
३. नाही हो.. संपलं सगळं सांगून.
राधिका स्पेशल (माझ्या नवर्याची बायको वाली) पुडाची वडी आज पहिल्यांदाच करून पाहिली आणि मस्त झाली.
Taxonomy upgrade extras
गैरसमज
माझ्या विषयी सगळ्यांना
गैरसमज मोठा आहे
प्रत्येकाला असे वाटते
की मी खूप शहाणा आहे
मिसळपाव
