Skip to main content

मिसळपाव

लेखक इरसाल कार्टं यांनी शनिवार, 11/03/2017 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे लेख वाचून लोक म्हणतात वॉव, सर्वांना असतो येथे खेळायचा आपल्या लेखाचा डाव, जेथे मराठी माणुस घेतो लेख वाचन्यासाठी धाव, अशी आहे आपली साइट 'मिसळपाव', येथे सर्वांचे आहे वेगवेगळे गांव, पण सर्वांना आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यांची ठाव, वाईट काही समाजात घडले तर सर्वांच्या कालजात बसते घाव, सर्वांचे सुख-दुःख शेयर करणारी आपली साइट मिसळपाव, येथे सर्व आहेत एक से बढ़कर एक पण जगाला नव्हतं ते ठाव, आता वृत्तवाहिंन्या पन शोधत येतात हे कुठले लेख आहेत राव, जगात प्रसिद्ध केलाय महराष्ट्राच नाव, कोणी विचारल तर सांगा आपली साइट आहे 'मिसळपाव'. -विकास नरभवर. (हा माझा मित्र अलीकडेच मिपा वाचू लागलाय.

वर्ल्डकप क्लासिक्स - २०१५ - आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 11/03/2017 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
७ मार्च २०१५ बेलरीव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया बेटावरच्या होबार्टमधल्या बेलरीव्ह ओव्हलवर पूल बी मधली आयर्लंड आणि झिंबाब्वे यांच्यातली मॅच होणार होती. क्वार्टरफायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्वाची होती. आयर्लंडने वेस्ट इंडीज आणि संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध विजय मिळवला असला तरी दक्षिण आफ्रीकेविरुद्धं त्यांना तब्बल २०० रन्सनी पराभव पत्करावा लागला होता. झिंबाब्वेने संयुक्त अरब अमिरातीविरुद्धची मॅच जिंकली असली तरी दक्षिण आफ्रीका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानने त्यांना धूळ चारली होती.

तिचे हासणे चांदण्याचा चुरा...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 10/03/2017 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! तिची चाल हंसापरी देखणी,कवीची म्हणू वा तिला लेखणी... तिच्या पाउली सांज रेंगाळते,तिच्या सोबती चालते ही धरा! चकाकून ओली उन्हे नाचती,जणू स्वप्नं पहिला ऋतू नाहती... तिचे दोन डोळे तिच्या पापण्या,किनारे जसे बांधती सागरा! कळ्या मोतियांच्या भरोनी पसा,तिने वेचता धुंद होते निशा... तिच्या ओंजळी गंध भारावतो,फुले रातराणीसवे मोगरा! मृगा लाविते केसरीचा लळा,कट्यारी नजर..पाहणे सापळा... अरे काय रंभा फिकी उर्वशी,फिक्या मेनका अन् फिक्या अप्सरा! —सत्यजित

मान

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 10/03/2017 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
मान खाली घालून चाललो चांदणं कधी दिसलंच नाही पाण्यात प्रतिबिंब पाहीलं कधी खरं वाटलंच नाही मान वर करून चाललो वाटेत मृगजळ दिसलं त्यापाठी धावत राहीलो कधी खोटं वाटलंच नाही आता मान डोलवू लागलो काही कठीण राहीलं नाही लोकांना खुष करू लागलो खरं खोटं पाहीलंच नाही

मला आवडणारे काही podcasts.

लेखक बार्नी यांनी शुक्रवार, 10/03/2017 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिस मधून घरी येताना फोनवर podcasts ऐकणे हा माझा आवडता छंद आहे . दोन वर्षाआधी अचानक मला podcasts चा आंतरजालावर शोध लागला आणि तेव्हापासून मी नियमित podcasts ऐकत आहे. गेल्या दोन वर्षात मला गवसलेले आणि माझ्या आवडीचे काही podcasts खाली देत आहे . आपणही आपल्या आवडीचे podcasts सुचवू शकता. • Dan carlin's Hardcore History जर आपणास इतिहासाची आवड असेल तर आपणास हा podcast आवडेल. जागतिक इतिहासातील महत्त्वाचे विषय घेऊन त्यावर ४ ते ५ तासांचा एक एपिसोड असतो.

खन्त

लेखक प्रविण गो पार्टे यांनी शुक्रवार, 10/03/2017 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली.. एकाचवेळी दोन प्रतिक्रिया मनात उमटत होत्या. शिवाजी महाराजांचा पराक्रमाचे प्रतीक पाहून अभिमानाने छाति भरून यत होती तर दुसर्‍याच वेळी किल्ल्याची झालेली द्यनीय अवस्था पाहून लाजेने मान खाली झुकत होती. काय रुबाब होता एक वेळ सिंधुदुर्गाचा!!! अरबी समुद्राच्या लाटेला न जुमनता थेट परकीय जुलमी राजवटीला आव्हान देत मराठ्यांचे समुद्रावर वर्चस्व निर्माण करणारा आज तोच त्या समुद्राच्या लाटांमधे स्वतहाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झगडतोय.

तुम्हाला कुणाचा हेवा वाटतो का?

लेखक इना यांनी शुक्रवार, 10/03/2017 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हेवा, मत्सर, असूया. च्यायला आम्ही इतकं घासून पण उपयोग नाही, कुणालाही पाठवतात साले ऑनसाईट किंवा त्याला कसं प्रमोशन मिळालं माझ्यानंतर येऊन!? मला सगळ्या गोष्टी मिळवायला कष्ट करावंच लागतं! पण त्याला किंवा तिला किती सहज मिळते प्रत्येक गोष्ट! घर, गाडी वर्षा दोन वर्षात लगेच फॉरेनच्या ट्रिप! इथं मी साधं मुळशी नाहीतर खडकवासल्याला जाऊया म्हणलं तरी नाक मुरडतात! माझ्या बहुतेक हातालाच चव नाही, तिनं काहीही कसंही केलं तरी ते चांगलंच होतं. मी मोठी/मोठा असून मला घरात कुणी विचारत नाही! सगळे निर्णय लहान भाऊ/बहीण/जावेच्या हातात! कसलं भारी सरप्राईज गिफ्ट दिलं तिच्या नवऱ्यानं/ त्याच्या बायकोनं!