Skip to main content

बोललो नाही कधी पण...

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 29/03/2017 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित
काव्यरस

ट्वीटव्याख्यान या उपक्रमातील सहभागाचा अनुभव

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/03/2017 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
३-६ फेब्रुवारी या काळात ट्विटरवरील @marathiword या हँडलने ट्विटर्संमेलन हा उपक्रम आयोजित केला होता. हे या उपक्रमाचं दुसरं वर्ष होतं. मराठी साहित्य संमेलनाच्या जोडीने आयोजित होणार्‍या या उपक्रमाला पहिल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सोशल मिडियावरील मराठीचं अस्तित्व भक्कमपणे समोर येणं, मराठी मंडळींना सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठीची एक विशेष संधी, अवसर मिळणं ही या उपक्रमाची निवडक उद्दिष्ट. उपक्रमाच्या आयोजकांतर्फे या वर्षी मला यातील 'ट्वीटव्याख्यान' सदरात सहभागी होण्याचं निमंत्रण आलं.

वर्षारंभाची सायकल राइड (अंबरनाथ ते वरदविनायक महड -अंबरनाथ)

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 29/03/2017 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या रविवारी २६ ला कल्याण सायकलीस्ट बरोबर बारवी धरण ची छोटीशी राइड केली तेव्हा, २८ ला कोणती राइड करायची याची चर्चा झाली, पण सोमवार पर्यंत धड काही ठरत नव्हते, उल्हासनगर सायकलिंग क्लब मध्ये ही नुसती चर्चा सुरु होती, बर्याच जणांना सुटी नसल्याने वा सुटी असूनही जावे लागतंय ,या कारणाने सकाळी छोटी १५/२० ची राइड करू असाच सर्वांचा कल दिसत होता. इतक्यात “गोवा मुंबई सायकल २०१७” या ग्रुप वर समीर दातार ची एक पोस्ट दिसली, वाशी ते महड राइड टोटल १३० प्लस. गुगल बाबा कडे विचारणा केली अंबरनाथ ते महड कसे जायचे? चौक वरून १६ किमी असे उत्तर आले. तरी दोन मित्राना विचारले तेही असेच जावे लागेल असे म्हणाले.

[एक्स्ट्रा शशक] किनारे

लेखक भृशुंडी यांनी बुधवार, 29/03/2017 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला जमेल ना?", अरिकूर्म्याने वृष्णीला प्रश्न केला. "न जमायला काय झालं?", वृष्णीचा सूर दुखावलेला होता. "तसं नाही, ही पहिलीच मोहीम आहे अज्ञातात. आजवर आपल्यापैकी कोणीही हा किनारा ओलांडून पलीकडे गेलं नाही. तू पहिलाच आहेस, म्हणून.." अरिकूर्म्याने स्पष्टीकरण दिलं. "तेही खरंच. आजवर आपण कधीही किनारे ओलांडले नाहीत. पण आता ती वेळ आली आहे. बरंय, येतो मी." वृष्णीने घुमटाची काच बंद केली. अरिकूर्माचे डोळे भरून आले. आजवरच्या कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं हे.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: स्पर्धकांची ओळख

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 28/03/2017 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांची ओळख या धाग्यात जाहीर करत आहोत. अनुक्रमणिका 01. वर्तुळाचा एक कोन = मृत्युन्जय 02. नवी सुरुवात = आंबट गोड 03. ती आणि द्वारकाधीश = ज्योति अलवनि 04. ईश्वराचा शोधं = भृशुंडी 05. पाउलखुणा = श्वेता व्यास 06.

'नाते' म्हणून आहे!

लेखक सत्यजित... यांनी मंगळवार, 28/03/2017 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित
काव्यरस

गँगस्टर - 3

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 28/03/2017 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
झोपडी ठिबक ठिबक. अंधारात हरवलेली. पुढे मोकळे मैदान. अन मोकाट जनावरे विसावलेली. कोपऱ्यातल्या त्या बिल्डींगमधले दिवे अजूनही जळत होते. सभोवताली थोडीशी झाडी. अन बाकीच्या इमारती. आम्ही पायऱ्यांवर बसलो. बोचऱ्या थंडीने अंग शहारत होते. करीमने बीडी पेटवली. "वही दिखी" कोपऱ्यातल्या बिल्डींगकडे इशारा करत त्याने झुरका घेतला. हे 'तिचं' कितवं ठिकाण? गिणती नाही. "आप उसे जाके बात क्यू नही करते?" त्याने विचारलं. च्युता साला. मी जरावेळ त्या मातीत लवंडलो. टप टप टप बारीश आती है. दिल बहलाती है. धूप खिलती है.

किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक)

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 27/03/2017 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
किमान दिड वर्षं ---- कथा (काल्पनीक) विकी , अन्या , रम्या आणी जग्या नुकतेच एका नवीन कंपनीत जॉइन झाले होते . काहि दिवसातच त्यांची एकमेकांशी चांगली ओळख झाली . हे चारहीजण आता एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणार असले तरी त्यांची कामाची आणी तंत्रज्ञानाची पार्श्वभुमी वेगवेगळी होती . त्यांच्या टिम्सही वेगवेगळ्या असणार होत्या . चौघांनीही याआधी दोन तीन ठिकाणी काम केले होते . त्यामुळे आपापल्या तंत्रज्ञानामध्ये त्यांना मध्यम स्वरुपाचा अनुभव होता . प्रोजेक्टचे मुख्य काम चालु होण्याला अजुन दोन आठवडे अवकाश होता . त्यामुळे सध्या तरी ते निवांत होते .