Skip to main content

अगरीयांच्या शोधात

लेखक अमृता गंगातीरकर यांनी बुधवार, 14/06/2017 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या संदर्भात मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलात भटकण्याचा अनुभव मिळाला. खनिज वितळवून लोह मिळवणाऱ्या अगरीया नावाच्या आदिवासी जमातीला हुडकून त्यांच्या ह्या पुरातनकालापासून चालत आलेल्या पद्धतीवर फिल्म बनवण्याचा घाट आम्ही घातला होता. पूर्णपणे शहरात जगलेल्या वाढलेल्या मला ह्या आदिवासींकडून आणि त्यांच्या जगावेगळ्या लोखंड गाळण्याचा पद्धतीकडून काय अपेक्षा ठेवावी हेच कळत नव्हते. ह्या फिल्मची रिसर्चर आणि असिस्टन्ट डिरेक्टर असलेल्या मला माझा रिसर्च मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे परस्परविरोधी पुरावे देत होता.

पावसावर कविता? नाय नो नेव्हर!

लेखक रातराणी यांनी बुधवार, 14/06/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आता पाऊस आला की, सगळे कविता करतील पावसावर, प्रेमावर, शहारलेल्या भेटींवर. तुम्हाला सांगते, आम्हा (सो कॉल्ड) कवीलोकांना, निमित्त हवं असतं उगा. सेंटीमेंटल कविता लिहून, मजा घेत असतो तुमची. हळवे कोपरे, हळवे क्षण, एक पाऊस पडून गेला, की सगळं कसं हुळहुळतं, आम्ही त्याचीच वाट बघतो. मग काहीबाही लिहून, जखमेवर एक फुंकर मारतो, गरम चहाचे भुरके घेत, पावसाला एन्जॉय करतो. मी नाही हा असं करणार पावसाबिवसावर कविता? लिहून लिहून काय लिहणार? कसा बाहेर पाऊस पडताना मी आत कोरडीठक्क. फारफार तर बाहेरचा पाऊस आत, आतला पाऊस बाहेर! खिडकीत बसून आठवलेली पावसातली पहिली भेट.

शाळेचा पहिला दिवस

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 14/06/2017 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ जून . . प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत जायचा दिवस . . .नवीन गणवेश . . नवीन वह्यापुस्तकं . . . नवीन वर्ग . . . . नवीन सवंगडी . . . आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय त्याची उत्सुकता . . . आपला हजेरी क्रमांक काय असेल , मग तो लकी आहे की नाही याचा अंदाज घेणे . . . नवीन शिक्षक कोण आले आहेत ते बघणे . . . . बाहेरच्या कुंद पावसाळी वातावरणात ते वाहनांचे आवाज आणि पादचारी लोकांची लगबग . . . शेजारच्या मशिदीतली ती भोंगावाली अजान . . . आपला वर्ग आणि खोली पहायला प्रवेशद्वारी उसळलेली गर्दी . . .आपलं नवंकोरं दप्तर,ते भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.... त्यातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे . . .

नामकरण.. एक प्रेमकथा - भाग २ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी मंगळवार, 13/06/2017 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ पासून पुढे - .................................................................. बसा मि. सागर.. डॉक्टर, काळजी करण्यासारख काही नाही ना? काळजी करु नका, बाळाची वाढ अगदी योग्यरित्या होत आहे... आणि हो, मी काही औषधे लिहुन देते. ती यांना वेळेवर घ्यायला सांगा.. आणि आता जास्त काळजी घ्यायला हवी दिवस भरत आलेत, लवकरच गुड न्यूज मिळेल.. हो डॉक्टर.. दोन आठवड्यानंतर त्यांना घेवून या, चेकअप साठी.. ............................................................. संध्याकाळी ६ वा.. (सागर व कविता गार्डनमधे...) सूर्य मावळताना किती छान दृश्य निर्माण होत ना? होय.. अहो तुम्हाला आठवतय?

पारिजात

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/06/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.      माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते.

शुक्रवारची कढी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 13/06/2017 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार . . . . . या विभागात पहिल्यांदा काही तरी लिहितो आहे . . . . एक अप्रतिम पाककृती सापडली आहे ती आज तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटतेय . . . . साहित्य - दही, बेसन,तूप किंवा तेल हळद,हिंग,मीठ,कढीपत्ता, आलं, मिरच्या,पाणी ,साखर कृती - पहिल्यांदा दह्याला थोडं बेसन लावून ठेवावं. काही भागाचं ताक करुन घ्यावं. एका भांड्यात फोडणी करुन घेऊन त्यात बेसन लावलेलं ताक टाकावं. मग साधं ताकही टाकावं. चवीप्रमाणे मीठ साखर टाकून त्याला झकास उकळी आणणे आणि घरच्यांना पेश करणे. टिपणी- आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की ही साध्या ताकाच्या कढीची कृती आहे पण मग शुक्रवारची कढी असं नाव का बरं ?

साक्षात्कार

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 12/06/2017 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले तेव्हा दिसलं इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी रिमझिमतं आभाळ तर कधीचं ओथंबून वाकलंय वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं तेव्हा दिसलं मी सहज फेकलेल्या विटेवर माझं श्रेय-प्रेय तर कधीचं उभं ठाकलंय अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत तेव्हा दिसलं माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय
काव्यरस

येथे पाहिजे जातीचे .....

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 12/06/2017 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता गुरू त्याचा एक महागुरू भेटल्यावर म्हणाले, " आपण अभ्यास करू आणि चराचरात शिरू " मी म्हंटले , " ओके " त्यांनी मला वह्या दिल्या मी त्यांच्या नावाने त्या भरवल्या त्यांना अर्पण केल्यावर हसून ते म्हणाले, " " भल्या गृहस्था, हा कसला अभ्यास ? " आम्ही आधुनिक गुरू वेगवेगळ्या धंद्यात शिरू, यात तर धंद्याचा लवलेषही नाही अर्थाचा नुसता अनर्थ आहे काल हरणासाठी अर्थ हवा जो इतरांकडून घ्यावा आणि गोणींमध्ये भरावा कालसर्प, राहू शांत , नारायण नागबली मनः शांती, ही तर आमची हत्यारे तुला जमत नसेल तर कितीतरी आहेत अनुसरणारे मुकाट बाजूला हो, सामान्य पुचकट माणसाचे काम नाही येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे.
काव्यरस

बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 12/06/2017 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे. यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे.

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

लेखक bhavana kale यांनी सोमवार, 12/06/2017 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं.... आभाळ आला कि मन हळवं होतं.... असंख्य आठवणी बरसू लागतात.. मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते... सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते.. पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो.. कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो.. पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो.. का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...
काव्यरस