Skip to main content

मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 19/06/2017 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी न दोहा जाहलो वा मी न ओवी जाहलो मी अभंगाची तुक्याच्या एक पंक्ती जाहलो! मी जरी आलो न पायी दर्शनालाही तुझ्या मीच विठ्ठल,मीच रखुमा,मीच वारी जाहलो!

आठवणींच्या हिंदोळ्यावर! (पुरवणी लेख)

लेखक सचिन काळे यांनी सोमवार, 19/06/2017 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
मला बऱ्याच वाचकांकडून मी जुन्या मुंबईचे लिहिलेले वर्णन कोणत्या सालातील आहे, याची विचारणा होत होती. मी आपणांस सांगू इच्छितो, की हे सर्व वर्णन अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे आहे. हे सांगण्याकरिता मी मूळ धाग्यावर उत्साहाने प्रतिसाद लिहावयास सुरवात केली. पण माझा प्रतिसादच एवढा मोठा झाला, की मला त्याचा हा पुरवणी धागा काढण्याचा विचार करावा लागला.
त्या कोपऱ्यात बसून मी अवघ्या ५५ पैशात साधा डोसा आणि त्याबरोबर एक्स्ट्रा चार्ज न लावता मिळणारी चटणी चक्क पाच सहा वाट्या चापलेली आहे.
हे सर्व अंदाजे १९७५-७७ सालाच्या दरम्यानचे वर्णन आहे. तेव्हा मी ६-८ वीत असेन.

निंदा एक धंदा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 19/06/2017 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतींचा परिचय वाचण्यात आला. हे गृहस्थ त्या आधीच्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर झाले होते. त्यांच्यावरील या लेखात त्यांच्या साध्या राहणीसंबंधीचे काही उल्लेख होते. ते एवढे धनाढ्य असूनही विमानप्रवास मात्र नेहेमी ‘इकॉनॉमी क्लास’ नेच करतात, त्यांच्या घरी आणि कंपनीत वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर होण्याबाबत ते खूप काटेकोर असतात, इत्यादी. हे सर्व वाचून मी प्रभावित झालो आणि माझ्या एका परिचिताला हे सगळे कौतुकाने सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया मला काहीशी खचवणारी होती.

गूढ भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 19/06/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 भाग २ रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्र्भानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझ?" उगाच काहीतरी विचारायचं म्हा णून चंद्रभानने विचारल आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "बर ते सांग सावकाश. अगोदर काय घेणार ते बोल. एक मस्त नवीन स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?" "नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी.

कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 18/06/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
१. आयला ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला. “हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “ नागेश आश्चर्याने पाहू लागला “तू जिन आहेस ?!!” “हो हुजूर.” नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला. “हे स्वप्न नाहीये मालिक.” “पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना” “बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.” “आयला असंही असतं का ?” “जी हाँ.” “तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?” “बेशक.

आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 18/06/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती. जसे सायन मागे पडले आणि माझ्या ओळखीची मुंबईतली जुनी ठिकाणे जसजशी दृष्टीस पडू लागली, तसतशा माझ्या त्यासंबंधीच्या सर्व जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या.

ये कश्मीर है - दिवस सहावा - १४ मे

लेखक एक_वात्रट यांनी शनिवार, 17/06/2017 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
काहीही पहायचे नाही, फक्त निरूद्देश भटकायचे, आपण थांबलो आहोत ते शहर अनुभवायचे असा एक तरी दिवस सहलीत असायलाच हवा असं माझं आपलं एक प्रामाणिक मत आहे.(अर्थात हाताशी असलेला वेळ नि पहायच्या ठिकाणांची यादी पाहता हे गणित प्रत्येक सहलीत जमणे अवघडच.) आज दिवसभरात आपल्याला काहीही करायचे नाही ही भावना सुखद असते, सहलीच्या वेळी तर ती आणखीनच सुखद बनते. हे किंवा ते पहायचे आहे असा आमचा आजचा काहीही कार्यक्रम नव्हता. काही चांगले पाहण्यासारखे असले तर पहावे किंवा खुशाल खोलीत लोळत पडावे अशी आजची योजना होती. पेहेलगाममधे पहायची ठिकाणे तशी तीनच - बेताब व्हॅली, अबू व्हॅली नि चंदनवारी.

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!

लेखक चिनार यांनी शनिवार, 17/06/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो. (आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!) पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे. प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत.

अदृष्य हात

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 17/06/2017 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
चाले कशी काय ही अर्थव्यवस्था चाले कशी काय? अदृष्य हाताची ही सारी सारवासारव नव्हे काय? पैसा म्हणजे काय, सांगा पैसा म्हणजे काय? मानवनिर्मित मूल्यवाचक, म्हणजे पैसा नव्हे काय? पैसा करतो काय, सांगा पैसा करतो काय? ज्याचे जसे कर्म तैसे त्याचे माप तो भरे नव्हे काय? कर्म म्हणजे काय सांगा, कर्म म्हणजे काय? भांडवल जमीन वापरून श्रमदान म्हणजे कर्म नव्हे काय? कर्म करते काय सांगा, कर्म करते काय? वस्तू आणि सेवा कर्मच निर्माण करी नव्हे काय? त्याला मिळते काय, सांगा कर्मचाऱ्याला मिळते काय? मालक फेकेल तेवढा तुकडा, त्याचाच नव्हे काय? श्रेष्ठ नव्हे काय, त्याचे योगदान श्रेष्ठ नव्हे काय? योग्यतेने नव्हे, श्रेष्ठत
काव्यरस

पालक राईस

लेखक सविता००१ यांनी शनिवार, 17/06/2017 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
. वाढणी - ४ व्यक्तींसाठी साहित्यः २ वाट्या तांदूळ, ३ वाट्या पाणी (तांदळाच्या प्रतीनुसार कमी- जास्त लागू शकते) - मी साधा कोलम र्तांदूळ वापरला आहे. १ चक्रीफूल, १ तमालपत्र, २ हिरव्या वेलच्या, मीठ चवीनुसार, १ मध्यम जुडी पालक, ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर पुदिना पाने, १ टीस्पून आलं लसूण पेस्ट, २ मोठे कांदे, १ टोमॅटो, १ चमचा जिरे, १/२ टीस्पून तिखट१/चिमूटभर हिंग, १/२ चमचा गरम मसाला, ३ टीस्पून तेल कृती: तांदूळ धुवून अर्धा तास निथळत ठेवा.