Skip to main content

तो (भाग २)

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 18/07/2017 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १: http://www.misalpav.com/node/40321 तो (भाग २) काकु पडल्या पडल्या विचार करत होत्या,'अशोकच बिचाऱ्याच कस होत असेल. नोकरी सांभाळून आजारी बायकोला देखील जपतो आहे. त्यात हे नवीन आणि थोडं आड बाजुच गाव. या दोघांना तर शहराची सवय. मी म्हंटल देखील त्याला एकदा की इथे अशा आड गावी बदली का घेतलीस? तुम्ही शहरात राहाणारी मुलं इथे कस व्हायचं तुमच? तर म्हणाला संध्याला समुद्र आवडतो. मुंबईला देखील त्याचं घर जुन्या वाडीत पण समुद्राच्या जवळ होत. तो तिला आणि त्यांच्या लेकीला रोज न्यायचा म्हणे समुद्रावर. पण मग ते तसं झाल आणि संध्या पार गप होऊन गेली.

गटारीगाथा

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 17/07/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ साली लिहिलेली हा लेख येणाऱ्या गटारीच्या स्वागतासाठी पुन: पोस्ट करीत आहे. गटारीगाथा तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदरच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो, गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते.

शाभभट्टा ची युरोप वारी... इटली , स्वीस , फ्रान्स ..लेखांक ७

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 17/07/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस सातवा व्हेनिस शहराचे दर्शन घेण्याची वेळ आता संपत आली होती.रेल्वे स्थानकातील कॅफेमधे घुसलो. काहीतरी खरेदी केले की वायफाय चे कोड मिळते ही ठाउक झाले होते. "फ्री" वायफाय हे असे असते. ' आम्हाला दुधासह कॉफी हवी होती" पण काउंटर वरील महिलेला आमचे काही कळत नव्हते. आमच्याच बाजूला एक जपानी बाई उभी होती. तिला इंग्लीश येत होते. तिने 'लोट्टे 'ही कॉफी मागा असे आम्हाला सुचविले. त्याप्रमाणे दोन कप आम्ही मागितले. सहा युरोत दोन कप होते. त्यात आम्ही गोळ्या टाकून " आपली भारतीय कॉफी" प्यायला सुरूवात केली. कप अगदी मोठा होता. आम्हालाही वेळ होता. घोट घेता घेता आजूबाजूचे निरिक्षण करीत बसलो.

ऐका वेड्याची कहाणी

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी सोमवार, 17/07/2017 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोतं कोतं कोतं कोतं त्याचं मन थोडं कोतं तिच्यासंगे राहण्यासाठी जागोजागी पळत होत व्हतं II त्याला काय ठाव अग्नी त्याला नाय ठाव पाणी सात जन्मांची ती राणी ऐका वेड्याची कहाणी II शाळा मॉप त्यो हुंदडला येऊन कॉलेजात पडला सुंदरीला पाहताक्षणी जागच्याजागीच थांबला II हाती धरशी पुस्तकं धरे लेखणी उगाच मन खोळंबले तेथेच जागी नाही रे मस्तक II कुणी मित्र ते दिसेना कुठे जीव तो रमेना राघु असाच सुकला दिसे जागो जागी मैना II करे पाठलाग तिचा कोण मामा अन भाचा सारी माहिती जमवे जन्मदिन तीचा "मे" चा II राणी मॉप ती हुशार करी भविष्याचा विचार राजा पाळतीवर सदा तरी नेहम

शब्द मौनातले

लेखक संदीप-लेले यांनी सोमवार, 17/07/2017 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मौनात काळजाला जी आर्त हाक जाई शब्दातल्या छटेचा पारा उधाण जाई शब्दात वार नाही, ना त्यास धार काही का रक्त सांडतो जो, वाचावयास जाई शब्दात सत्य जेव्हां, तेव्हां न दाद काही शब्दात जो दिखावा, उत्स्फूर्त दाद जाई जेव्हा कधीच कोणी, बोलावयास नाही एकांत शब्द काही, शोधावयास जाई शब्दात भेटती जे, ते अर्थ अंतरीचे भेटीत अंतरीच्या, न्हाहून प्राण जाई ... संदीप लेले

तो (भाग १)

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 16/07/2017 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
तो (भाग १) कधी सावरणार ही त्या धक्यातून कोण जाणे? जागा बदलली तर किमान जुन्या आठवणींपासून तिची सुटका होईल अस वाटल होत मला. पण इथे सुद्धा तो शेजारच्या जोशी काकूंच्या व्हरांड्याला झोपाळा बघितल्या पासून ही अजूनच गप्प झाली आहे. बर, हिला कितीवेळा सांगितल त्या बाजूच्या खिडकीकडे फिरकूसुद्धा नकोस. तर मी असताना नाही जात. पण मी नसलो की त्याच खिडकीत जाऊन बसलेली असते बहुतेक. काल जोशी काका भेटले होते ते म्हणाले,'संध्या खिडकीत दिसली म्हणून हिने हाक मारली; पण तिने उत्तर नाही दिल.' मी म्हंटल, 'तिच लक्ष नसेल हो काका.' तर म्हणाले, 'अरे लक्ष होत. आमच्या व्हरांड्यातल्या झोपाळ्याकडेच बघत होती ती बहुतेक.

राणी पद्मावती

लेखक कल्पतरू यांनी रविवार, 16/07/2017 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या वर्षाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट येतोय. राणी पद्मावती नावाचा. दीपिका पदुकोण राणी पद्मावतीची भूमिका साकारतेय. आता हा चित्रपट रिलीज होणार आणि त्यामध्ये आपल्याला निर्मात्यांच्या अगम्य आणि अतर्क्य कल्पनाशक्तीचे(जसे बाजीराव मध्ये सुरवातीलाच मस्तानीची धडाकेबाज एंट्री, पिंगा गाण्यावर काशी आणि मस्तानीचा डान्स वैगरे वगैरे) दर्शन होऊन खरी राणी पद्मावती कुठेतरी हरवून जाणार.

टाईमलाईन---- हिंदू ते निधर्मी होण्याची!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी रविवार, 16/07/2017 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
बाल्यावस्था( वय १० ते १३)------ धर्म .....प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय.जगात म्हणे १०० पेक्षा जास्त धर्म आहेत.

शिवसेना भवितव्य ?

लेखक वाल्मिकी यांनी रविवार, 16/07/2017 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत १) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ? २) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ? ३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ? ४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ? ५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?

...नवल!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 16/07/2017 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल!