Skip to main content

समर्थांची शिवथरघळ - उपांड्या आणि गोप्या घाटांसोबत

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 28/07/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
. खरं म्हणजे पावसाळ्यात डोंगरदर्‍यांच्यात भटकणे म्हणजे डोळ्यांना एक सुखद पर्वणीच असते. हिरवेकंच डोंगर, खळाळत्या नद्या, डवरलेली भातशेती, पांढरेशुभ्र धबधबे, सर्वत्र पसरलेले दाट धुके आणि या सर्वांतुन आपल्याला आपल्या लक्षापर्यंत घेवून जाणारी न चकवणारी पाऊलवाट. हे सर्व अनुभवायला आम्ही अठराजण निघालो होतो.

अनवट किल्ले १५: तानाजी आणि शेलारमामांच्या मावळ्यांचा पारगड ( Paargad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 28/07/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमा जिथे मिळतात त्याठिकाणी एक छोटासा परंतु नितांत सुंदर असा एक गड कधीचा खडा आहे. एका बाजुला घनदाट जंगल, पायथ्याशी तिलारी धरणाचे पाणी आणि एका बाजुला गोव्याचे दिसणारे दिवे, महाराष्ट्रातील चंदगड आणी दोडामार्ग यांना जोडणारा अतिशय अवघड आणि म्हणूनच कमी वर्दळीचा रामघाट, हा नजारा पहाण्यासाठी प्रत्येक दुर्ग आणि निसर्गप्रेमीनी ईथे आवर्जून भेट दिली पाहिजे. अत्यंत रम्य आणि जाण्यास सोयीच्या या किल्ल्याचा ईतिहासही रंजक आहे.

सह्याद्रीतल्या अपघातांची शेल्फी

लेखक विखि यांनी गुरुवार, 27/07/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जे आपल्या सह्याद्री मध्ये अपघातांच सत्र सुरू आहे, त्यावर काही तरी बोलावं आणि त्या संदर्भात काही चर्चा करावी या हेतूने हा लिहायचा एक प्रयत्न. लिखाण माझा पिंड पण नाही. पण सध्या जे काही विचित्र अपघात घडतायत त्या मध्ये विनाकारण माझ्या सह्याद्री बद्दल ज्या काही शंका,भीती पसरवली जात आहे तो दूर करण्याच्या साठी हा सगळा लेखनाचा प्रपंच. हो जाणीवपूर्वक मी 'माझा सह्याद्री' म्हणतोय कारण त्यानेच मला घडवलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मला तो गुरुस्थानीच आहे. मी त्याला माझाच समजतो आणि त्याने देखील कधी मला परकं समजलेलं नाही.

आणि दानव बाहेर येतो..

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 27/07/2017 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
Not the way to be happy काल मढे घाटात जाण्याचा योग आला. व मढे घाटाची लागलेली वाट पाहुन त्वरीत घरची वाट पकडली... अंदाजे ७-८ वर्षापुर्वी पहिल्यांदा तिकडे गेलो असीन , तेव्हाचा मढे घाट व आत्ताचा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. माहीती तंत्रज्ञान, सोशल मीडीया मुळे माहीती लवकर प्रसारीत होत आहे. त्या काळी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पर्यटक तिथे येत, सध्या वीकयेंड ला किमान ४०० मोटारगाड्या, ५०० ते ६०० मोटारसायकली येत आहेत. म्हणजे दिड ते दोन हजाराच्या आसपास पर्यटक येत आहेत.

प्रो कबड्डी - सिझन ५ - ले पंगा

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 27/07/2017 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, प्रो. कबड्डीच्या चौथ्या मोसमाचे मी जवळपास संपुर्ण महिनाभर वार्तांकान केले होते. जवळपास ३३ दिवस ! मागील वर्षापेक्षा या ५ वर्षाच्या सामन्यांची सुरुवात जवळपास एक महिना उशीराने सुरुवात होत आहे. उद्या २८ जुलै २०१७ पासुन सामने सुरु होतील. ३ महिने सलग वार्तांकन करणे हे माझ्यासाठी मोठेच आव्हान असणार आहे. सगळे सामने बघून मगच त्यावर लिहायचा विचार आहे. मागील वर्षी देखील सामना पाहुन झाल्यानंतर लगेच वार्तांकन लिहून इथे प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता तो सुफळ झाला. असो. तुणतुणे पुरे ! मागील वर्षांपेक्षा या वेळचे वेगळेपण म्हणजे तब्बल १२ संघ आणि जवळपास ३ महिने हे सामने चालणार आहेत.

लोकल मधले लोकल्स भाग- २

लेखक रघुनाथ.केरकर यांनी गुरुवार, 27/07/2017 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग एक ​आत मध्ये तीन जणांच्या सीट वर एक पुरूष, आणि दोन स्त्रिया बसलया होत्या. प्रथमदर्शनी ते एक कुटुंब वाटत होतं. कोपऱ्यावरच्या सीटवर बाबा प्रवासी मध्ये आई प्रवासी आणि खिडकी कडे बेटी प्रवासी. बेटी प्रवासी वयवर्षे असतील अंदाजे २५ ते २८ च्या आसपास. आणि हिशोबाने तिचे आई बाबा होते. समोरच्या मोठ्या सीटवर नेहमीचे कंटाळलेले चेहरे मोबायलात डोकी घालून बसलेले होते. त्यातल्या खिडकी दुसऱ्या क्रमांकाच्या प्रवाशाने त्याचं ओझं त्याच्याच मांडीवर घेतलं होतं.

फुडोग्राफी २०१७

लेखक केडी यांनी गुरुवार, 27/07/2017 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेली दिड वर्ष मी मिपा वर आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याच पाककृती टाकत आहे/टाकतो आहे. तुम्हा सर्वांकडून वेळोवेळी मिळालेली दाद, प्रोत्साहन ह्याने हुरूप वाढत आहे. यंदा, पुण्यात एक वेगळे प्रदर्शन भरत आहे, (ह्याबद्दल मला देखील फेसबुक वरून कळले. गम्मत म्हणून मी माझी काही छायाचित्र पाठवली, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझी काही छायाचित्रे देखील ह्या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत). आपण पुण्यात असाल, तर प्रदर्शनास नक्की भेट देऊन, सगळ्या छायाचित्रकारांचे प्रोत्साहन वाढवाल ह्यात शंका नाही, म्हणून हे आग्रहाचे आमंत्रण!

श्रीगणेश लेखमाला २०१७!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 27/07/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, म्हणता म्हणता बाप्पांचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन धडकलंय. त्यांच्या स्वागतासाठी सजावटीचा थाटमाट, आरत्यांचा दणदणाट, मोदकांची रास याचबरोबर अजुन एक गोष्ट असतेच ती म्हणजे आपली श्रीगणेश लेखमाला!!! यावर्षी श्रीगणेश लेखमाला सुरू होतेय अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी २५ ऑगस्टला. या लेखमालेत नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखांची रेलचेल असणार आहे. तर मिपाकरहो बाप्पाचे नाव घ्या आणि येऊ द्या तुमच्याकडून एक से एक उत्तम लेख. आम्ही वाट पाहतोय या मेजवानीची. केवळ 'मी' ह्या विषयावर माजलेल्या तुंबळ रणाच्या पार्श्वभुमीला देऊ आता ऑफिशिअल स्वरुप.

नवकवीस्तोत्र

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 26/07/2017 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
काही करण्या उरले नसता । आपली पाटी कोरी असता । काही बकांची ध्यानस्थ स्तब्धता । मत्स्यमारीकारणे ।। दिसता कोणीही नवखा । लबाड साधिती मोका । त्याची बुडवती नौका । लागलीच ।। पाडावी भोके यथेच्छ । भाषा तरी वापरावी स्वच्छ । भासवावे तयाते तुच्छ । आत्मक्लेशे ।। कवीचे उडवावे शिरस्त्राण । मागाहुनि करावे शिरकाण । मनसोक्त मारावे पादत्राण । कवितेवरी ।। आपण गाडिले कुठे झेंडे । आपल्या कापसा किती बोंडे । सगळे विसरून फेकती अंडे । अशावेळी ।। अशाने होते तरी काय । कवी हतोत्साही होऊन जाय । परि अंतरी लागते हाय । कायमची ।। सांगे कवी अशा लोका । दिसताक्षणी तिथेच ठोका । असे जरी प्रसंग बाका । विजयीभव ।।

वारा...पाऊस...गोरखगड..!

लेखक इरसाल कार्टं यांनी बुधवार, 26/07/2017 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोहोज नंतर लोहोपे तलावाची एक छोटीशी सहल केली होती ग्रुपने, आता पावसाळ्यात काय हा प्रश्न विचारून सगळ्यांनी मला पिडलं होतं. याआधी नाणेघाट आणि मागच्या वर्षी ब्रह्मगिरी असे दोन पावसाळी ट्रेक झाले होते जवळचे त्यामुळे आता हे दोन पर्याय सोडून इतर पर्यायांचा विचार करत होतो. या वर्षीच्या यादीत हरिहरगड, कलावंतीण दुर्ग आणि गोरखगड अग्रस्थानी होते. खरेतर तीनही एकाच पठडीतले वाटावे असे, सुळक्यासारखे आकाशाला भिडणारे आणि कठीण. यातील जवळ असणारा आणि तुलनेने सोपा गड निवडावा असे ठरवले आणि गोरखगड ट्रेकचा ठराव ग्रुपात मांडला.